Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचा पहिला व्हिडिओ समोर; इस्रायली दाव्यांची निघाली हवा की डाव नवा? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांच्या प्रकृतीबाबत आणि त्यांच्या शारीरिक स्थितीबाबत जगभरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच इराणच्या निम-सरकारी ‘मेहर न्यूज एजन्सी’ने मोजतबा खामेनी यांचा एक नवा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये ते काही लोकांशी संवाद साधताना आणि धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करताना दिसत आहेत. इस्रायली आणि अमेरिकन प्रसारमाध्यमांनी मोजतबा हे गंभीर आजारी असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असल्याचा दावा केला होता, त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्यामुळे या अफवांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच याच्या वेळेविषयी आणि सत्यतेविषयी जगभरात नवीन आणि अधिक गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मोजतबा यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, अशा बातम्या समोर आल्या होत्या. परंतु, सध्या जारी करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांच्या शरीरावर कोणतीही दृश्य जखम किंवा दुखापतीची खूण दिसत नाही. यामुळे हा व्हिडिओ अलीकडचा नसून युद्धापूर्वीचा किंवा जुना असण्याची दाट शक्यता आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी आणि गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mecca Pact: इस्लामिक नाटोची अग्निपरीक्षा! करारांनंतर 24 तासांच्या आत सौदी अरेबियात भीषण स्फोट; तेल शुद्धीकरण कारखाना उद्ध्वस्त
इराणच्या अंतर्गत राजकारणात आणि प्रशासनात या व्हिडिओमुळे अधिकच संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. मेहर न्यूज एजन्सीने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला असला, तरी इराणच्या इतर प्रमुख सरकारी वाहिन्यांवर आणि अधिकृत वृत्तसंस्थांवर त्याला फारसे स्थान देण्यात आलेले नाही. सर्वोच्च नेत्याच्या प्रकृतीबाबत जनतेच्या आणि राजकीय वर्तुळाच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यात हा व्हिडिओ अपयशी ठरला असल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
Iran’s Mehr RELEASES VIDEO of Supreme Leader Mojtaba Khamenei for ‘FIRST TIME’ pic.twitter.com/v3Rp81VfLH — RT (@RT_com) August 8, 2026
credit – social media and Twitter
दुसरीकडे, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि प्रशासकीय अधिकारी सर्वोच्च नेते पूर्णपणे सुरक्षित असून देशाचे धोरणात्मक निर्णय आणि लष्करी कारवायांचे निर्देशन करत असल्याचा दावा करत आहेत. परंतु, मोजतबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकदाही थेट सार्वजनिक सभा घेतलेली नाही किंवा थेट व्हिडिओ संदेशाद्वारे राष्ट्राला संबोधित केलेले नाही. ते केवळ लेखी निवेदनांद्वारे आणि अत्यंत सुरक्षित मध्यस्थांमार्फत सैन्याला आदेश देत असल्याचे सांगितले जाते. या थेट अनुपस्थितीमुळे त्यांच्या वास्तविक क्षमतेबद्दल शंकांची मालिका थांब नाव घेत नाहीये.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi-Putin: अमेरिकेला डावलून मोदी-पुतीन यांचे मोठे पाऊल; दशकांहून जुनी मैत्री आता नव्या अवतारात, रशिया ते भारत थेट गॅस पाइपलाइन
मध्य-पूर्वेत (पश्चिम आशिया) सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात अत्यंत नाजूक आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा काळात इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाचे स्थैर्य आणि ताकद दर्शवणे राजवटीसाठी अत्यंत आवश्यक बनले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला आणि आपल्या विरोधकांना असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की देशाची सत्ता मजबूत हातात आहे. परंतु, जर येत्या काही दिवसांत मोजतबा खामेनी प्रत्यक्ष लोकांसमोर आले नाहीत किंवा त्यांनी थेट भाषण केले नाही, तर इराणच्या राजकीय भविष्याबद्दलचा हा संशय अधिक गडद होईल यात शंका नाही.






