Donald Trump: 'मला नरकात जायचे नाही, मी धार्मिक व्यक्ती आहे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मुलाखतीमुळे जगभरात चर्चांना उधाण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि स्पष्टवक्तेपणासाठी जगभरात चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांची एक अत्यंत रंजक मुलाखत समोर आली आहे, ज्यामध्ये त्यांनी जीवन, मृत्यू, स्वर्ग-नर्क, राजकीय शत्रू आणि अगदी एलियन्स किंवा UFO बद्दल दिलखुलासपणे भाष्य केले आहे. CBS वाहिनीच्या ’60 मिनिट्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात पत्रकार रॉस डुथॅट यांनी ट्रम्प यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमधील ट्रम्प यांची विधाने सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रकारच्या चर्चा झडत आहेत.
मुलाखतीदरम्यान जेव्हा पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारला की, “तुम्हाला काय वाटते, मृत्यूनंतर नक्की काय होते?” यावर ट्रम्प यांनी काही क्षण विचार केला आणि उत्तर दिले की, लोकांच्या मनात आपली एक चांगली आठवण राहावी अशी त्यांची इच्छा आहे. पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी एक धार्मिक व्यक्ती आहे, त्यामुळे तत्त्वतः मी स्वर्गात जायलाच पाहिजे. हीच माझी आशा आहे, कारण मला अजिबात नरकात जायचे नाही.”
अमेरिकेच्या राजकारणात अनेक प्राणघातक हल्ले आणि आव्हानांचा सामना केल्यानंतर ट्रम्प यांचा जीवन आणि मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, यावर या मुलाखतीत सखोल चर्चा झाली. ट्रम्प यांनी आपल्या धार्मिक विश्वासावर भर देत आपण नेहमीच चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवले.
“I’m a religious person, so in theory I go to heaven,” President Trump says, discussing what he thinks happens after death. “I don’t want to go to hell.” https://t.co/8o5y8hcqtY https://t.co/5LexpK2jEP — 60 Minutes (@60Minutes) November 9, 2026
credit – social media and Twitter
या मुलाखतीतील सर्वात लक्षवेधी आणि वादग्रस्त भाग म्हणजे ट्रम्प आणि त्यांच्या राजकीय विरोधकांमधील संबंध. पत्रकाराने त्यांना अत्यंत मार्मिक प्रश्न विचारला की, समजा तुम्हाला स्वर्गात प्रवेश करायचा असेल आणि त्यासाठी तुम्हाला जेम्स कोमी, नॅन्सी पेलोसी आणि इतर अशा सर्व लोकांबद्दल मनसा-वाचा-कर्मणा प्रेम व क्षमाशीलता बाळगावी लागेल ज्यांचा तुम्ही वर्षानुवर्षे तिरस्कार केला आहे, तर तुम्ही ते करू शकाल का?
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jensen Huang: टेक विश्वात खळबळ! Nvidia CEO अडकले चिनी गुप्तहेरगिरीच्या जाळ्यात; अब्जावधी डॉलर्सची चिप खरेदी करून अमेरिकेची…
यावर ट्रम्प यांनी कोणताही बडेजाव न ठेवता अत्यंत रोखठोक उत्तर दिले. ते म्हणाले, “याचे उत्तर नाही असे आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी हे करू शकणार नाही. कारण मी माझ्या काही राजकीय शत्रूंचा मनापासून तिरस्कार करतो आणि यापुढेही आयुष्यभर करत राहीन.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, राजकीय कटुता आणि मतभेद ते वैयक्तिक पातळीवरही किती टोकाचे बाळगतात.
मुलाखतीच्या उत्तरार्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका गूढ विषयावर भाष्य केले, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ट्रम्प यांनी उघड केले की, त्यांना वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न हा UFO (अज्ञात उडणाऱ्या वस्तू) बद्दल असतो. आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते अमेरिकन हवाई दलाच्या अनेक अनुभवी आणि तज्ज्ञ वैमानिकांना भेटले आहेत.
या पायलट्सनी ट्रम्प यांना UFO बद्दल अशा काही अंगावर काटा आणणाऱ्या आणि विचित्र कथा सांगितल्या, ज्या ऐकून ते स्वतःही अोखी झाले होते. ट्रम्प यांच्या मते, हे सर्व पायलट अत्यंत हुशार, वास्तववादी आणि कोणत्याही निराधार षडयंत्रावर विश्वास न ठेवणारे व्यावसायिक लोक होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Egypt Train Crash: इजिप्तमध्ये भीषण रेल्वे अपघात! उभ्या ट्रेनला मागून धडक; 7 ठार तर 100 हून अधिक प्रवासी जखमी
या वैमानिकांचे वर्णन करताना ट्रम्प यांनी एक मजेशीर टिपण्णीही केली. ते म्हणाले की, हे पायलट दिसायला अत्यंत तरुण, सुदृढ, व्यवस्थित केस कापलेले आणि अगदी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ‘टॉम क्रूझ’ सारखे डॅशिंग दिसत होते. ट्रम्प यांनी गंमतीच्या सुरात असेही म्हटले की, अशा पायलट्सना पाहून त्यांनाही कधीकधी त्यांच्यासारखाच हेअरकट करून घ्यावासा वाटतो. जरी या पायलट्सनी UFO बद्दल अत्यंत अद्भूत आणि विचित्र गोष्टी सांगितल्या असल्या, तरी स्वतः ट्रम्प यांनी असे स्पष्ट केले की, जरी हे लोक अत्यंत विश्वासार्ह असले तरी त्यांच्या त्या कथांवर त्यांचा वैयक्तिक पातळीवर पूर्णपणे विश्वास बसत नाही.
एकंदरीतच, डोनाल्ड ट्रम्प यांची ही मुलाखत त्यांच्या राजकीय स्वभावाप्रमाणेच अत्यंत बिनधास्त, रंजक आणि खळबळजनक ठरली आहे, ज्याची चर्चा आता संपूर्ण जगभरात होत आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ते एक धार्मिक व्यक्ती असल्याने मृत्यूनंतर त्यांना नरकात नव्हे तर स्वर्गात जायचे आहे.
Ans: जेम्स कोमी, नॅन्सी पेलोसी आणि इतर राजकीय विरोधकांबद्दल बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की ते त्यांच्या शत्रूंचा तिरस्कार करतात आणि त्यांना कधीही माफ करणार नाहीत.
Ans: अमेरिकन हवाई दलाच्या अनुभवी वैमानिकांनी ट्रम्प यांना UFO (अज्ञात उडणाऱ्या वस्तू) बद्दल काही अत्यंत विचित्र आणि थक्क करणाऱ्या गोष्टी सांगितल्या.






