
mount maunganui landslide new zealand holiday park destroyed january 2026
Mount Maunganui landslide January 2026 : निसर्गाच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडच्या (New Zealand) ‘बे ऑफ प्लेंटी’ (Bay of Plenty) प्रांतात आज निसर्गाने रौद्र रूप धारण केले. माउंट मौंगानुईच्या पायथ्याशी असलेल्या एका लोकप्रिय हॉलिडे पार्कमध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे जमिनीची पकड सुटली आणि डोंगराचा भलामोठा भाग कॅम्पग्राउंडवर कोसळला. या घटनेने संपूर्ण न्यूझीलंड हादरले असून, पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी याला मोठी ‘राष्ट्रीय शोकांतिका’ म्हटले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ९:३० च्या सुमारास अचानक ढगफुटीसारखा पाऊस सुरू असताना डोंगराचा मोठा कडा खाली आला. हा ढिगारा थेट पर्यटकांच्या कॅम्पर व्हॅन, कार, तंबू आणि हॉट पूलवर पडला. “तो आवाज एखाद्या मोठ्या बॉम्बस्फोटासारखा होता, आम्ही फक्त जीव वाचवण्यासाठी पळत होतो,” असे एका वाचलेल्या पर्यटकाने सांगितले. ज्या भागात लोक अंघोळीसाठी आणि विश्रांतीसाठी जमले होते, तो भाग पूर्णपणे मातीखाली गाडला गेला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर
बचाव कार्याचे नेतृत्व करणारे फायर कमांडर विल्यम पाईक यांनी सांगितले की, जेव्हा बचाव पथके घटनास्थळी पोहोचली, तेव्हा मातीच्या ढिगाऱ्याखालून काही लोकांचे मदतीसाठी ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते. मात्र, जमीन अत्यंत निसरडी आणि अस्थिर असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. श्वान पथके आणि आधुनिक स्कॅनर्सच्या साहाय्याने बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे. दुर्दैवाने, गेल्या काही तासांपासून ढिगाऱ्याखालून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
Eyewitness videos shot from a helicopter showed landslides that had occurred in northern New Zealand due to heavy rain, including one at a campsite in Mount Maunganui, a popular tourist spot on the northern coast of the country https://t.co/UZsVRsmbni pic.twitter.com/YXLZhVzqTx — Reuters (@Reuters) January 22, 2026
credit – social media and Twitter
न्यूझीलंडच्या हवामान खात्याने (MetService) दिलेल्या माहितीनुसार, तौरंगा आणि आसपासच्या भागात गेल्या २४ तासात २७० मिमी ते २९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सामान्यतः अडीच महिन्यात पडणाऱ्या पावसा इतके आहे. या मुसळधार पावसामुळे उत्तर बेटावरील हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, अनेक रस्ते बंद झाले आहेत. माउंट मौंगानुई सारख्या पर्यटनस्थळी सध्या उन्हाळी सुट्ट्यांसाठी मोठी गर्दी असल्याने या दुर्घटनेची तीव्रता अधिक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-EU Summit 2026: युरोपची मोठी कबुली! ‘भारताशिवाय आमचा व्यापार चालूच शकत नाही’; प्रजासत्ताक दिनापूर्वी आनंदाची बातमी
आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री मार्क मिशेल यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी याला ‘वॉर झोन’ (War Zone) असे संबोधले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या इतर पाच जिल्ह्यांमध्ये आणीबाणी (State of Emergency) घोषित करण्यात आली आहे. उर्वरित पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
Ans: न्यूझीलंडमधील माउंट मौंगानुई येथे मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन झाले, ज्यामध्ये 'बीचसाइड हॉलिडे पार्क'चा मोठा भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला.
Ans: पोलीस आणि प्रशासनाच्या मते बेपत्ता लोकांची संख्या 'सिंगल डिजिट' (१० पेक्षा कमी) आहे, मात्र अधिकृत आकडा बचाव कार्य पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होईल.
Ans: तौरंगा भागात विक्रमी २७० मिमी पाऊस पडला असून, अनेक शहरांचा संपर्क तुटला आहे आणि हजारो लोक वीजपुरवठ्याविना आहेत.