Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories - खामेनी यांच्या मृत्यूनंतर ही दुसरी महत्त्वाची पोस्ट आहे. १ मार्च रोजी त्यांच्या मृत्यूच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कुराणातील एक पवित्र श्लोक शेअर करण्यात आला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 07, 2026 | 04:35 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

WorldWar3: खामेनींच्या निधनानंतर त्यांच्याच ‘X’ अकाऊंटवरून इस्रायलला स्फोटक धमकी

Ayatollah Ali Khamenei death news March 2026 : मध्यपूर्वेतील संघर्ष आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे प्रत्येक क्षण विनाशाची चाहूल देत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचा २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेच्या(US-Israel Iran War) संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच, त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून एक अत्यंत भीतीदायक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टने केवळ इस्रायललाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 07 Mar 2026 03:40 PM (IST)

    07 Mar 2026 03:40 PM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांचं स्वप्नातलं घर आता पूर्ण होणार! ५% व्याजावर मिळणार ७५ लाखांचे कर्ज?

    8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची चर्चा सध्या जोर धरत आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक ठरू शकते. महागाई आणि वाढत्या मालमत्ता किमतींचा विचार करता, सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी मिळणाऱ्या आगाऊ रक्कमेची मर्यादा वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. राष्ट्रीय पोस्टल संघटनेसह विविध कर्मचारी संघटनांनी सरकारकडे काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आहेत: घर बांधणीसाठीच्या कर्जाची कमाल मर्यादा २५ लाखांवरून ७५ लाख (७.५ दशलक्ष) रुपयांपर्यंत वाढवावी.  सध्याच्या ७.५ टक्के व्याजदराऐवजी तो ५ टक्क्यांपर्यंत खाली आणावा. पगाराच्या प्रमाणात कर्ज म्हणजेच कर्जाची रक्कम ही ६० महिन्यांच्या मूळ पगाराच्या बरोबरीची असावी. सेवा कालावधीत सवलत: कर्ज मिळण्यासाठी आवश्यक असलेला सेवा कालावधी ५ वर्षांवरून २ वर्षांवर आणावा. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

    वाचा सविस्तर 

  • 07 Mar 2026 03:30 PM (IST)

    07 Mar 2026 03:30 PM (IST)

    80 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ८० वर्षीय वृद्धेवर एका ५४ वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या नातीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शेख रमजान शेख महमूद (५०) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना सोयगाव तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणातील पीडित महिला रात्री आपल्या घरात एकटी झोपलेली असतांना आरोपी शेख रमजान याने घरात प्रवेश केला. त्यांनतर पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार शुक्रवार सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या नातीने सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला.

    वाचा सविस्तर 

  • 07 Mar 2026 03:20 PM (IST)

    07 Mar 2026 03:20 PM (IST)

    Strait of Hormuz: ‘मृत्यूच्या मुखात’ Pushpakआणि Parimalची एन्ट्री

    Indian ships Pushpak and Parimal in Strait of Hormuz : जागतिक व्यापाराचा सर्वात संवेदनशील मार्ग म्हणून ओळखली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) सध्या अमेरिका-इराण युद्धामुळे युद्धभूमी बनली आहे. हुथी बंडखोर आणि इराणच्या लष्करी हालचालींमुळे या मार्गाला ‘मृत्यूचे मुख’ म्हटले जात आहे. मात्र, अशा भयानक परिस्थितीतही भारतीय मालवाहू जहाजांनी या मार्गावरून आपला प्रवास सुरू ठेवून जगाला चकित केले आहे. चीनच्या पावलावर पाऊल ठेवत भारताने इराणसोबत एखादा गुप्त करार केला आहे का, असा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला जात आहे.

    वाचा सविस्तर 

  • 07 Mar 2026 03:10 PM (IST)

    07 Mar 2026 03:10 PM (IST)

    vijay -Rashmika च्या लग्नाच्या व्हिडिओने तोडला ग्लोबल रेकॉर्ड

    विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचे लग्न केवळ सेलिब्रिटी इव्हेंट राहिले नाही, तर 2026 मधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक क्षणांपैकी एक बनले आहे. लग्नातील सुंदर झलक, भावनिक क्षण आणि खास आठवणी दाखवणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. जगभरातील चाहते या जोडप्याच्या आनंदात सहभागी होत आहेत. या लग्नाशी संबंधित खास व्हिडिओने इंटरनेटवर इतिहास रचला आहे. या व्हिडिओने फुटबॉलच्या दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या आयकॉनिक कॅम्पेन पोस्टला मागे टाकत इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स मिळवणारा पोस्ट ठरला आहे. यापूर्वी मेसी-रोनाल्डोच्या पोस्टला 8.1 मिलियन लाईक्स मिळाले होते, तर विजय-रश्मिकाच्या व्हिडिओने आता 8.2 मिलियन लाईक्सचा टप्पा पार केला आहे आणि एक नवीन ग्लोबल रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 07 Mar 2026 03:05 PM (IST)

    07 Mar 2026 03:05 PM (IST)

    संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स

    दिवसभर काम करून थकल्यानंतर संध्याकाळच्या वेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. दुपारच्या जेवणानंतर थेट काहींना संध्याकाळचा नाश्ता करण्याची सवय असते. पण संध्याकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सफरचंद दही पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पॅनकेक हा लहान मुलांचा अतिशय आवडता पदार्थ आहे. हळूहळू मोठ्यांमध्ये सुद्धा पॅनकेक खूप जास्त फेमस झाले आहे. पॅनकेक खाल्ल्यानंतर पोट सुद्धा जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चविष्ट सफरचंद दही पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

    वाचा सविस्तर 

  • 07 Mar 2026 02:50 PM (IST)

    07 Mar 2026 02:50 PM (IST)

    थॅलेसेमियाग्रस्तांच्या स्वप्नांना मिळणार बळ! ‘चाइल्ड हेल्प फाऊंडेशन’कडून विशेष केंद्राची स्थापना

    बालकल्याण आणि मानवतावादी सेवा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘चाइल्ड हेल्प फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. थैलेसेमिया आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या मुलांसाठी संस्थेने ‘होम फॉर बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ या विशेष केंद्राची स्थापना केली आहे. हे केंद्र केवळ निवारा नसून, रुग्णालयाच्या भिंतीबाहेरही मुलांच्या आरोग्याची आणि कुटुंबाच्या मानसिक धैर्याची काळजी घेणारे एक सुरक्षित ठिकाण ठरत आहे. चाइल्ड हेल्प फाऊंडेशनने आजवर ४,२२६ पेक्षा जास्त बालकांना जीवघेण्या आजारांतून बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली आहे.

  • 07 Mar 2026 02:45 PM (IST)

    07 Mar 2026 02:45 PM (IST)

    भीषण अपघात! भरधाव BMW कारची ट्रक-कंटेनरला धडक, चौघांचा मृत्यू तर…

    लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर २ जण गंभीर जखमी आहे. भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात रात्री 10.15 वाजता घडला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

  • 07 Mar 2026 02:35 PM (IST)

    07 Mar 2026 02:35 PM (IST)

    सावधान संजू सॅमसन…आकाश चोप्राने केली आकाशवाणी! हा किवी वेगवान गोलंदाज त्याच्यासाठी “मोठा धोका”

    माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने २०२६ च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर संजू सॅमसनला गंभीर इशारा दिला आहे. सुपर ८ च्या शेवटच्या सामन्यात आणि सेमीफायनलमध्ये सॅमसनच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. भारत आता न्यूझीलंडशी सामना करेल, ज्या संघाविरुद्ध संजू सॅमसन टी२० विश्वचषकापूर्वी धावा काढू शकला नाही. संपूर्ण मालिकेत मॅट हेन्रीने त्याला त्रास दिला. त्याने लॉकी फर्ग्युसनचेही कौतुक केले.

  • 07 Mar 2026 02:20 PM (IST)

    07 Mar 2026 02:20 PM (IST)

    ‘काळ आला होता पण…’; खेडमध्ये खाजगी बस पलटली अन्…, भाविकांसोबत नेमके घडले काय?

    खेड तालुक्यात शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांची बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उलटून अपघात झाल्याची घटना घडली बोरिवलीहून सापिलीं गावाकडे येणारी खासगी आराम बस पलटल्याने या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर कळवणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथून सापिली च धामणंद परिसरातील भाविक शिमगोत्सव व ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी येत होते. यासाठी नेहमीप्रमाणे खासगी आराम बस काल रात्री बोरिवलीहून निघाली होती.

  • 07 Mar 2026 02:16 PM (IST)

    07 Mar 2026 02:16 PM (IST)

    केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!

    मध्य पूर्वेतील संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. कृषीसंलग्न उत्पादनं घेऊन जाणारे 800 ते 1000 कंटेनर दुबईच्या जेबेल अली बंदरात अडकले आहेत. 28 फेब्रुवारीपासून जेव्हा युद्धाची सुरुवात झाली त्यावेळीपासून हे कामकाज थांबलं आहे. कंटेनर विविध देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये निर्यात करता येत नाहीत, त्यामुळे व्यापार थांबला आहे त्याचा परिणाम म्हणजे लाखो रुपयांचा माल खराब होत आहे.

  • 07 Mar 2026 02:00 PM (IST)

    07 Mar 2026 02:00 PM (IST)

    Star Pravah च्या ‘Anandi’साठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

    स्टार प्रवाहवर लवकर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंदी ही नवीन मालिका प्रसारित होण्यासाठी सज्ज झाली असून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकाच्या पहिल्या प्रोमोला अवघ्या काही तासांत २ मिलियन पेक्षा जास्त व्हूज मिळालेत. या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार म्हणजेच अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आनंदी मालिकेच्या निमित्ताने दोघेही बऱ्याच काळानंतर मालिका विश्वात पुनरागमन करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आनंदीच्या आजोबांची म्हणजेच आत्माराम जाधव ही व्यक्तिरेखा साकारणार असून समीर धर्माधिकारी प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची भूमिका साकारणार आहेत.

  • 07 Mar 2026 01:55 PM (IST)

    07 Mar 2026 01:55 PM (IST)

    ग्रामपंचायतमध्ये अंदाधुंद कारभार; नळजोड प्रकल्पातील गैरव्यवहार उघड

    तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये पाणी वितरण व्यवस्था करताना आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे दिसून येत आहेत.ममदापूर ग्रामपंचायतीची स्वतंत्र नळपाणी योजना असताना तेथे नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक यांना नळजोडण्या देऊन पाण्याचे वितरण केले जात आहे. मात्र त्याची कोणतीही नोंद नेरळ ग्रामपंचायत मध्ये दिसून येत नाही. दरम्यान या गैरव्यवहार बाबत नेरळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य भगवान चंचे आणि ग्रामपंचायत माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला असून ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 07 Mar 2026 01:50 PM (IST)

    07 Mar 2026 01:50 PM (IST)

    सिन्नरच्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात! नदीजोड प्रकल्पासाठी १३,४९७ कोटींची ऐतिहासिक तरतूद

    अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित दमणगंगा- वैतरणा गोदावरी (कडवा-देव) नदीजोड प्रकल्पासाठी शुक्रवारी (दि.६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात १३ हजार ४९७ कोटींची तरतूद केल्याने सिन्नरकरांसाठी हा दिलासा ठरला आहे.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत  अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आमदार माणिकराव कोकाटे यांनी या प्रकल्पासाठी अजित पवारांकडे पाठपुरावा केला होता. दादांच्या पश्चात या प्रकल्पासाठी निधी मिळणार किंवा नाही याकडे सिन्नरकरांचे डोळे लागले होते. मात्र अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने सिन्नरचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटण्यास मदत होणार आहे.

  • 07 Mar 2026 01:45 PM (IST)

    07 Mar 2026 01:45 PM (IST)

    इराण युद्धाचा मोठा फटका! सौदी अरेबियात हजारो उमराह यात्री अडकले

    मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel Iran War) केवळ सीमांवरच तणाव वाढलेला नाही. तर यामुळे उमराह यात्रेसाठी निघालेल्या अनेक यात्रेकरुंच्या आनंदात विरजण आले आहे. सौदी अरेबियात उमराहसाठी गेलेले जगभरातील यात्रेकरुन हवाई सेवा बंद पडल्याने सौदी अरेबियात (Saudi Arabia) अडकले आहेत. रमनजाच्या काळात ही परिस्थिती उद्भवली असून घरी परतण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष कारावा लागत आहे. भारतासह, इंडोनेशियापासून ते मलेशियापर्यंतचे यात्रेकरु सौदी अरेबियात अडकले आहेत.

  • 07 Mar 2026 01:40 PM (IST)

    07 Mar 2026 01:40 PM (IST)

    खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन

    मध्यपूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आता एक अत्यंत अनपेक्षित आणि धोकादायक वळण घेतले आहे. ज्या इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध रणशिंग फुंकले होते, तोच इराण आता आपल्या शेजारील इस्लामिक देशांच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि अझरबैजान हे तीन देश इराणविरुद्ध एक संयुक्त आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. जर ही युती प्रत्यक्षात आली, तर इराणला अशा युद्धाचा सामना करावा लागेल ज्यातून बाहेर पडणे त्याला अशक्य होईल.

  • 07 Mar 2026 01:35 PM (IST)

    07 Mar 2026 01:35 PM (IST)

    गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

    मध्यपूर्वेत सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूवर इराणमध्ये शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक दावा समोर आला आहे. अरब देशांतील माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणचे टॉप जनरल इस्माइल कानी यांनी मोसादसाठी हेरगिरी केली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे सध्या खामेनेईंच्या मृत्यूत इस्माइल कानी यांचा हात असल्याचा दावा केला जात आहे.

  • 07 Mar 2026 01:30 PM (IST)

    07 Mar 2026 01:30 PM (IST)

    केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

    उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टर अपघतातून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री मौर्य यांनी कौशाम्बीसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे औमासीच्या विमानतळाव त्यांना हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. मिळालेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री लखनऊच्या ला मार्ट्स मैदानावरून कौशाम्बीसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये अचानक धुराचे लोट येऊ लागले आणि डिस्प्ले सिस्टम बंद पडली, ज्यामुळे विमानातील लोकांमध्ये एकच घबराट पसरली.

  • 07 Mar 2026 01:25 PM (IST)

    07 Mar 2026 01:25 PM (IST)

    80 देशांत पसरलेल्या 800 US लष्करी तळांच्या चक्रव्यूहाचे रहस्य आले समोर

    जगातील महासत्ता म्हणून अमेरिकेचा दबदबा केवळ त्यांच्या आर्थिक ताकदीवर नाही, तर त्यांच्या जगभरात पसरलेल्या लष्करी जाळ्यावर अवलंबून आहे. सध्या इराण आणि इस्रायलमधील तणाव (US-Israel Iran War) शिगेला पोहोचला असताना, अमेरिकेच्या ७५० हून अधिक लष्करी तळांची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली आहे. हे लष्करी तळ केवळ संरक्षणासाठी नसून, ते अमेरिकेला जगाच्या पाठीवर कुठेही, कधीही आणि कोणत्याही क्षणी ‘स्ट्राईक’ करण्याची ताकद देतात.

  • 07 Mar 2026 01:15 PM (IST)

    07 Mar 2026 01:15 PM (IST)

    ये नया हिंदुस्तान है! Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा रौद्र अवतार

    धुरंधर नंतर धुरंधरच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर रणवीर सिंहच्या धुरंधर २ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक आहे आणि खळबळजनक बनला आहे. ट्रेलरमध्ये अनेक हिंट्स मिळतील असा प्रेक्षकांना अंदाज होता. पण, धुरंधरच्या टीमने हुशारीने या ट्रेलरमध्ये काहीच रिव्हिल केलेलं नाही.

  • 07 Mar 2026 01:10 PM (IST)

    07 Mar 2026 01:10 PM (IST)

    काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

    गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. थंडी संपल्यानंतर आता उन्हाळा सुरु होताना दिसत आहे. तापमानात वाढ दिसून येत आहे. त्यातच पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. नागरिकांना आतापासूनच उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. बहुतांश भागात पारा ३५ अंशांच्या पुढे गेला असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढला आहे.

  • 07 Mar 2026 01:05 PM (IST)

    07 Mar 2026 01:05 PM (IST)

    दूध उकळताच झाला रबरासारखा गोळा; पाटस परिसरातील धक्कादायक प्रकार

    दौंड तालुक्यातील पाटस परिसरात सध्या भेसळयुक्त दुधाच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खाजगी पिशव्यांमध्ये भरून विकल्या जाणाऱ्या दुधामध्येही भेसळ होत असल्याचे प्रकार उघड होत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची चिंता व्यक्त होत आहे. राज्यात यापूर्वी अनेक मोठ्या दूध डेअऱ्यांकडून दुधात भेसळ केल्याच्या घटना समोर आल्या असून, काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही काही दूध संस्था व खाजगी डेअरी चालक छुप्या पद्धतीने दुधामध्ये भेसळ करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवरील छोट्या दूध विक्री केंद्रांमध्येही असा प्रकार सुरू असल्याची चर्चा पाटस परिसरात होत आहे.

  • 07 Mar 2026 01:00 PM (IST)

    07 Mar 2026 01:00 PM (IST)

    धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण

    शहरातील नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या चालकाचे तोंड दाबून गाडीत कोंबून अपहरण करण्यात आले. यातच वाहनचालकाला गाडीतच अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमविवाहाच्या वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचा आरोप जखमी दिव्यांग युवकाने केला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 07 Mar 2026 12:55 PM (IST)

    07 Mar 2026 12:55 PM (IST)

    शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

    शाळा हे ज्ञानाचे मंदिर मानले जाते. इथे विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी शिकवून उज्वल भविष्यासाठी तयार केले जाते. पण अलिकडेच उत्तर प्रदेशातील शाळेत घडून आलेल्या विचित्र प्रकाराने यूजर्सना नाराज केले आहे. व्हिडिओमध्ये शाळेची मुख्याध्यापिका शिकणाचे धडे द्यायचे सोडून विद्यार्थ्यांकडून बाॅडी मसाज घेताना दिसून आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून वेगाने त्याला इंटरनेटवर शेअर केले जात आहे.

  • 07 Mar 2026 12:50 PM (IST)

    07 Mar 2026 12:50 PM (IST)

    ‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei ) यांच्या मृत्यूचे जगभरात पडसाद उमटले आहेत. जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिकेचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही मोठा गोंधळ उडालेला आहे. पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांनी पुकारलेलेल्या आंदोलनाला हिंसकरुप मिळाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

  • 07 Mar 2026 12:45 PM (IST)

    07 Mar 2026 12:45 PM (IST)

    Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन

    डोंबिवली पूर्वेतील दत्तनगरमधील प्रगती कॉलेजमध्ये लायब्ररी शिपाई प्रवीण चौधरी यांनी चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्राचार्यांसोबत चर्चा सुरू असताना त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

  • 07 Mar 2026 12:40 PM (IST)

    07 Mar 2026 12:40 PM (IST)

    आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

    इमर्जन्सी कॉलवर सर्वात आधी पोहोचणाऱ्या मुंबई पोलिसांना लवकरच बॉडी-वॉर्न कॅमेरे मिळणार आहेत. पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणारे हे कॅमेरे त्यांच्या कामकाजाचे थेट रेकॉर्डिंग करणार असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीत अधिक पारदर्शकता येणार आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये अशा प्रकारचे बॉडी कॅमेरे वापरले जातात आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांमध्येही ही प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे घटनास्थळी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणे शक्य होणार आहे.

  • 07 Mar 2026 12:40 PM (IST)

    07 Mar 2026 12:40 PM (IST)

    युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

    कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Nubia Neo 5 GT मध्ये बिल्ट-इन एक्टिव कूलिंग फॅन आहे आणि थर्मल मैनेजमेंटसाठी 29,508mm स्क्वायर कूलिंग चेंबर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 80W पर्यंत जलद चार्जिंग सपोर्टसह 6,210mAh बॅटरी आहे.

  • 07 Mar 2026 12:35 PM (IST)

    07 Mar 2026 12:35 PM (IST)

    ‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा

    राज्यात स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्ट्रोक उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आयुष्मान भारत योजनेंतर्गत स्ट्रोक उपचारांसाठी थ्रोम्बोलिसिस, समर्पित स्ट्रोक केअर युनिट्स आणि मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीसारख्या प्रगत उपचारांचा समावेश केल्याने रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंडियन मेडिकल पार्लमेंटेरियन्स फोरम (आयएमपीएफ) आणि युरोपियन बिझनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत आयोजित महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये ते बोलत होते.

  • 07 Mar 2026 12:30 PM (IST)

    07 Mar 2026 12:30 PM (IST)

    विश्वविजेत्याला संघावर होणार पैशांचा पाऊस! जाणून घ्या T20 विश्वचषकात कोणत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार?

    India vs New Zealand Final 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर येतील. हा सामना 8 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ तिसरा टी-20 ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल, तर न्यूझीलंड पहिला विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल. जिंकणाऱ्या संघावर पैशांचा वर्षाव केला जाईल, तर पराभूत संघही श्रीमंत होईल.

  • 07 Mar 2026 12:25 PM (IST)

    07 Mar 2026 12:25 PM (IST)

    Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

    माथेरान शहरात पर्यावरण स्नेही स्वच्छतागृह बसवले जात आहेत. माथेरान नगरपरिषदेने खरेदी केलेल्या स्वच्छतागृह यांचा गैरव्यवहार झाला असल्याचा विषय सध्या गाजत आहे. ही सर्व चर्चा सुरु असतानाच त्यातील नगरपालिकेचे एक स्वच्छतागृह हे शहरातील स्टेशन परिसरात वन विभागाच्या जमिनीवर आणून ठेवण्यात आले आहे. त्या ई-स्वच्छतागृहबद्दल सर्वत्र चर्चा वाढत असून वनविभागाने आपल्या जमिनीवर नगरपालिकेचे स्वच्छतागृह ठेवून दिल्याने माथेरानमध्ये वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

  • 07 Mar 2026 12:20 PM (IST)

    07 Mar 2026 12:20 PM (IST)

    लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

    भारतामध्ये सर्व वयोगटांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. लठ्ठपणा हा फक्त दिसण्याशी किंवा शरीराच्या आकाराशी संबंधित प्रश्न नाही. लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडांच्या समस्यांचा धोका वाढतो. या आजारांमुळे व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त निरोगी राहण्याचा आणि योग्य वजन राखण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.

  • 07 Mar 2026 12:15 PM (IST)

    07 Mar 2026 12:15 PM (IST)

    T20 World Cup 2026 Final मध्ये भारताच्या संघाला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी! न्यूझीलंडची नजर पहिल्या ट्रॉफीवर

    २०२६ च्या टी-२० विश्वचषक फायनलच्या सामन्याला काही तास शिल्लक राहिले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये हा फायनलचा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघ एक-दोन नव्हे तर तीन वेळा इतिहास रचू शकतो. दरम्यान, न्यूझीलंड संघाची नजर पहिल्या ट्रॉफीवर असेल. स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल आणि टॉस संध्याकाळी ६:३० वाजता होईल.

  • 07 Mar 2026 12:10 PM (IST)

    07 Mar 2026 12:10 PM (IST)

    फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त

    मौजमजेसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत १५ लाख रुपये आहे. चोरट्यांनी कोथरूड, उत्तमनगर, वारजे, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, बावधन, तसेच ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

  • 07 Mar 2026 12:01 PM (IST)

    07 Mar 2026 12:01 PM (IST)

    फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त, पोलिस तपासात…

    मौजमजेसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत १५ लाख रुपये आहे. चोरट्यांनी कोथरूड, उत्तमनगर, वारजे, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, बावधन, तसेच ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

  • 07 Mar 2026 11:51 AM (IST)

    07 Mar 2026 11:51 AM (IST)

    ’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो

    गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठा ठप्प होण्याचे संकट भारतावर ओढावले होते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाकडून खनिज तेल (Crude Oil) विकत घेण्याची तात्पुरती परवानगी दिली. त्यावरून आता भारतातही राजकारण तापलं आहे. “भारताने कोणाकडून तेल विकत घ्यायचे, एखाद्या दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष हे कसे सांगू शकतो? भारताला आता प्रत्येक गोष्टीसाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागणार, देशाच्या इतिहासात अशी वेळ कधीची आली नव्हती,” अशा शब्दांत विरोधी पक्षांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत.

  • 07 Mar 2026 11:41 AM (IST)

    07 Mar 2026 11:41 AM (IST)

    मध्यपूर्वेत हाहा:कार! पाकिस्तानची उडाली झोप; मुनीरने सौदीसोबत आखला

    मध्यपूर्वेत अमेरिका (America) आणि इराणमधील तणावाने भंयकर अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला त्यांच्यावर हल्ल्याची भितीही निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांची भेट घेतली होती.

  • 07 Mar 2026 11:31 AM (IST)

    07 Mar 2026 11:31 AM (IST)

    OnePlus 15 सारखी डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स… ‘या’ कंपनीच्या नव्या स्मार्टफोनने

    हाँगकाँगस्थित चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी itel ने भारतात त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन itel Zeno 100 या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन बजेट रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8 हजार रुपयांहून कमी आहे. itel Zeno 100 ची डिझाईन काही प्रमाणात OnePlus 15 प्रमाणे असल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या डिझाईन तुलना केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, डिझाईन बऱ्याच प्रमाणात एक सारखी दिसत आहे. फोनचा लूक देखील काही प्रमाणात OnePlus 15 सारखा असल्याचा दावा केला जात आहे.

  • 07 Mar 2026 11:21 AM (IST)

    07 Mar 2026 11:21 AM (IST)

    आखाती देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना ‘धक्का’! सौदी-कुवेतमध्ये इराणचा महाविनाश

    मध्यपूर्वेतील युद्ध (Middle East War) आता अशा वळणावर पोहोचले आहे जिथे केवळ शत्रूच नाही, तर अमेरिकेचे सर्वात जवळचे मित्रही आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. इराणवर केलेल्या सुरुवातीच्या हल्ल्याची पूर्वकल्पना न दिल्याने सौदी अरेबिया आणि कुवेत यांसारख्या आखाती देशांनी अमेरिकेवर ‘विश्वासघाताचा’ गंभीर आरोप केला आहे. या धोरणात्मक चुकीमुळे आता सौदी आणि कुवेतच्या भूमीवर इराणच्या क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असून, या प्रदेशात अभूतपूर्व विनाश पाहायला मिळत आहे

  • 07 Mar 2026 11:11 AM (IST)

    07 Mar 2026 11:11 AM (IST)

    वाढदिवशी मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही; संतापातून युवकाने घेतला टोकाचा निर्णय

    सिंधुदुर्ग येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वाढदिवसादिवशी महागडा मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आर्यन सुभाष रवंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • 07 Mar 2026 11:01 AM (IST)

    07 Mar 2026 11:01 AM (IST)

    खरंच Petrol – Diesel संपणार? HPCL आणि BPCL ने दिली मोठी अपडेट

    आजकाल सोशल मीडिया आणि What’s App वर पसरणाऱ्या अफवा कधीकधी प्रत्यक्ष संकटापेक्षाही धोकादायक ठरू शकतात. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या बातम्या पसरत आहेत, ज्यामुळे जनतेमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा दिसत आहेत. पण भारतात खरोखरच इंधन संपणार आहे का? देशातील आघाडीच्या तेल कंपन्या, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी या गंभीर परिस्थितीवर आपले मौन सोडले आहे आणि नागरिकांना एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला आहे.

  • 07 Mar 2026 10:52 AM (IST)

    07 Mar 2026 10:52 AM (IST)

    Dale Steyn ची भविष्यवाणी…

    किवी संघ आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपद जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे, परंतु कधीही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. न्यूझीलंडचे आतापर्यंतचे एकमेव आयसीसी विजेतेपद म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. न्यूझीलंडने अद्याप विश्वचषक किंवा टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. डेल स्टेनने असेही म्हटले की न्यूझीलंडने विजेतेपद जिंकावे अशी त्याची खरोखर इच्छा आहे. तथापि, अहमदाबादमध्ये ते भारतावर मात करतील हे “अशक्य” आहे.

  • 07 Mar 2026 10:46 AM (IST)

    07 Mar 2026 10:46 AM (IST)

    एपस्टीन फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव

    अमेरिकेच्या न्याय विभागाने कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित नवीन कागदपत्रे जारी केली आहेत. यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आहेत. एफबीआयने पीडितेच्या तीन मुलाखती घेतल्या, ज्या न्याय विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार, एपस्टीनने त्या मुलीला ट्रम्प यांच्याकडे नेले होते आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी किशोरवयीन असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप करण्यात आला आहे.

  • 07 Mar 2026 10:38 AM (IST)

    07 Mar 2026 10:38 AM (IST)

    बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या

    बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानक परिसरातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नौशाद असे आहे. तो गांधीनगर भागाचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या जवळ आढळला.

  • 07 Mar 2026 10:31 AM (IST)

    07 Mar 2026 10:31 AM (IST)

    तासगावच्या द्राक्ष संशोधन केंद्राकडे दुर्लक्ष का?

    राज्यातील प्रमुख द्राक्ष पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीचा मुद्दा राज्य विधानसभेच्या अधिवेशनात जोरदारपणे मांडला गेला. सांगली जिल्ह्यातील आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी लक्षवेधीद्वारे द्राक्ष उत्पादन, नियांत अडथळे, संशोधन केंद्र आणि आयात धोरणाच्या प्रश्नांवर शासनाला धारेवर धरले. सांगली जिल्हा हा राज्यातील द्राक्ष उत्पादनासाठी अग्रस्थानी असलेला जिल्हा मानला जातो.

  • 07 Mar 2026 10:22 AM (IST)

    07 Mar 2026 10:22 AM (IST)

    नव्या Motorola स्मार्टफोनने भारतात केली एंट्री!

    टेक कंपनी मोटोरोलाने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच तेला आहे. कंपनीने दमदार प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेऱ्यासह Motorola Edge 70 Fusion स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल LYTIA 710 प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला (OIS) सपोर्ट करतो. मोटोरोलाने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटवाला अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनची किंमत मिड रेंज किंमतीत उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन मोटोरोला एज 70 फ्यूजन स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • 07 Mar 2026 10:15 AM (IST)

    07 Mar 2026 10:15 AM (IST)

    युद्धासाठी ट्रम्प यांची तिसरी सामर्थ्यशाली युद्धनौका सज्ज

    अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा (US-Israel Iran War) आज आठवा दिवस असून हे युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपली सर्वात मोठी शक्ती म्हणजेच ‘यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश’ ही तिसरी विमानवाहू युद्धनौका (Aircraft Carrier) इराणच्या समुद्रकिनाऱ्याकडे रवाना केली आहे. २००३ मधील इराक युद्धानंतर अमेरिकेने एकाच वेळी तीन युद्धनौका युद्धभूमीवर तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे युद्धाचा भडका अधिक उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 07 Mar 2026 09:59 AM (IST)

    07 Mar 2026 09:59 AM (IST)

    भारताचे संभाव्य इंधन संकट तूर्तास टळले

    वॉशिंग्टन : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल संकटादरम्यान अमेरिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने रशियाला ३० दिवसांसाठी भारताला तेल विकण्याची तात्पुरती सूट दिली आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून समुद्रात अडकलेल्या रशियन तेल जहाजांना आणि भारतालाही दिलासा मिळेल, ज्यामुळे इंधन संकट कमी होईल. इराण युद्धादरम्यान जागतिक तेल बाजारावरील दबाव कमी करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

  • 07 Mar 2026 09:55 AM (IST)

    07 Mar 2026 09:55 AM (IST)

    पुण्यातील आर्यन बांगडेची सैन्य दलात निवड

    नुकत्याच जाहीर झालेल्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक्निकल) परीक्षेच्या निकालात पुण्यातील आर्यन बांगडे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत त्याने संपूर्ण देशात २० व्या क्रमांक पटकावला असून लवकरच तो प्रशिक्षणासाठी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया येथे दाखल होणार आहे.या निवड प्रक्रियेसाठी आर्यनने लेखी परीक्षेबरोबरच सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतही यशस्वीरीत्या पूर्ण केली. या यशासाठी त्याला बिबवेवाडी येथील अचीव्हर अकॅडमीचे आशिष आगाशे आणि चिन्मय जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे सुमारे ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्यन बांगडे भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर रुजू होणार आहे.
  • 07 Mar 2026 09:52 AM (IST)

    07 Mar 2026 09:52 AM (IST)

    ट्रम्प यांचा इराणविरुद्ध ‘धर्मयुद्ध प्लॅन’?

    US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन : सध्या मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये तीव्र संघर्षाचे वातावरण आहे. याच वेळी इराणशी युद्धादरम्यान अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील ओव्हल ऑफिसमध्ये एक घटना घडली आहे. ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. ओव्हल ऑफिसमध्ये एक प्रार्थना करण्यात आली होती. या प्रार्थनेमुळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणविरुद्ध धर्मयुद्ध छेडण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

  • 07 Mar 2026 09:47 AM (IST)

    07 Mar 2026 09:47 AM (IST)

    Iran-US War: युद्धासाठी ट्रम्प यांची तिसरी सामर्थ्यशाली युद्धनौका सज्ज

    USS George H.W. Bush deployed to Iran 2026 : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा (US-Israel Iran War) आज आठवा दिवस असून हे युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपली सर्वात मोठी शक्ती म्हणजेच ‘यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश’ ही तिसरी विमानवाहू युद्धनौका (Aircraft Carrier) इराणच्या समुद्रकिनाऱ्याकडे रवाना केली आहे. २००३ मधील इराक युद्धानंतर अमेरिकेने एकाच वेळी तीन युद्धनौका युद्धभूमीवर तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे युद्धाचा भडका अधिक उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Maharashtra breaking news 7th march live updates maharashtra politics crime cricket sports entertainment national international war world war3 us israel iran war breaking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • national news
  • pune news

संबंधित बातम्या

‘नाथजल’ 15 रुपयांनाच द्या, अन्यथा…; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम
1

‘नाथजल’ 15 रुपयांनाच द्या, अन्यथा…; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आता ‘प्रहार’चे काय होणार?
2

मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आता ‘प्रहार’चे काय होणार?

PMPML News : ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप
3

PMPML News : ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप

International Dance Day: अल्लू अर्जुनपासून ऋतिकपर्यंत; ‘या’ 5 सुपरस्टार्सनी आपल्या स्टेप्सवर देशाला थिरकायला लावलं!
4

International Dance Day: अल्लू अर्जुनपासून ऋतिकपर्यंत; ‘या’ 5 सुपरस्टार्सनी आपल्या स्टेप्सवर देशाला थिरकायला लावलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.