Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRIS Dena: अमेरिकेच्या ‘Torpedoचा डेडली अटॅक, Iranची ‘आयरिस डेना’ खाक; मात्र भारताचे INS Tarangini ‘असे’ ठरले इराणसाठी वरदान

Iranian Frigate IRIS Dena : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हिंदी महासागरात बुडालेल्या इराणी फ्रिगेट आयरिस डेना शोधण्यासाठी भारतीय नौदलाने एक जहाज तैनात केले आहे. एका विमानाला सज्ज ठेवण्यात आले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 06, 2026 | 10:34 AM
indian navy rescue operation iranian frigate iris dena us torpedo attack

indian navy rescue operation iranian frigate iris dena us torpedo attack

Follow Us
Follow Us:
  • युद्धनौकेवर टॉर्पेडो हल्ला
  • भारतीय नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन
  • मानवतावादी मदत

US submarine sinks Iranian frigate IRIS Dena : मध्यपूर्वेतील इराण-अमेरिका युद्धाचा भडका (Israel Iran war) आता चक्क भारताच्या शेजारी असलेल्या हिंदी महासागरात येऊन पोहोचला आहे. ४ मार्च रोजी श्रीलंकेच्या गॅले किनारपट्टीपासून काही अंतरावर अमेरिकन पाणबुडीने इराणच्या ‘आयरिस डेना’ (IRIS Dena) या फ्रिगेटवर भीषण टॉर्पेडो हल्ला केला. या हल्ल्यात इराणी युद्धनौका जलसमाधी घेत असतानाच, भारतीय नौदलाने राजकारण बाजूला ठेवून मानवतेच्या दृष्टिकोनातून एक मोठी बचाव मोहीम हाती घेतली आहे. भारताची ही तत्परता सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.

काय घडलं नेमकं? अमेरिकेचा ‘मूक टॉर्पेडो’ प्रहार

बुधवारी सकाळी आंतरराष्ट्रीय पाण्यातून प्रवास करणाऱ्या इराणी फ्रिगेटला अमेरिकेच्या एका आधुनिक पाणबुडीने लक्ष केले. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या कारवाईची पुष्टी करताना याला ‘सायलेंट टॉर्पेडो किल’ (Silent Torpedo Kill) असे संबोधले आहे. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा हा एक महत्त्वाचा विस्तार असून, इराणची सागरी ताकद मोडून काढण्यासाठी ही कारवाई केल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे. स्फोट झाल्यानंतर काही वेळातच इराणी जहाज समुद्राच्या तळाशी गेले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warship: अखेर त्यालाही युद्धात चान्स मिळणार? इराण युद्धाच्या धगीत 5,000 टनी अणू-विनाशकासह उत्तर कोरियाची समुद्रात एन्ट्री

भारतीय नौदलाची चित्तथरारक बचाव मोहीम

४ मार्च रोजी सकाळी जेव्हा कोलंबोमधील सागरी बचाव समन्वय केंद्राला (MRCC) आयरिस डेनाकडून ‘डिस्ट्रेस सिग्नल’ (संकटाचा संदेश) मिळाला, तेव्हा भारतीय नौदल क्षणाचाही विलंब न लावता कामाला लागले. जवळच तैनात असलेल्या भारतीय प्रशिक्षण जहाज आयएनएस तरंगिनी (INS Tarangini) ला तातडीने मार्ग बदलून शोध क्षेत्रात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. दुपारी ४ वाजेपर्यंत हे जहाज घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली.

इतकेच नाही तर कोचीहून आयएनएस इक्षक (INS Ikshak) हे सर्वेक्षण जहाज देखील मदतीसाठी रवाना करण्यात आले आहे. भारतीय नौदलाची लांब पल्ल्याची सागरी गस्त विमाने आकाशातून समुद्राच्या कानाकोपऱ्यात बेपत्ता इराणी खलाशांचा शोध घेत आहेत. भारताने केवळ एक नाही, तर दोन विमाने या ऑपरेशनसाठी सज्ज ठेवली आहेत.

BREAKING: First statement from Indian Navy on Iranian Frigate which was sunk by US submarine in Indian Ocean. PRESS RELEASE Indian Navy SAR Efforts
IRIS DENA
A distress call from IRIS Dena was received at the MRCC Colombo in the early hours of 04 March 26 as reported by the… pic.twitter.com/zMom3yw3X0 — Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) March 5, 2026

credit – social media and Twitter

श्रीलंका आणि भारताचा समन्वय

हा हल्ला श्रीलंकेच्या शोध आणि बचाव क्षेत्रात (SAR) येणाऱ्या गॅलेपासून २० नॉटिकल मैल अंतरावर झाला आहे. श्रीलंकेची जहाजे घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जहाज बुडाले होते, त्यामुळे आता भारतीय नौदलाची भूमिका कळीची ठरली आहे. भारतीय अधिकारी आणि श्रीलंकेचे नौदल अधिकारी सातत्याने संपर्कात असून, समुद्रात वाहून गेलेल्या खलाशांना शोधण्यासाठी अत्याधुनिक रडार आणि सोनार यंत्रणेचा वापर केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी

भारताची भूमिका: राजकारण की मानवता?

अमेरिका हा भारताचा धोरणात्मक मित्र आहे, तर इराणशीही भारताचे जुने संबंध आहेत. अशा वेळी अमेरिकेने बुडवलेल्या जहाजाच्या मदतीला धावून जाणे, हे भारतीय नौदलाच्या ‘सेवेचे’ आणि ‘मानवतावादी’ धोरणाचे प्रतीक मानले जात आहे. “आम्ही केवळ मदतीसाठी आलेल्या हाकेला प्रतिसाद देत आहोत,” असे नौदलाच्या निवेदनातून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे हिंदी महासागरात तणाव वाढला असून भारताने आपली सागरी सुरक्षा देखील कडक केली आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणची कोणती युद्धनौका बुडवली?

    Ans: अमेरिकन पाणबुडीने इराणची प्रगत फ्रिगेट 'आयरिस डेना' (IRIS Dena) ही टॉर्पेडो हल्ल्यात बुडवली आहे.

  • Que: भारतीय नौदलाची कोणती जहाजे शोध मोहिमेत आहेत?

    Ans: भारतीय नौदलाने आयएनएस तरंगिनी (INS Tarangini) आणि सर्वेक्षण जहाज आयएनएस इक्षक (INS Ikshak) या मोहिमेसाठी तैनात केली आहेत.

  • Que: हा हल्ला नेमका कुठे झाला?

    Ans: हा हल्ला श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील गॅले (Galle) पासून सुमारे ४० नॉटिकल मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय पाण्यात झाला आहे.

Web Title: Indian navy rescue operation iranian frigate iris dena us torpedo attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • America
  • international news
  • iran
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
1

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !
3

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !

Russia-Middle East : मध्यपूर्वेच्या रणधुमाळीत रशियाची एंट्री; लावरोव्ह म्हणाले, ‘मॉस्को मदतीसाठी तयार’
4

Russia-Middle East : मध्यपूर्वेच्या रणधुमाळीत रशियाची एंट्री; लावरोव्ह म्हणाले, ‘मॉस्को मदतीसाठी तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.