नवी दिल्ली – ट्विटरसोबतचा करार मोडल्याबद्दल कंपनीने टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४४ अब्ज डॉलरच्या कराराचा भंग केल्याबद्दल ट्विटरने मस्कविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. ही बातमी कळताच मस्क यांनी देखील लागलीच प्रतिक्रिया दिली आहे. थेट ट्विटरचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे कंपनीची ट्विट करून खिल्ली उडवली. त्यात म्हटले की, ‘फक्त विडंबना पहा’ ट्विटरने एलन मस्क यांच्याविरोधात अमेरिकेतील डेलावेअर न्यायालयात खटला दाखल केला आहे. ट्विटरला मस्कने ५४.२० प्रति शेअर डॉलर (सुमारे ४३०० रुपये) या दराने करार पूर्ण करावा अशी इच्छा आहे.
एलन मस्क यांनी ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची घोषणा केली होती. पण नंतर त्यांनी हा करार रद्द केला. ट्विटरने फेक आणि स्पॅम अकाऊंटची संख्या अद्याप उघड केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. हा करार रद्द केल्यानंतर मस्क यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी चार प्रतिमा टाकून एकप्रकारे डीलची खिल्ली उडवली होती. या फोटोत तो म्हणाला होता की, “मी ट्विटर विकत घेऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी बॉट खात्याची माहिती दिली नाही. आता ते मला ट्विटर विकत घेण्यास भाग पाडत आहेत. आता त्यांना बॉट खात्याची माहिती कोर्टात द्यावी लागेल. तर ट्विटर कर्मचार्यांनी एलन मस्कची खिल्ली उडवली होती. मस्कला एस्पर्जरचा आजार असल्याचे म्हटले होते.