Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

पालघर तालुक्याच्या किनारपट्टीवरील दांडी गावात मुले पळवण्यासाठी टोळी आल्याच्या समजूतीने नागरिक प्रचंड संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 09, 2026 | 06:03 PM
Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
Follow Us
Follow Us:
  • मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत;
  • नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
बोईसर / सुशांत संखे : पालघर तालुक्याच्या किनारपट्टीवरील दांडी गावात मुले पळवण्यासाठी टोळी आल्याच्या समजूतीने नागरिक प्रचंड संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. गावातील काही जागरूक नागरिकांनी वेळीच याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोचून पोलिसांनी संशयित व्यक्तींना ताब्यात घेतल्यामुळे गडचिंचले प्रकरणाची पुनरावृत्ती टळली आहे.

पालघर तालुक्यातील दांडी गावामध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास ब्लॅंंकेट विक्रीसाठी रिक्षामधून दोन पुरुष आणि एक महिला अशा तीन व्यक्ती आल्या होत्या. ग्रामपंचायत कार्यालयजवळ उभ्या असलेल्या गावातील शालेय विद्यार्थीनींना या व्यक्ती आपल्या मोबाईलमधून लहान मुलींचे गुपचूप छायाचित्रण करीत असल्याचे मुलींना संशय आल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. गावातील नागरिकांनी ब्लॅंकेट विक्रीसाठी आलेल्या अनोळखी व्यक्तींच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये लहान मुलींची छायाचित्रे सापडली.

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेने संतप्त ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. या अनोळखी व्यक्ती लहान मुले पळविण्याच्या उद्देशाने आल्याच्या संशयाने स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला कळवली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, विभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, सातपाटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उदय सुर्वे, तारापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निवास कणसे आणि मोठ्या संख्येने पोलीसांचा फौजफाटा दांडी गावात दाखल होऊन संशयित तीन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचवून संतप्त झालेल्या नागरिकांची समजूत काढल्यामुळे गडचिंचले प्रकरणाची पुनरावृत्ती टळली. ब्लॅंकेट विक्रीसाठी रिक्षामधून आलेल्या संशयित व्यक्ती या गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील धरमपूर परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद

Web Title: Palghar crime case child abduction gang terrorizes village disaster averted due to citizens vigilance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • crime news
  • latest news
  • Marathi News
  • Palghar news

संबंधित बातम्या

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले
1

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले

Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; ८२७ पैकी ७३४ मतांसह वर्चस्व स्पष्ट
2

Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; ८२७ पैकी ७३४ मतांसह वर्चस्व स्पष्ट

पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष, करडे घाटातील गोळीबारात सराईताची हत्या; एक जण गंभीर जखमी
3

पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष, करडे घाटातील गोळीबारात सराईताची हत्या; एक जण गंभीर जखमी

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत
4

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.