Muslim countries opposed Israel's 'Gaza occupation' plan
Muslim countries on Israel’s Gaza Plan : जेरुसेलम : नुकतेच इस्रायलच्या (Israel) सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा सिटी ताब्यात घेण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र बेंजामिन नेतन्याहूंच्या या योजनेला संयुक्त राष्ट्र संघ आणि मुस्लीम देशांकडून विरोध केला जात आहे. गाझामध्ये लाखो पॅलेस्टिनी राहतात. त्यांच्यासाठी ही योजना धोकादायक असल्याचे मानले जात आहे. आज आपण या देशांनी इस्रायलच्या या योजनेवर नेमकं काय म्हटले आहे ते सविस्तर जाणून घेणार आहेत.
US Chian Trade : चीनला घाबरला अमेरिका? ट्रम्प यांनी ड्रॅगनवरील टॅरिफच्या मुदतीत केली ९० दिवसांची वाढ
संयुक्त राष्ट्रसंघाने इस्रायलच्या गाझा सिटी ताब्यात घेण्याच्या योजनेला तीव्र विरोध केला आहे. यामुळे मोठे मानवीय संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली आहे. या योजनेअंतर्ग लोकांचे सक्तीने विस्थापन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे हत्याकांड वाढेल असे UN ने म्हटले आहे.
तसेच इस्रायलच्या या निर्णयाला सौदी अरेबिया, पाकिस्तान, कतार, कुवैतसह अनेक मुस्लिम राष्ट्रांनी तसेच इस्लामिक सहकार्य संघटनेने (OIC) देखील विरोध दर्शवला आहे. यामुळे गाझामध्ये मानवी संकट वाढण्याची शक्यता या राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. तसेच इस्रायलच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन मानले आहे. तसेच पॅलेस्टिनींनी स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या योजनेत नेतन्याहू अडथळा निर्माण करत असल्याचे म्हटले आहे.
सौदी अरेबिया –
सौदीने इस्रायलच्या योजनेला तीव्र विरोध केला आहे. हा निर्णय गाझामध्ये उपासमारी वाढवणे आणि पॅलेस्टिनी वंश संपवण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. सौदी अरेबियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदाय आणिु सुरक्षा परिषदेने याची गांभीर्याने दखल घ्यावी.
सौदीने म्हटले की, इस्रायलचे हल्ले आणि कायद्याचे उल्लंघन थांबवणे अत्यंत महत्वाचे आहे. असे न झाल्यास गाझाच्या शांततेला धोका निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात नरसंहार वाढण्याची शक्यता सौदीने व्यक्त केली आहे. यामुळे इस्रायलच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन सौदी अरेबियाने केले आहे.
पाकिस्तान
पाकिस्तानने देखील या निर्णयाला पॅलेस्टिनींच्या हिताविरोधात निर्णय मानले आहे. यामुळे गाझीत मानवीय संकट वाढून अशांतता निर्माण होईल असे पाकिस्तानने म्हटले आहे. इस्रायल गेल्या अनेक काळांपासून पॅलेस्टिनींवर राज्य करत असून आता पॅलेस्टिनींची सुटका करण्याची मागणी पाकिस्तान करत आहे.यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला तातडीने हस्तक्षेप करुन तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
कतार
याच वेळी कतारने एक निवेदन जारी करत इस्रायलच्या या योजनेला तीव्र विरोध केला आहे. कतारच्या मते, इस्रायलच्या या निर्णयामुळे गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट होईल. तसेच इस्रायल सतत आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचाही आरोप कतारने केला आहे. याविरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले जात आहे.
कुवैत
मुस्लिम राष्ट्र कुवैतने देखील इस्रायलविरोधी निषेध नोंदवला आहे. इस्रायल आंतरराष्ट्रीय आणि मानवी कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप कुवैतने केला आहे. यामुळे दोन-राष्ट्रंच्या संकल्पनेला धोका वाढेल असे म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाकडे इस्रायलच्या गाझातील कारवाया थांबवण्याचे आवाहन कुवैतने केले आहे.
इस्लामिक सहकार्य संघटना (OIC)
OIC नेही इस्रायलच्या योजनेला विरोध केला असून मोठ्या प्रमाणात लोकांचे विस्थापन होईल असे म्हटले आहे. यामुळे सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट होईल असे संघटनेने म्हटले आहे.यावर संयुक्त राष्ट्राला ठोस पावले उचलण्याचे आवाहन OIC ने केले आहे. इस्रायलच्या गाझातील नरसंहार थांबवणे आणि मानवी मदत पोहोचवण्याचे आवाहन जागतिक स्तरावर केले जात आहे.
तुर्की
याशिवाय तुर्कीने देखील इस्रायलच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ नेतन्याहूंच्या निर्णायाला थांबवण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलच्या निर्णायामुळे मोठ्या सक्तीचे विस्थापन, हत्या आणि प्रचंड विध्वंस होण्याची शक्यता तुर्कीने व्यक्त केली आहे.
‘Gold वर लागणार नाही Tariff’, भारत आणि रशियाशी तणावादरम्यान डोनाल्ड ट्रम्पचे मोठे विधान