
muslim countries stand with india after delhi incident global solidarity
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात तेरा नागरिकांचा मृत्यू, देशभरात शोककळा.
सौदी अरेबिया, युएई, इराण, कतार आणि मालदीवसह मुस्लिम राष्ट्रांनी भारतासोबत एकजुटीचा हात पुढे केला.
सर्व देशांचा दहशतवादाविरुद्ध ठाम निषेध, पीडित कुटुंबांना संवेदना आणि भारताला सहानुभूतीचा संदेश.
Muslim-world backs India after Delhi incident : भारतातील हृदयस्थानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने( Delhi Blast) संपूर्ण देश हादरून गेला आहे. या विनाशकारी घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. देशात शोककळा पसरलेली असताना, आश्चर्यकारक बाब म्हणजे जगातील अनेक मुस्लिम राष्ट्रांनी( Muslim countries) भारताच्या या दुःखात एकजुटीने सहभाग नोंदविला आहे.
या घटनेनंतर मध्यपूर्वेतील प्रमुख देश सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई), इराण, कतार आणि मालदीव यांनी भारतीय जनतेप्रती आपली सहानुभूती व्यक्त केली आहे. दहशतवादाच्या विरोधात उभे राहत त्यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. हे भारतासाठी केवळ राजनैतिक पाठबळ नाही, तर जगभरातून मानवतेचा संदेश देणारे उदाहरण ठरले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेनंतर त्वरित निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की,
“युएई सर्व प्रकारच्या हिंसाचार आणि दहशतवादाच्या कृत्यांचा तीव्र निषेध करते. या गुन्हेगारी हल्ल्याचा उद्देश भारतातील स्थैर्य आणि शांततेला धक्का देणे आहे, आणि आम्ही अशा कृतींचा स्पष्ट शब्दांत विरोध करतो.”
मंत्रालयाने पुढे सांगितले की, ते भारत सरकार, जनते आणि पीडितांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतात, तसेच सर्व जखमी नागरिकांच्या लवकर आरोग्यलाभासाठी प्रार्थना करतात.
सौदी अरेबियानेही नवी दिल्लीतील भारतीय दूतावासामार्फत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे :
“राज्य आपल्या मित्र भारतासोबत पूर्णपणे उभे आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांबद्दल आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. भारत आणि त्याच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रार्थना करतो.”
हा प्रतिसाद केवळ राजनैतिक सौजन्याचा नसून, भारत आणि मध्यपूर्वेतील वाढत्या सहकार्याचे प्रतीक आहे.
इराणच्या नवी दिल्लीतील दूतावासानेही हृदयस्पर्शी निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की,
“कार बॉम्बस्फोटात अनेक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला तीव्र दु:ख झाले आहे. आम्ही सर्व पीडित कुटुंबांना धीर आणि सांत्वन व्यक्त करतो, तसेच जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.”
इराणचा हा प्रतिसाद भारत-इराण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नात्यांची आठवण करून देणारा ठरला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन आणि तिबेटला जोडणारा ‘Hongqi Bridge’ पडल्यानंतर बनला जगभरात चर्चेचा विषय; VIRAL VIDEO मुळे माजली खळबळ
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनीही सोशल मीडियावरून भारतासोबत एकतेचा संदेश दिला. त्यांनी लिहिले :
“दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल आम्ही अतिशय दुःखी आहोत. शोकग्रस्त कुटुंबांना आमच्या संवेदना आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी आमच्या प्रार्थना. या कठीण काळात मालदीव भारतासोबत ठामपणे उभा आहे.”
ही संपूर्ण घटना केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगभरातील शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व देशांसाठी एक इशारा ठरली आहे. भारताच्या सुरक्षाव्यवस्थेला मोठे आव्हान देणाऱ्या या हल्ल्याचा मुस्लिम राष्ट्रांनी केलेला एकमताने निषेध हे दाखवते की, आजचा मुस्लिम जग दहशतवादाला पाठिंबा देत नाही; उलट तो त्याचा विरोधक आहे.
मानवतेच्या नावावर उभ्या राहिलेल्या या एकजुटीने भारताच्या परराष्ट्र संबंधांना नवे बळ मिळेल अशी आशा आहे.