G20 शिखर परिषदत नरेंद्र मोदींनी घेतली चिली आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींची भेट; 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवर केली चर्चा
रिओ दि जानेरो: पंतप्रधान मोदी सध्या साऊथ ग्लोबल दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी नाजेरिया आणि ब्राझील या देशांना G-20 परिषदेदरम्यान भेट दिली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रिओ दि जानेरो येथे G20 परिषदेत ते सहभागी झाले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी संबंध दृढ करम्यावर भर देत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे चिलीसोबत विविध क्षेत्रांतील संबंध अलीकडे अधिक दृढ होत चालले आहेत. या चर्चेदरम्यान मोदींनी औषधनिर्मिती औषधनिर्माण, तंत्रज्ञान, अवकाश आणि इतर क्षेत्रांमधील संबंध आणखी कसे दृढ करता येतील यावर लक्ष्य केंद्रित केले. याशिवाय चिलीमध्ये आयुर्वेद प्रॅक्टिक मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळे या क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यावर नेत्यांनी चर्चा केली. यासंबंधित एक पोस्ट नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे.
Met the President of Chile, Mr. Gabriel Boric Font in Rio de Janeiro. India’s ties with Chile are getting stronger across various sectors. Our talks focused on how to deepen relations in pharmaceuticals, technology, space and more. It is gladdening to see Ayurveda gaining… pic.twitter.com/9TxtrbXnb1
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2024
अर्जेंटिनाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांची भेट
चिलीच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीनंतर मोदींनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मेली यांची देखील भेट घेतली. त्यांनी अर्जेंटिना आणि भारत यांच्या द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर भर दिला. नेरंद्र मोदींनी या भेटीदरम्यान जेवियर मेली यांच्या शी चर्चा करताना म्हटले की, “माझी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांच्याशी छान भेट झाली. अर्जेंटिनाशी भारताची घनिष्ठ मैत्री आहे. आमच्या धोरणात्मक भागीदारीला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत, यामुळे द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी उर्जा संरक्षण उत्पादन, व्यापार आणि संस्कृतीत संबंध वाढविण्याच्या गोष्टींवर चर्चा केली.
Had an outstanding meeting with President Javier Milei of Argentina. India cherishes the close friendship with Argentina. Our Strategic Partnership marks 5 years, adding immense vibrancy to bilateral relations. We talked about enhancing ties in energy, defence production, trade… pic.twitter.com/xepTJgyiDQ
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2024
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी मोंदींची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्टेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी देखील G-20 परिषदेदरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. मोदींनी याबाबत आपल्या सोशल मीडियाच्या एक्स हॅंडलवर फोटे देखील शेअर केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “आज भारत-ऑस्ट्रेलियाची दुसरी वार्षिक शिखर बैठक खूप चांगली झाली. गेल्या दोन वर्षांत माझ्या मित्र अल्बानीजसोबतची ही माझी 11 वी बैठक होती. दोन्ही देशाच्या विकासासाठी द्विपक्षीय संबंधांमध्ये हे एक मोठे पाऊल आहे.” तसेच या भेटीदरम्यान दोन्ही प्रमुखांनी ऑस्ट्रेलिया-भारत आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारच्या वाढत्या विकासावर सविस्तर चर्चा केली.
Sharing my remarks during meeting with PM Albanese of Australia. @AlboMP https://t.co/UGsT1mpWhJ
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2024