Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील देवरिया येथील मर्चेंट नेव्ही अधिकारी राकेश चौहान यांचा वेनेझुएला येथे संशयास्पद मृत्यू झाला. भारतातील शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरातून हृदय, मेंदू आणि किडनीसह २१ अवयव गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 01, 2026 | 04:33 PM
धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! (Photo Credit - X)

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं!
  • शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब
  • नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडवून देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. मर्चेंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय राकेश चौहान यांचा व्हेनेझुएला (Venezuela) येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. मृत्यूच्या तब्बल एका महिन्यानंतर, ४ जून रोजी राकेश यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचले. मात्र, जेव्हा कुटुंबियांनी मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शिपिंग कंपनीने राकेश यांची हत्या करून त्यांच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. आता भारतामध्ये झालेल्या दुसऱ्या शवविच्छेदन अहवालातून हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून राकेश यांच्या शरीरातील चक्क २१ अवयव गायब असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतून आलेल्या एका फोनने कुटुंब उद्ध्वस्

राकेश चौहान हे नोव्हेंबर २०२५ मध्ये मर्चेंट नेव्हीच्या माध्यमातून व्हेनेझुएला येथे जहाजावर नोकरीसाठी गेले होते. ते आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. २०२३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांना अवघ्या ६ महिन्यांचे एक लहान मूल आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना, अचानक कुटुंबियांना मुंबईतील शिपिंग कंपनीच्या कार्यालयातून एक फोन आला. राकेश हे जहाजावरून खाली पडले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या प्रकृतीची चिंताजनक माहिती देण्यात आली आणि संध्याकाळपर्यंत त्यांच्या मृत्यूची बातमी धडकली. या बातमीमुळे संपूर्ण चौहान कुटुंब उद्ध्वस्त झाले.

स्थानिक डॉक्टरांचा नकार; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुन्हा पोस्ट-मॉर्टम

४ जून रोजी राकेश यांचे पार्थिव देवरिया येथे आणण्यात आले. स्थानिक डॉक्टरांच्या पथकाने पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाची पाहणी केली असता, त्यावर आधीच शवविच्छेदन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासकीय आदेशाशिवाय पुन्हा शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा दंडाधिकारी यांनी विशेष आदेश जारी केले. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या शवविच्छेदन अहवालाने वैद्यकीय क्षेत्रासह तपास यंत्रणांनाही हादरवून सोडले. राकेश यांच्या शरीराच्या आतील सर्वच्या सर्व मुख्य अवयव गायब होते.

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?

FSUI चा मोठा खुलासा आणि…

‘फेडरेशन ऑफ सीफेरर्स युनियन ऑफ इंडिया’ (FSUI) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत या डरावण्या सत्याला वाचा फोडली आहे. अहवालानुसार, राकेश यांच्या शरीरातून खालील अवयव काढण्यात आले होत. मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, यकृत, दोन्ही किडनी तसेच प्लीहा, स्वादुपिंड, जठर, आतडे, थायरॉईड, हायॉइड, लॅरिंक्स आणि ट्रॅकिया. तसेच मृतदेहावर मानेपासून खालपर्यंत २२ टाके आणि कानापासून कानापर्यंत २१ टाके मारलेले होते. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. मृतदेह सुमारे एक महिना डीप फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. भारतीय नाविक परदेशात बळीचे बकरं बनत असल्याचा संताप व्यक्त करत FSUI ने या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे.

न्यायासाठी पीडित कुटुंबाची सरकारकडे आळवणी

काही आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्या आणि मानवी अवयव तस्करांच्या टोळीने मिळून हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाने आता जिल्हा प्रशासन, उत्तर प्रदेश सरकार, नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालय आणि वेनेझुएला येथील भारतीय दूतावासाकडे न्यायाची गुहार लावली आहे. या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याचा छडा लावून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी संपूर्ण देवरिया जिल्ह्यातून होत आहे.

Russia Jobs: दुबई-सौदीला टक्कर! रशियात भारतीय कामगारांची चांदी, रस्ते साफ करणाऱ्यालाही 90 हजार रुपये पगार; वाचा सविस्तर अपडेट

Web Title: Merchant navy officer rakesh chauhan suspicious death 21 organs missing post mortem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • international news
  • Navy
  • Uttar Pradesh
  • Venezuela

संबंधित बातम्या

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
1

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद
2

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
3

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.