Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flash Flood : पाऊस नाही, तरी महापूर! हिमालयातून अचानक आलेल्या जलप्रलयाचे गूढ काय?

Nepal Flash Flood : नेपाळमध्ये पाऊस नसतानाही अचानक आलेल्या महापुराने सर्वांनाच धक्का दिला. हिमालयातील हिमनदीचे सरोवर फुटणे म्हणजेच GLOF ही अशा अचानक पुरामागची संभाव्य कारणांपैकी एक आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 26, 2026 | 04:43 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • GLOF म्हणजे नेमकं काय ?
  • पाऊस नसताना पूर कसा ?
  • GLOF इतका धोकादायक का ?
  • हवामान बदलाचा संबंध आहे का ?
Nepal Flash Flood : नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळची त्रेधातिरपीट उडाली आहे . पुराच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आजूबाजूचे वातावरण एकदम स्वच्छ दिसत आहे . त्यामुळे बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला आहे कि , पाऊस नसताना एवढा मोठा पूर कसा आला . याचीच उत्तरे जाणून घेऊयात .

GLOF म्हणजे नेमकं काय ?

GLOF = Glacial Lake Outbrust Flood , मराठीत याला हिमनदीजन्य सरोवराचा अचानक उद्रेक होऊन येणारा पूर असे म्हणता येईल . हिमालयात हिमनद्या वितळताना त्यांच्या जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून हिमनदीचे सरोवर ( Glacial Lake ) तयार होते . या सरोवराला अनेकदा बर्फ , दगड ,मातीचा नैसर्गिक बांध अडवून ठेवते .

जेव्हा हा नैसर्गिक बांध अचानक फुटतो तेव्हा हिमनदी वितळते , सरोवरात पाणी वाढते तसेच नैसर्गिक बांधावर दबाव वाढतो आणि बांध फुटतो. प्रचंड वेगाने पाणी खाली येते . Flash Flood या पाण्यासोबत दगड माती झाडे आणि इतर ढिगाराही वाहून येऊ शकतात . त्यामुळे GLOF साध्या नदीच्या पुरापेक्षा अधिक विध्वंसक असतो .

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

पाऊस नसताना पूर कसा ?

हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे . समजा डोंगराच्या वर हजारो लाखो घनमीटर पाणी साचले आहे . खाली गावात त्या क्षणी एक थेंबही पाऊस पडला नसला तरी वरच्या भागातील सरोवराचा बांध फुटला , तर ते संपूर्ण पाणी काही मिनिटात किंवा तासात नदीत येऊ शकते . म्हणून पूर येण्यासाठी त्या ठिकाणी पाऊस पडणे आवश्यक नाही .

नेपाळच्या सध्याच्या घटनेत भोटेकोशी नदीत सकाळी सुमारे ९ वाजता अचानक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि रसुवा जिल्यातील तिमरे स्याफ्रुबेसीसह परिसराला मोठा फटका बसला . स्थानिक पावसामुळे हा पूर आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

GLOF इतका धोकादायक का ?

कारण हा अचानक आणि अत्यंत वेगाने येणारा असतो . सामान्य पावसाच्या पुरात पाण्याची पातळी हळूहळू वाढण्याची शक्यता असते . त्यामुळे प्रशासनाला काही वेळ मिळू शकतो . पण GLOF मध्ये वरच्या भागातील नैसर्गिक बांध अचानक फुटल्यास खालील नदीत काही वेळातच प्रचंड पाण्याचा लोंढा येऊ शकतो . याशिवाय हिमालयातील नद्या खोल दऱ्यांमधून वाहतात .त्यामुळे पाण्याचा वेग आणि विध्वंसक शक्ती आणखी वाढू शकते .

हवामान बदलाचा संबंध आहे का ?

यामागे हवामान बदलाचा धोका असू शकतो . धोका वाढण्यामागे हवामान बदल हा एक महत्वाचा घटक मानला जातो . पण प्रत्येक GLOF चे थेट कारण हवामान बदल आहे असे म्हणता येणार नाही . तापमान वाढल्यामुळे हिमनद्या मागे सरकतात . आणि काही ठिकाणी हिमनद्यांच्या आसपासची सरोवरे मोठी होतात . त्यामुळे अस्थिर सरोवरांची संख्या आणि त्यांच्याशी संबंधित धोका वाढू शकतो .

Web Title: Nepal flash flood a massive flood despite no rain what is the mystery behind the sudden deluge from the himalayas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • himalaya
  • Melting glaciers
  • Nepal News

संबंधित बातम्या

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश
1

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.