Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal flash flood: हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या महापुराने हाहाकार; भारतासह ३० हून अधिक देशांतील नागरिक बेपत्ता

नेपाळमधील तिबेट सीमेवर हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली. नेपाळमध्ये आतापर्यंत ४६९ जणांचा मृत्यू झाला असून ९७७ जण बेपत्ता आहेत; सुत्रांच्या माहीतीनुसार बेपत्ता नागरिकांमध्ये परदेशी पर्यटक आणि भारतीयांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 28, 2026 | 12:49 PM
Nepal flash flood: हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या महापुराने हाहाकार; भारतासह ३० हून अधिक देशांतील नागरिक बेपत्ता

Nepal flash flood: हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या महापुराने हाहाकार; भारतासह ३० हून अधिक देशांतील नागरिक बेपत्ता

Follow Us
Follow Us:
  • १७८ भारतीय बेपत्ता असल्याने भारताची चिंता वाढली
  • नव्या पुराचा धोका; नदीतील पाण्याच्या वाढत्या पातळीवर प्रशासनाचे लक्ष
  • नेपाळमध्ये महापुराचा कहर; ४६९ मृत, तर ९७७ जण बेपत्ता
Nepal flash flood:  काठमांडू जवळील नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या प्रलयकारी पुरामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे. हिमनदी कोसळल्यानंतर भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या पात्रात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल आणि दगडांचा लोंढा आला. या आपत्तीत नेपाळमध्ये आतापर्यंत ४६९ जणांचा मृत्यू झाला असून ९७७ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहीती समोर आली आहे. बचाव पथकांकडून विलक्षण गतिने शोधमोहीम सुरू आहे.

मदत पोहोचण्यात अडथळा
रसुवा आणि परिसरातील भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुराच्या पाण्याने घरे, पूल, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून काही भागांमध्ये मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेले मृतदेह आता नेपाळमधील इतर जिल्ह्यांमध्येही आढळत आहेत.

हेही वाचा: Palghar Crime: प्रियकराच्या घरी गेली अन् परतलीच नाही! १७ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

भारतीयांची वाढली चिंता

या दुर्घटनेनंतर भारताचीही चिंता वाढली आहे. नेपाळमध्ये बेपत्ता असलेल्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. उपलब्ध माहितीनुसार १७८ भारतीय बेपत्ता असल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भारताच्या सीमावर्ती भागांमध्येही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतीय नागरिक मोठ्या संख्येने संपर्काबाहेर आहेत. ६३ भारतीय नागरिकांना त्रिशूली-१ जलविद्युत प्रकल्पातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, सुमारे २८८ भारतीय नागरिक संपर्काबाहेर आहेत.

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

बेपत्ता नागरीकांचा शोध सुरू
दरम्यान, बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले जात असून, ढिगारा हटवून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. मात्र, खराब हवामान, उद्ध्वस्त रस्ते आणि पूल यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच या संकटात आणखी एका संभाव्य धोक्याने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.
भोटेकोशी नदीच्या प्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे पाण्याचा मोठा साठा तयार झाला असून, त्यातून पुन्हा मोठा पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेथील शासनाकडुन नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

३० पेक्षा अधिक देशांचे नागरिक बेपत्ता

भारतासह ऑस्ट्रेलिया, युक्रेन, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आदी देशांतील नागरिकांचाही संपर्क तुटला असुन यामध्ये अनेकजण पर्यटक, ट्रेकर्स, यात्रेकरू किंवा सीमावर्ती प्रकल्पांमध्ये काम करणारे होते. तसेच लष्कर,पोलिस आणि इतर सुरक्षा दलांच्या हजारो जवानांना बचावकार्यात उतरवण्यात आले आहे. तर अनेक जखमींवर काठमांडूतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Web Title: Nepal flash flood devastation caused by a massive flood following a glacial collapse citizens from over 30 countries including india missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • international news
  • nepal
  • Nepal Flash Flood

संबंधित बातम्या

अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू
1

अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?

चिंताजनक ! जगाचा आपत्कालीन तेलसाठा संपतोय; साठ्यात होतेय झपाट्याने घट
4

चिंताजनक ! जगाचा आपत्कालीन तेलसाठा संपतोय; साठ्यात होतेय झपाट्याने घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.