Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू

Nepal : येथे एक शाळेची बस दरीत कोसळल्याने विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये सततच्या होणारे अपघात पाहता तेथील सरकारने रस्ते सुरक्षा विधेयक संसदेत सादर केले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 09, 2026 | 04:57 PM
अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू

अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • पोखराजवळ शाळेची बस रस्त्यावरून दरीत कोसळली
  • बसमध्ये १७ विद्यार्थ्यांसह एकूण १९ जण
  • अपघाताचे कारण अस्पष्ट
नेपाळ (Nepal) मधील पोखरा शहराजवळ शुक्रवारी सकाळी शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला. रस्त्यावरून बस दरीत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कास्की जिल्ह्यातील पोखरा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ मधील ओखलेको भीर परिसरात सकाळी सुमारे ६.२० वाजता ही दुर्घटना घडली.

नेपाळमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस कालिका इंग्लिश बोर्डिंग स्कूलची होती. कास्की जिल्हा पोलीस कार्यालयाचे प्रमुख पोलीस अधीक्षक नवीन कार्की यांनी या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. अपघाताच्या वेळी बसमध्ये १७ विद्यार्थी, एक अन्य प्रवासी आणि चालक असे एकूण १९ जण होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कास्कीचे मुख्य जिल्हाधिकारी कुमान सिंह गुरुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील बहुतांश विद्यार्थी दहावीच्या वर्गातील होते. ते शिकवणी वर्गासाठी जात असताना हा अपघात झाला.

नेपाळमध्ये रस्ते अपघातांत वाढ

नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. देशात वाहनांची संख्याही सातत्याने वाढत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात नेपाळमध्ये ७,६६९ रस्ते अपघातांची नोंद झाली. या अपघातांत १,९०० जणांचा मृत्यू झाला, तर २७८ अपघात गंभीर स्वरूपाचे होते.

जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, नेपाळमध्ये रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या दुखापतींचा आर्थिक खर्च २००७ नंतर तिपटीने वाढला आहे. हा खर्च देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीएनपी) १.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या अपघातांचा सर्वाधिक फटका गरीब आणि दुर्बल घटकांना बसत असल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

USA Elections: अमेरिकेच्या SIRमधून 2 लाख भारतीय मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार? ट्रम्प यांची चिंता वाढली

रस्ते सुरक्षा विधेयक संसदेत

वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नेपाळ सरकारने प्रतिनिधी सभेत ‘रोड सेफ्टी बिल’ सादर केले आहे. रस्ते सुरक्षेशी संबंधित विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढवणे, अपघात रोखणे, देखरेख व्यवस्था मजबूत करणे आणि अपघातांमुळे होणारी जीवितहानी व आर्थिक नुकसान कमी करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे.

या विधेयकात सुरक्षित रस्ते, वाहनांची सुरक्षा, वेग नियंत्रण, रस्ते वापरणाऱ्यांची सुरक्षितता, अपघातानंतर बचावकार्य व उपचार, विमा आणि नुकसानभरपाई यांसारख्या बाबींचा समावेश आहे.

MEA India H1BVisa : जे. डी. व्हान्स यांच्या ‘गुलाम’ वक्तव्यावर भारताचा पलटवार; परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन जारी

Web Title: Nepal pokhara school bus accident five dead rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Accident
  • nepal
  • school bus

संबंधित बातम्या

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…
1

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…

Accident News : हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
2

Accident News : हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
3

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!
4

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.