
Maharashtra Breaking News Today 08.10.2026
08 Oct 2026 09:25 AM (IST)
Prakash Raj Dhruv Rathee EC Protest Bangalore: अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांनी बंगळुरू येथे सुरू असलेल्या विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेविरोधातील (SIR) आंदोलनाची धार अधिक तीव्र करत देशवासीयांना मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रकाश राज यांनी आंदोलनात एक विशेष पाहुणा सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती, ज्यानंतर त्यांनी प्रसिद्ध युट्यूबर आणि राजकीय विश्लेषक ध्रुव राठी (Dhruv Rathee) या आंदोलनात थेट सामील होत असल्याचे स्पष्ट केले.
08 Oct 2026 09:15 AM (IST)
IndiGo Flight Lightning Strike Emergency Landing: पटनाहून लखनऊकडे जाणाऱ्या इंडिगोच्या (IndiGo 6E925) प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडवणारी घटना हवेत १७,००० फूट उंचीवर घडली आहे. उड्डाणादरम्यान वादळी हवामानात विमानावर अचानक वीज कोसळल्याने विमानाचा पुढील भाग (Nose Cone/Radome) पूर्णपणे चक्काचूर होऊन गंभीर नुकसान झाले. अचानक झालेल्या या मोठ्या दुर्घटनेनंतरही वैमानिकाने (Pilot) प्रचंड प्रसंगावधान आणि संयम राखत विमानावर पूर्ण नियंत्रण मिळवले.
08 Oct 2026 09:05 AM (IST)
Majhi Ladki Bahin Scheme September Installment : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता सप्टेंबर अखेरीस मिळाल्यानंतर, आता राज्यातील लाखो लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत सण आणि विशेष प्रसंगांचे औचित्य साधत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचा पायंडा पाडला आहे. त्याच धर्तीवर, यंदाच्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सरकार महिलांना पुन्हा एकदा आर्थिक भेट देऊन सप्टेंबरचा १,५०० रुपयांचा हप्ता थेट डीबीटी (DBT) द्वारे बँक खात्यात वर्ग करेल, असा मजबूत अंदाज राजकीय व सामाजिक वर्तुळात वर्तवला जात आहे.
08 Oct 2026 08:55 AM (IST)
Niphad Soybean Crop Damage Crisis: नाशिक जिल्ह्यातील अत्यंत सुपीक मानल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी एकाच वेळी तीन मोठ्या संकटांच्या तावडीत सापडला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने पिके सुकू लागली असून, दुसरीकडे 'ऑक्टोबर हिट'मुळे वाढलेल्या उन्हाच्या पार्याने शेतीची बिकट अवस्था केली आहे. यातच भर म्हणून सोयाबीन पिकावर 'तांबेरा' रोगाचा भीषण प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. चालू हंगामात सोयाबीनच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रतिॲकर २५ ते ३० हजार रुपयांचा भरमसाठ खर्च आला आहे; मात्र सध्याची स्थिती पाहता मूळ उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
08 Oct 2026 08:45 AM (IST)
Nana Patekar Passes away: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले ज्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयाच दाखल करण्यात आले. नाना पाटेकर यांना सकाळी ५.२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर साधारण ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. बड्या कलाकाराच्या अशा अकस्मात मृत्यूने मराठी तसेच बाॅलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नेते नाना पाटेकर यांचे आज मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दुसरीकडे दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचे आंदोलनादरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हे आंदोलन अधिक चिळघले आहे. तर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार निदर्शनेही सुरूच आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीने (MPC) महागाई रोखण्यासाठी रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ करून तो ५.५०% केला. सायनशास्त्रातील (Chemistry) उत्कृष्ट संशोधनासाठी २०२६ चा नोबेल पुरस्कार हेन्री बी. कागन आणि केन्सो सोआई यांना जाहीर करण्यात आला आहे.
ज्यात मान्सूनच्या माघारीनंतर ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढला असून मुंबई, पुणे आणि मराठवाड्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ हैदराबादमध्ये दाखल, कसून सराव सुरू आहे.