Nepal lifts social media ban after 21 killed in protests
Nepal Gen Z Protest : काठमांडू : नेपाळच्या काठमांडूत झालेल्या तरुणांचा आंदोलनाने संपूर्ण नेपाळ हादरला होता. सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळच्या तरुणांनी आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आता सरकारने सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे Gen Z तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान यावर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.
नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी देशात २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे देशातील तरुणांनी सरकारविरोधात आंदोलन छेडले होते. नेपाळची राजधानी काठामांडूमध्ये तीव्र आंदोलन झाले. या आंदोलना Gen Z रिव्होल्यूशन असे नाव देण्यात आले होते. या निदर्शनांमध्ये २१ तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५० हून अधिक तरुण जखमी झाले आहे. दरम्यान यावर पंतप्रधान ओली शर्मा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतला आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी सोशल मीडियावरील बंदी हटवली आहे. या संदर्भात त्यानी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले की, “जनरेशन झेड पिढीच्या निदर्शनांमध्ये मृत्यू झालेल्या तरुणांबद्दल मला दु:ख आहे. आम्हाला विश्वास होता की, आमची मुले शांततेत त्यांच्या मागण्या मांडतील, शांततेत समस्या सोडवल्या जातील, पण काही स्वार्थी लोकांनी निदर्शनांमध्ये घुसखोरी केली आणि तरुणांना भडकावले.
यामुळे बिकट परिस्थितीत बिकट झाली होती. सरकारचा सोशल मीडियावर बंदी घालण्याचा कोणताही हेतू नव्हता. आम्हाला केवळ त्याच्या वापारासाठी वातावरण सुनिश्चित करायचे होते. यासाठी निदर्शनांची गरज नव्हती. आता हे चालणार नाही. पंतप्रधानांनी तरुणांना म्हटले की, “मी तुम्हाला खात्री देतो की, आज झालेल्या घटनेची आणि नुकसानीची स्थिती सुधारली जाईल. यामागच्या कारणांचा तपास घेतला जाईल.
यासाठी एक समिती स्थापन करण्याचेही ओली शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी देखील योग्य ती पावले उचलण्याची शिफारस केली आहे. संपूर्ण परिस्थितीवर १५ दिवसांत अहवालही सादर केला जाईल असे ओली शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावर बंदी हटवली आहे.
नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन?
नेपाळमध्ये पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या सरकारने फेसबुक, एक्स यांसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती, यामुळे देशातील तरुणांनी सरकारच्या या निर्णयाव विरोधात आंदोलन सुरु केले होते.
का घातली होती सोशल मीडियावर बंदी?
नेपाळच्या सरकारने फेसबुक, एक्स यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अधिकृत रजिस्ट्रेशन केले नव्हते, यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला अधिकृत नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तोपर्यंत सोशल मीडियावर बंदी राहणार होती.
कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर होती बंदी?
नेपाळ सरकारने एकूण २६ सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. यात इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर, यूट्यूब, एक्स (X), रेडिट, लिंक्डइन, व्हॉट्सॲप, डिस्कॉर्ड, पिनटेरेस्ट, सिग्नल, थ्रेड्स, रंबल, लाइन, इमो, जालो, सोल, हॅमरो पॅट्रो, वीचॅट, क्वोरा, टम्बलर, क्लबहाउस, एमआय व्हिडिओ, एमआय वायके ३ यांचा समावेश होता.