Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळ-तिबेटच्या भूकंपात आत्तापर्यंत 53 जणांचा बळी; शोधकार्य अद्यापही सुरुच

नेपाळ-तिबेटमध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के आज पहाटे जाणवले आहेत. हा भूकंप 7.1 रिश्ट स्केल तीव्रतेचा होता. दरम्यान या भीषण भूकंपामुळे आत्तापर्यंत 53 लोकांचा बळी गेल्याची माहिची मिळाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2025 | 11:57 AM
Nepal-Tibet earthquake: नेपाळ-तिबेटच्या भूकंपात आत्तापर्यंत 53 जणांचा बळी; शोधकार्य अद्यापही सुरुच

Nepal-Tibet earthquake: नेपाळ-तिबेटच्या भूकंपात आत्तापर्यंत 53 जणांचा बळी; शोधकार्य अद्यापही सुरुच

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: नेपाळ-तिबेटमध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के आज पहाटे जाणवले आहेत. मंगळवारी (7 जानेवारी) सकाळी तिबेटमधील शिगात्से शहरात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला, यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. दरम्यान या भीषण भूकंपामुळे आत्तापर्यंत 53 लोकांचा बळी गेल्याची माहिची मिळाली असून अद्याप शोधकार्य सुरु आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तिबेटमध्ये झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांनी चीन नेपाळ, भारत , बांगलादेशसह इतर अनेक देश हादरले आहेत.

7.1 रिश्टर स्केलचा भूकंप 

नेपाळच्या भूकंप विज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6:35 वाजता नेपाळमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप नेपाळ-चीन सीमेवरील तिबेटमधील डिंगे कांती येथे केंद्रित होता. हा भूकंप 7.1 तीव्रतेचा होता. या भूकंपाचा प्रभाव नेपाळच्या पूर्व ते मध्य भागात दिसून आला, यामुळे काठमांडूसह अनेक भागांतील नागरिक भयभीत झाले आहेत. हा भूकंप 10 किलोमीटर खोलीपर्यंत पसरला. या भूकंपाचे हादरे तिबेटसोबतच नेपाळमध्ये काही भागांमध्ये जाणवले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळ-चीन सीमा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; तिबेट ठरला केंद्रबिंदु, 7.1 रिश्टर स्केल तीव्रता

भारताच्या इतर भागांमध्येही भूकंपाचा फटका

याशिवाय, तिबेटमधील भूकंपाने नेपाळ, चीन आणि बांगलादेश अनेक देशांमध्ये, दिल्ली-NCR, बिहार, आणि पश्चिम बंगालसह भारताच्या अनेक भांगांमध्ये देखील याचा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी पहिल्या भूकंपानंतर झालेला दुसरा हादर सात वाजता 4.7 तीव्रतेचा होता.

काठमांडूमध्येही भूकंपाचे परिणाम

नेपाळची राजधानी काठमांडूमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि अनेक लोक घराबाहेर पडले. गेल्या काही काळात काठमांडूमध्ये इतक्या तीव्रतेचा भूकंप जाणवला नव्हता. भूकंपामुळे नुकसान झाले आहे की नाही, याची अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नेपाळच्या अन्य भागांतील लोकांनीही भूकंपाचे हादरे जाणवल्याचे सांगितले आहे.

भूकंपाचे केंद्र आणि त्याचा परिणाम

चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने जारी केलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र तिबेटच्या शिगात्से शहरात होते. हे धक्के समुद्रसपाटीपासून 10 किलोमीटर खाली होते. नेपाळ सरकारने देखील पुष्टी केली की भूकंपाचे केंद्र नेपाळ-चीन सीमेवरील तिबेटमधील डिंगे कांती येथे होते. या भूकंपामुळे तिबेट आणि नेपाळमधील अनेक भागांना हादरे बसले. यामुळे दोन्ही देशांतील लोक भयभीत झाले आणि सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडले. सध्या या भूकंपामुळे नेमका किती जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे, याची माहिती नाही. मात्र, प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. भविष्यातील धोक्याचा अंदाज घेत स्थानिक प्रशासन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रुडोंनी राजीनामा देताच ट्रम्प यांची प्रतिक्रिया; कॅनडाला अमेरिकेचा भाग होण्याच्या ऑफरचा केला पुनरुच्चार

Web Title: Nepal tibet earthquake death toll rises to 53 search operation still underway nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • China
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार
1

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL
2

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी
3

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
4

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.