Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mount Everest : थरारक! मृत्यूनेही टेकले गुडघे; 8 हजार मीटर उंचीवरून 6 दिवस रांगत खाली आला ‘माउंटन टायगर’ हिलरी दावा शेर्पा

Nepali Guide Everest : ३० मे रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरून बेपत्ता झालेले हिलरी दावा शेर्पा सहा दिवसांनंतर रांगत बेस कॅम्पवर परतले आहेत. ते मरण पावले असावेत असे सर्वांना वाटले होते, पण ते परत आले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 04, 2026 | 03:48 PM
Hillary Dawa Sherpa Everest Rescue 2026

Hillary Dawa Sherpa Everest Rescue 2026

Follow Us
Follow Us:
  • मृत्यूच्या दारातून परतीचा प्रवास
  • अंत्यविधी सुरू असताना चमत्कार
  • शिडीशिवाय पार केला जीवघेणा ‘खुंबू आईसफॉल’

Hillary Dawa Sherpa Everest Rescue 2026 : जगातील सर्वात उंच आणि तितकेच धोकादायक शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवरून (Mount Everest) एक अशी अद्भूत आणि अशक्यप्राय वाटणारी घटना समोर आली आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. माउंट एव्हरेस्टच्या बर्फाळ कड्यांमध्ये आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीत जर एखादी व्यक्ती ६ दिवस बेपत्ता झाली, तर ती जिवंत राहण्याची शक्यता शून्य मानली जाते. परंतु, अत्यंत अनुभवी नेपाळी मार्गदर्शक (Sherpa Guide) हिलरी दावा शेर्पा यांनी आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या आणि धैर्याच्या जोरावर या निसर्गाच्या क्रूर नियमालाही खोटे ठरवले आहे. ३० मेच्या सकाळपासून बेपत्ता असलेले ५२ वर्षीय दावा शेर्पा तब्बल ६ दिवसांनंतर गुरुवारी बर्फातून स्वतःला फरफटत आणि रांगत बेस कॅम्पजवळ घेऊन आले. त्यांच्या जिवंत परतण्याची ही घटना म्हणजे केवळ विज्ञानाला पडलेले कोडे नसून मानवी जिद्दीचा एक जिवंत चमत्कार आहे.

शिखर सर केले, पण परतीचा प्रवास काळ बनून आला!

ब्रिटीश रॉयल मरीनचे माजी सैनिक आणि प्रसिद्ध गिर्यारोहक ख्रिस थ्रॉल (Chris Thrall) आणि त्यांचे नेपाळी मार्गदर्शक हिलरी दावा शेर्पा यांनी २९ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता ८,८४९ मीटर उंचीच्या एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा आणि आपले झेंडे फडकवले होते. परंतु, एव्हरेस्ट चढण्यापेक्षा तिथून सुखरूप खाली उतरणे हे सर्वात मोठे आव्हान असते. ३० मे रोजी सकाळी ७,९५० मीटर उंचीवर असलेल्या ‘कॅम्प फोर’ (Camp 4) मधून खाली उतरत असताना निसर्गाचे रूप बदलले. हा परिसर ‘डेथ झोन’ (Death Zone) म्हणून ओळखला जातो, जिथे हवेमध्ये ऑक्सिजनची पातळी अत्यंत नगण्य असते. याच भागात प्रचंड थकवा आणि खराब हवामानामुळे दावा शेर्पा एका जागी विश्रांतीसाठी बसले आणि तेथूनच ते आपल्या सहकाऱ्यांपासून ताटातूट होऊन बर्फाळ वादळात बेपत्ता झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Solar Eclipse: शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 6 मिनिटे आणि 23 सेकंद दिसणार; जाणून घ्या ते भारतात दिसेल का?

घरी सुरू होती मृत्यूची पूजा; फोटो पाहून अश्रू अनावर!

दावा शेर्पा ज्या उंचीवर बेपत्ता झाले होते, तिथे उणे ४० अंश तापमान आणि वेगाने वाहणारे वारे होते. ६ दिवसांपर्यंत त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही आणि शोधमोहीम राबवूनही त्यांचा शोध लागला नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि एजन्सीने ते मरण पावले असावे असा गृहीत धरले. काठमांडू येथील त्यांच्या घरी पत्नी दामू शेर्पा आणि त्यांच्या मुलीने दावा यांच्या आत्म्याच्या शांततेसाठी अंत्यविधीचे विधी आणि ‘मृत्यू पूजा’ (Funeral Rituals) देखील सुरू केली होती. पूजेचा दुसरा दिवस सुरू असतानाच अचानक स्थानिक बातम्यांवर आणि एका ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला की दावा शेर्पा जिवंत सापडले आहेत. पहिल्यांदा कुटुंबीयांना यावर विश्वासच बसला नाही, परंतु जेव्हा बेस कॅम्पवरून त्यांचा सूप पितानाचा फोटो पाठवण्यात आला, तेव्हा कुटुंबाला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

¡Los milagros existen!❤️
Hillary Dawa Sherpa, desaparecido el 29/05 en el descenso desde C4 en Everest, ha sido rescatado por miembros del SPCC tras conseguir descender por sus medios hasta el Crampon Point, sin agua, ni comida ni soporte de O2.
Leer 👉https://t.co/YoRqWvYqs7 pic.twitter.com/Kzutxpqie8
— L. Carlos Garranzo (@CarlosGarranzo) June 4, 2026

credit – social media and Twitter

शिड्या काढून घेतल्या तरीही ‘खुंबू आईसफॉल’ पार केला!

दावा शेर्पा यांची ही सुटका एका वेगळ्याच कारणाने जगाला थक्क करून सोडत आहे. २९ मे रोजी एव्हरेस्टचा गिर्यारोहण हंगाम अधिकृतपणे संपला होता. त्यामुळे ३१ मे रोजी बेस कॅम्पवरील ‘सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समिती’च्या (SPCC) पथकाने येथील रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी आणि खोल दऱ्या पार करण्यासाठी लावलेल्या सर्व लोखंडी शिड्या (Ladders) आणि दोरखंड काढून घेतले होते. अत्यंत धोकादायक आणि सतत बर्फ कोसळणाऱ्या ‘खुंबू आईसफॉल’ (Khumbu Icefall) भागातून कोणत्याही संरक्षणाशिवाय आणि शिड्यांशिवाय खाली येणे म्हणजे थेट मृत्यूच्या दरीत उडी मारण्यासारखे होते. मात्र, दावा शेर्पा यांनी कोणत्याही साधनांशिवाय, अन्न, पाणी आणि अतिरिक्त ऑक्सिजनशिवाय या मृत्यूच्या दऱ्या पार केल्या आणि रांगत रांगत ‘क्रॅम्पॉन पॉईंट’ गाठला, जिथे कचरा गोळा करणाऱ्या पथकाने त्यांना पाहिले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Trade: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या चर्चेदरम्यान भारतासाठी मोठी लॉटरी; थेट अमेरिकेच्या राजदूतांनीच केली मोठी घोषणा

हेलिकॉप्टरने पाहिले नाही, पण हिंमत हरली नाही!

८के एक्सपेडिशन्सच्या माध्यमातून करण्यात आलेल्या एका हवाई पाहणीदरम्यान दावा शेर्पा यांनी वरून उडणारे हेलिकॉप्टर पाहिले होते. त्यांनी बर्फातून आपले दोन्ही हात वर करून मदतीसाठी इशारा केला होता, परंतु दुर्दैवाने हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसू शकले नाहीत. तरीही त्यांनी आशा सोडली नाही. गुरुवारी सकाळी जेव्हा एसपीसीसीच्या सफाई कामगारांना एक व्यक्ती बर्फातून रांगत येताना दिसली, तेव्हा त्यांनी तातडीने धाव घेत त्यांना वाचवले. त्यांचे हात-पाय अत्यंत गारठले (Severe Frostbite) होते आणि ते खूप हळू बोलत होते. त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार देऊन काठमांडू येथील ‘हॅम्स’ (HAMS Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Nepali guide hillary dawa sherpa miracle survival six days missing mount everest death zone crawling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • himalaya
  • international news
  • Mountaineer

संबंधित बातम्या

India-US Trade: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या चर्चेदरम्यान भारतासाठी मोठी लॉटरी; थेट अमेरिकेच्या राजदूतांनीच केली मोठी घोषणा
1

India-US Trade: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या चर्चेदरम्यान भारतासाठी मोठी लॉटरी; थेट अमेरिकेच्या राजदूतांनीच केली मोठी घोषणा

Freedom Ship: मानवी इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य! समुद्राच्या लाटांवर धावणार ‘फ्रीडम शिप’ शहर; पहा VIDEO
2

Freedom Ship: मानवी इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य! समुद्राच्या लाटांवर धावणार ‘फ्रीडम शिप’ शहर; पहा VIDEO

Maharashtra Breaking News Updates Today: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, अर्जांची पुन्हा होणार पडताळणी
3

Maharashtra Breaking News Updates Today: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, अर्जांची पुन्हा होणार पडताळणी

Indigo च्या प्रवाशांनी, कृपया लक्ष द्या! कंपनीकडून मोठा निर्णय, आता ‘या’ मार्गावरून धावणार नाहीत विमानं, पण का?
4

Indigo च्या प्रवाशांनी, कृपया लक्ष द्या! कंपनीकडून मोठा निर्णय, आता ‘या’ मार्गावरून धावणार नाहीत विमानं, पण का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.