Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये पर्यटन कार्यक्रमारम्यान दुर्घटना; हायड्रोजनने भरलेला फुगा फुटला अन्…, VIDEO

Pokhara Tourism Year Ceremony: नेपाळच्या पोखरा शहरात पर्यटन वर्ष 2025च्या उद्घाटन समारंभात शनिवारी (15 फेब्रुवारी) एक दुर्घटना घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2025 | 10:05 AM
Nepal's deputy PM, Pokhara mayor sustain burn injuries in baloon explosion

Nepal's deputy PM, Pokhara mayor sustain burn injuries in baloon explosion

Follow Us
Close
Follow Us:

काठमांडू: नेपाळच्या पोखरा शहरात पर्यटन वर्ष 2025च्या उद्घाटन समारंभात शनिवारी (15 फेब्रुवारी) एक दुर्घटना घडली. या कार्यक्रमाच्यावेळी हायड्रोयजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा स्फोट झाला. या दुर्घटनेत नेपाळचे उपपंतप्रधान विष्णु पौडेल आणि पोखरच्या महापौर धनराज आचार्य किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर उपपंतप्रधान आणि महापौरांना तातडीने काठमांडूला नेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच कास्की जिल्ही पोलिस कर्मचारी कार्यालयाचे पोलिस अधीक्षक श्यामनाथ ओलिया यांनी सांगितले की, पुढील उपचारासाठी त्यांना काठमांडू हलवण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- “ना विसरू, ना माफ करू!” हमासला इस्त्रायलचे अनोख्या कृतीने चोख प्रत्युत्तर; संघर्ष पुन्हा पेटणार?

बेलुन फुटेर आगो सल्किँदा अर्थमन्त्री विष्णु पौडेल र पोखरा महानगरपालिकाका प्रमुख धनराज आचार्य घाइेत भएका छन्। pic.twitter.com/ECIt4H3kuo — Bipin Sapkota (@bipinsapkota213) February 15, 2025

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पोखरा पर्यटन वर्षाच्या उद्घाटन समारंभादरम्यान झाला. उद्घाटनाच्या वेळी फुगे सोडण्यात येणार होते, त्यादरम्यान फुगे फायर पॉपर्सच्या संपर्कात आले आणि स्फोट झाला. यामुळे उपपंतप्रधान पौडेल आणि महापौर आचार्य किरकोळ भाजले गेले. स्फोटानंतर लगेचच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

घटना कॅमेरात कैद

ही घटना पोखरा महानरगपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रीममध्ये कैद झाली. यामध्ये उपपंतप्रधान विष्णु पौडेल स्फोटानंतर धावताना दिसले. महापौर धनराज आचार्य यांनीही मंचावरून पळ काढला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

तसेच उपपंतप्रधान विष्णु पौडेल आणि महापौरांना तातडीने हेलिपॉप्टरने काळमांडूला नेण्यात आले. काठमांडूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.  सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कशी लागली आग?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, एका स्वयंचलित स्विचमुळे आग लागली आणि ती हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांपर्यंत पोहोचली. हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे लगेचच स्फोट झाला. ही दुर्घटना सुरक्षा उपायांतील ढिसाळपणामुळे घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सार्वजनिक समारंभांमध्ये हायड्रोजन गॅसचा योग्य प्रकारे वापर होणे आवश्यक आहे.

या दुर्घटनेनंतर नेपाळमधील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आगामी सार्वजनिक कार्यक्रमांसाठी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प आहेत अमेरिकेचे कुबेर; नरेंद्र मोदींपेक्षा तब्बल 20 हजार पट जास्त संपत्ती

Web Title: Nepals deputy pm pokhara mayor sustain burn injuries in baloon explosion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
1

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
2

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड
3

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने
4

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.