डोनाल्ड ट्रम्प आहेत अमेरिकेचे कुबेर; नरेंद्र मोदींपेक्षा तब्बल 20 हजार पट जास्त संपत्ती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे नरेंद्र मोदी हे जागतिक पाळीवरील चर्चित नेते आहेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन केले आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील भारतीय राजकारणात हॅट्रीक मारली आहे. एककीकडे ट्रम्प आपल्या निर्णयांनी संपूर्ण जगात खळबळ उडवत असून नरेंद्र मोदी दुसरीकडे भारताचे वर्चस्व संपूर्ण जगात प्रस्थापित करत आहेत. दोघांची मैत्री देखील जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का दोन्ही नेत्यांची संपत्ती, उत्पन्नाते स्त्रोत, जीवनशैली आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठा फरक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या 2025 पर्यंतची एकूण संपत्ती $7.16 अब्ज (सुमारे ₹61,600 कोटी) आहे, तर नरेंद्र मोदी यांची संपत्ती ₹3.02 कोटी आहे. याचा अर्थ ट्रम्प यांची संपत्ती मोदींपेक्षा 20,000 पट जास्त आहे.
उत्पन्नाचे स्रोत
डोनाल्ड ट्रम्प हे प्रसिद्ध व्यावसायिक असून त्यांचे मुख्य उत्पन्न रिअल इस्टेट, मीडिया, गोल्फ कोर्स आणि क्रिप्टोकरन्सीमधून येते. ते ट्रम्प ऑर्गनायझेशन, ट्रुथ सोशल आणि गोल्फ क्लब्सचे मालक आहेत. तर नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत त्यांचा पंतप्रधान म्हणून मिळणारा मासिक वेतन आहे, ₹2 लाख आहे. तसेच, त्यांच्याकडे काही बचत खात्यांतील ठेवी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि काही सोने आहेत.
सुरक्षा व्यवस्था
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसकडून सुरक्षा दिली जाते, यामध्ये आधुनिक सुरक्षा प्रणाली, बख्तरबंद वाहन (कैडिलॅक “द बीस्ट”) आणि एअरफोर्स वन विमानाचा समावेश आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना भारतीय विशेष सुरक्षा गट (SPG) कडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या सुरक्षेसाठी BMW 760Li गाडी आणि एअर इंडिया वन विमान वापरले जातात.
जीवनशैली
डोनाल्ड ट्रम्प यांची जीवनशैली अत्यंत आलिशान आहे. त्यांच्या मालकीच्या रोल्स रॉयस, बेंटले, कैडिलॅकसारख्या गाड्या आहेत, तसेच त्यांचा एक खासगी बोईंग 757 विमान आहे. तर याउलट नरेंद्र मोदी साध्या जीवनशैलीला प्राधान्य देतात. ते खादीचे कपडे परिधान करतात आणि 7, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली येथील अधिकृत निवासस्थानी राहतात.
जागतिक प्रभाव
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या सामर्थ्यवान लष्करी आणि आर्थिक धोरणांमुळे जागतिक स्तरावर मोठा प्रभाव आहे. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आशियामध्ये अधिक आहे, विशेषतः भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे.
सोशल मीडिया फॉलोअर्स
ट्विटरवर नरेंद्र मोदी यांचे 98 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट 2021 मध्ये निलंबित झाले, मात्र त्यांचे ट्रुथ सोशल नावाचे स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकवर मोदींच्या 4.4 कोटी फॉलोअर्स आहेत, तर ट्रम्प यांचे 2.7 कोटी फॉलोअर्स आहेत.