"ना विसरू, ना माफ करू!" हमासला इस्त्रायलचे अनोख्या कृतीने चोख प्रत्युत्तर; संघर्ष पुन्हा पेटणार? (फोटो सौजन्य: एक्स /@Natsecjeff)
जेरुसेलम: सध्या इस्त्रायल आणि हमास यांच्यात संघर्षविराम सुरु असून हमासने बंदी बनवलेल्या ओलिसांची आणि इस्त्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली जात आहे. दरम्यान गाझा युद्धविराम करारांतर्गत हमासच्या तीन ओलिसांच्या सुटकेनंतर शनिवारी (15 फेब्रुवारी) 369 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. आहे मात्र, या सुटकेपूर्वी इस्त्रायलने एक अनोखी पद्धत अवलंबून हमासला मोठा धक्का दिला आहे. इस्त्रायलच्या मीडिया रिपोर्टनुसार अहवालानुसार, या कैद्यांना “ना विसरू, ना माफ करू!” (न भूलेंगे, न माफ करेंगे) असे लिहिलेल्या टी-शर्ट घालून सोडण्यात आले आहे. दरम्यान इस्त्रायच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे.
हमासला इस्त्रायलचे चोख प्रत्युत्तर
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी तीव्र संताप व्यक्त केला असून हे हमासच्या कार्यक्रमांचे चोख प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे. हमासने पूर्वी इस्त्रायली बंधकांची सुटका करताना एक स्टेज इव्हेंट आयोजित केला होता. या इव्हेंटमध्ये बंधकांना स्टेजवर उभे करून हमासची स्तुती करण्यास भाग पाडले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी लोक गोळा झाले होते, यामुळे इस्त्रायलमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. यामुळे या वेळी इस्त्रायले विशेष टी-शर्ट वापरून पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला.
Israel has made special t-shirts for the 369 Palestinian terrorists that are to be released today in exchange for 3 innocent Israeli hostages.
The t-shirts say “we will not forget and we will not forgive.” pic.twitter.com/Pwp70JioVZ
— FJ (@Natsecjeff) February 15, 2025
हमासकडून 3 इस्त्रायली बंधकांची सुटका
युद्धविरामाच्या अंतर्गत हमासने तीन इस्त्रायली बंधकांची सुटका केली. ही सुटका सकाळी 10 वाजता खान यूनिस भागात करण्यात आली. रेडक्रॉसच्या माध्यमातून हे बंधक इस्त्रायली सैन्याकडे सोपवण्यात आले.
ओलिसांच्या सुटका
7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हमास हल्ल्यानंतर इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले होते. 15 महिन्यांनंतर युद्धविरामाचा करार करण्यात आला, याअंतर्गत दोन्ही बाजूंनी सहा वेळा बंधकांची अदलाबदल करण्यात आली आहे. पहिली अदला-बदली 19 जानेवारीला झाली, नंतर 25 आणि 29 जानेवारी, 1 आणि 8 फेब्रुवारी दरम्यान प्रक्रिया पार पडली. अखेर 15 फेब्रुवारीला सहाव्या वेळेस अदला-बदली करण्यात आली.
दरम्यान हमासने डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी शनिवारपर्यंतचा(15 फेब्रुवारी) अल्टीमेटम दिला होता. मात्र, तरीही हमासने फक्त तीन ओलिसांची सुटका केली आहे. यामुळे नेतन्यांहूनी पॅलेस्टिनींच्या सुटकेवेळी अनोखी कृती अवलंबवली आहे. यामुळे पुन्हा एकदा इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.