Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Covid 19 Wave : सावधान! आशियात कोरोनाची नवी लाट, सिंगापूरमध्ये १४००० रुग्ण, तर हाँगकाँगमध्ये…

आशियात पुन्हा एकदा कोविड-१९ च्या नव्या लाटेने डोके वर काढले असून, हाँगकाँग आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिंगापूरमध्ये १४००० रुग्णांची नोंद झाली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 16, 2025 | 08:17 PM
कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Follow Us
Close
Follow Us:

आशियात पुन्हा एकदा कोविड-१९ च्या नव्या लाटेने डोके वर काढले असून, हाँगकाँग आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य नागरिकांच्या कमी होत चाललेल्या रोगप्रतिकारक क्षमतेचा परिणाम असू शकतो, त्यामुळे लसीकरण पूर्ण करणे आणि बूस्टर डोस घेण्याचं आवाहन, अधिकाऱ्यांनी केलं आहे. कोरोना महामारीतून जग आता कुठे सावरलं असून आशिया खंडात पुन्हा कोरोनाची लाट आल्यामुळे भीतीचं वातावरण आहे.

चेहरा अचानक काळा पडू लागलाय… तर मग सावध! ही 5 कारणे असू शकतात कारणीभूत

ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे की, हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी आशियाच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून नवी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनमधील कम्युनिकेबल डिसीज ब्रँचचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, शहरात कोविड-१९ ची प्रकरणे वाढत आहेत. गंभीर प्रकरणे आणि मृत्यूची संख्या त्यांच्या शिखर पातळीवर पोहोचली आहे, ३ मे पर्यंतच्या आठवड्यात ३१ प्रकरणे नोंदवली गेली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सिंगापूरमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

सिंगापूरमधील आरोग्य मंत्रालयाने जवळपास एका वर्षानंतर मे महिन्यात कोविड प्रकरणांवर अपडेट दिले. ३ मे ला सिंगापूरमध्ये कोविड रुग्णांची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत २८% ने वाढून सुमारे १४,२०० वर पोहोचली. त्याच कालावधीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा सुमारे ३०% ने वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही वाढ रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे असू शकते. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या व्हायरसच्या नव्या स्ट्रेन्समुळे संसर्ग अधिक घातक होत असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं म्हटलं आहे.

फक्त हाँगकाँग आणि सिंगापूर नव्हे, तर संपूर्ण आशियामध्ये मागील काही महिन्यांपासून कोविड-१९ ची लाट अधूनमधून येत आहेत. यामध्ये चीन, थायलंड यांसारख्या देशांनाही याचा फटका बसला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनमध्ये सध्या नवीन लाट उद्भवत आहे. मे ४ पर्यंतच्या पाच आठवड्यांमध्ये तिथे कोविड टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट दुपटीहून अधिक झाला आहे. थायलंडच्या रोग नियंत्रण विभागानुसार, यावर्षी दोन मोठे कोविड उद्रेक झाले असून, एप्रिल महिन्यात पार पडलेल्या सोंगक्रान सणानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

World Hypertension Day: तणाव, धूम्रपान तसेच मद्यपानामुळे 25% तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या, 10 पैकी 8 जण बळी

उन्हाळ्यातही टिकणारा संसर्ग

उन्हाळ्याच्या काळात इतर श्वसनविषयक विषाणू कमी होतात, पण कोविड-१९ चा संसर्ग मात्र याच काळात वाढत असल्याने या विषाणूची संसर्गक्षमता अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. आरोग्य यंत्रणांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण, आणि इतर उच्च धोका गटातील लोकांना बूस्टर डोस लवकरात लवकर घेण्याचे आवाहन केले आहे. हाँगकाँगचा लोकप्रिय गायक ईसन चॅन याला कोविड झाल्याने त्याला तैवानमधील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावे लागले, अशी माहिती त्याच्या अधिकृत Weibo खात्यावरून देण्यात आली.

Web Title: New covid 19 was spread in asia patient care in hong kong and singapore latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • Corona Virus
  • covid -19
  • Covid-19 Update

संबंधित बातम्या

कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण?  ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…
1

कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…

Covid-19 Cases: कोरोनारूपी राक्षस वाढतोय? 6 महिन्यात तब्बल120 मृत्यू; बाधितांचा आकडा पोहोचला…
2

Covid-19 Cases: कोरोनारूपी राक्षस वाढतोय? 6 महिन्यात तब्बल120 मृत्यू; बाधितांचा आकडा पोहोचला…

Corona Update: गोंडस बाळाचे मातृत्व हरपले! प्रसूती होताच आईचा Covid ने मृत्यू; देशाची स्थिती काय?
3

Corona Update: गोंडस बाळाचे मातृत्व हरपले! प्रसूती होताच आईचा Covid ने मृत्यू; देशाची स्थिती काय?

IISER Pune: रंग बदलून सांगेल संसर्ग आहे की नाही; IISER पुण्याची क्रांतिकारी शोधपद्धत
4

IISER Pune: रंग बदलून सांगेल संसर्ग आहे की नाही; IISER पुण्याची क्रांतिकारी शोधपद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.