Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे Deepseek AI? यामुळे संपूर्ण जगात उडाली खळबळ, अमेरिकेच्या स्टॉक मार्केटला मोठा झटका

आज चीनच्या DeepSeek या AI स्टार्टअपने नवीन AI मॉडेल लाँच करून जगभरात खळबळ उडवली आहे. आज या मॉडेलने कमी खर्चात उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देत अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अडचणीत आणले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2025 | 04:38 PM
What is DeepSeek and why is it disrupting the AI sector

What is DeepSeek and why is it disrupting the AI sector

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आज चीनच्या DeepSeek या AI स्टार्टअपने नवीन AI मॉडेल लाँच करून जगभरात खळबळ उडवली आहे. आज या मॉडेलने कमी खर्चात उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देत अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अडचणीत आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्री-मार्केटिंग ट्रेडिंगदरम्यान NVDIA कॉर्पोरेशनचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. Deepseek-V3 नावाने लाँच केलेले हे चीनेच मॉडेल OpenAI आणि Meta सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सक्षम असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

अमेरिका आणि NVIDIA ला जोरदार झटका

चीनचे Deepseek AI मॉडेल लाँच झाल्यानंतर NVIDIA कंपनीच्या शेअर्समध्ये 17%ने घसरण झाली. या घटनेमुळे NVIDIA च्या मार्केट कॅपमध्ये 590 बिलियन डॉलर्सची मोठी घट झाली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान बाजारावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला असून NASDAQ इंडेक्समध्येही घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे केवळ NVIDIA नव्हे तर टेक-हेवी नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्स देखील 0.50 टक्क्यांनी घसरला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘मोदी योग्य तो निर्णय घेतील’; अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

कमी खर्च आणि अधिक कार्यक्षमता

हे नवीन Deepseek AI मॉडेल अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे मॉडेल अगदी कमी खर्चात अधिक कार्यक्षम आहे. हे मॉडेल ओपन-सोर्स आहे, म्हणजेच जगभरातील डेव्हलपर्स याचा वापर करून आपल्याला हवे तसे सुधार करू शकतात. NVIDIA सारख्या कंपन्यांच्या महागड्या चिप्स आणि प्रचंड ऊर्जा खपत करणाऱ्या मॉडेल्सच्या तुलनेत डीपसीकने कमी संसाधनांसह उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. सध्या Deepseek मेटा प्लॅटफॉर्म आणि OpenAI च्या मालकीचे आहे. हे मॉडेल काही तासांतच ॲपलच्या स्टोअर स्टोअर रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहे.

अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर

आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेने चीनवर हायटेक सेमीकंडक्टर तंत्रज्ञानावर निर्बंध घातले असतानाही DeepSeek ने मर्यादित संसाधनांचा वापर करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. या मॉडेलमुळे चीनच्या AI उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे चीन या प्रभावी तंत्रज्ञानाद्वारे बाजारपेठांमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या मार्ग लागले आहे.

अमेरिकेच्या स्टारगेट प्रोजेक्टवर परिणाम?

अमेरिकेत 100 बिलियन डॉलर खर्चून सुरू होणाऱ्या स्टारगेट प्रोजेक्टसाठी DeepSeek मोठा अडथळा ठरू शकतो असे भिती व्यक्त केली जात आहे. कमी खर्चात अधिक कार्यक्षम AI मॉडेल्समुळे अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्यांना आपल्या व्यापार धोरणांमध्ये बदल करावा लागणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

DeepSeek AI भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा

DeepSeek ने लाँच केलेले AI मॉडेल चीनच्या तंत्रज्ञान क्षमतेला सिद्ध करणारे आहे. हे मॉडेल जागतिक स्तरावर AI क्षेत्राला नवीन दिशा देऊ शकते. ओपन-सोर्स तंत्रज्ञानामुळे हे मॉडेल जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले असून, भविष्यात यामुळे तंत्रज्ञान उद्योगात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत-चीन संबंध सकारात्मकतेच्या दिशने; कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु होणार, विमानसेवाही पूर्ववत

Web Title: News chinese ai company deepseek gives shock to americas stock market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • AI model
  • China
  • US
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
2

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
3

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
4

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.