'मोदी योग्य तो निर्णय घेतील'; अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत 1500 हून अधिक स्थलांतरितांना बाहेर काढण्यात आले आहे. याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची शपथ घेतल्याच्या एक आठवड्यानंतर पंतप्रधान मोदींची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी प्रमुख मुद्दा म्हणजे बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात पाठवण्यावर देखील चर्चा झाली.
सध्या पंतप्रधान मोदी फ्रेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसला भेट देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याचवेळी ट्रम्प त्यांच्या फ्लोरिडातील दौऱ्यावरुन परतत असताना प्रसार माध्यामांनी त्यांना बेकायदेशीर स्थलांतरितांना भारत स्वीकारणार का, असा प्रश्न विचारला होता. यावेळी ट्रम्प यांनी, मोदी जे योग्य आहे ते करतील, असे म्हटले होते. त्यांनी फोनवर पंतप्रधान मोदींशी झालेल्या फोन कॉलवर सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याचेही म्हटले. ट्रम्प यांनी सांगितले की, मोदी लवतरच अमेरिकेला भेट देतील.
ट्रम्प आणि मोदी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध
पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यातील संबंध त्यांच्या पहिल्या कार्यकाळापासून दृढ राहिले आहेत. 2019 मध्ये अमेरिकेतील “हाउडी मोदी” कार्यक्रम असो किंवा 2017 मध्ये व्हाईट हाऊस भेट, या महत्त्वाच्या क्षणांनी दोन्ही देशांतील संबंध मजबूत केले आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात शेवटचा दौरा भारताचा होता. याशिवाय, ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या विजयानंतर तीन देशांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधाला होता त्यापैकी भारत एक होता.
बेकायदेशीर स्थलांतरित भारतात परतणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री पंतप्रधान मोदींशी चांगली असली तरी सध्या बेकायदेशीर स्थलांतरिताच्या मुद्यावरुन भारताची चिंता वाढली आहे. अमेरिकेला भारताला 1.80 लाख भारतीयांना परत घेण्याबाबत विचारणा केली आहे. या प्रकरणी एस. जयशंकर यांनी अवैध प्रवासाचे समर्थन करणार न्सल्याचे स्पष्ट केले आहे आणि अशा भारतीय नागरिकांना परत घेण्याची तयारी स्वीकारली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
व्यापार संबंध सुधारण्यावर ट्रम्प यांचा भर
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार संबंधांवरही जोर दिला असून अमेरिकेला आर्थिक नुकसान पोहोचवणाऱ्या देशांवर टॅरिफ लागू करण्याचा इशारा दिला आहे. यात भारत, चीन आणि ब्राझीलचा उल्लेख आहे. ट्रम्प यांनी “अमेरिका फर्स्ट” या धोरणाच्या अंतर्गत अशा देशांना कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पण एकीकडे नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे दोन्ही देशांत धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रात देखील सहकार्य दृढ करण्यावर चर्चा झाली आहे.
सध्या भारताने अवैध स्थलांतरितांच्या समस्येवर परराष्ट्र मंत्रालयाद्वारे अमेरिकेसोबत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मजबूत संवाद आणि सहकार्यामुळे या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.