Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Warship: अखेर त्यालाही युद्धात चान्स मिळणार? इराण युद्धाच्या धगीत 5,000 टनी अणू-विनाशकासह उत्तर कोरियाची समुद्रात एन्ट्री

North Korea Warship: इराण-अमेरिका संघर्षादरम्यान, किम जोंग उन यांनी अणुयुद्धनौका बांधून जगभर खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी नौदलातील अणुशस्त्रसंचयनाला गती देण्याचे वचन दिले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 05, 2026 | 03:38 PM
मोठं काहीतरी घडणार? अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाकडून धोकादायक क्षेपणास्त्रांची चाचणी

मोठं काहीतरी घडणार? अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाकडून धोकादायक क्षेपणास्त्रांची चाचणी

Follow Us
Follow Us:
  • अणूयुद्धनौकेची एन्ट्री
  • रशियाचे छुपे सहकार्य
  • अमेरिकेला शेवटचा इशारा

Kim Jong-un nuclear warship launch 2026 : जगाचे लक्ष सध्या मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील भीषण संघर्षाकडे लागलेले असतानाच, आशियाच्या दुसऱ्या टोकावरून एका महाविनाशकारी बातमीने खळबळ उडवून दिली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong-un) यांनी आपल्या नौदलाचे पूर्णपणे ‘अणुकरण’ करण्याची घोषणा केली आहे. किम यांनी सलग दोन दिवस नाम्पो शिपयार्डला भेट देऊन उत्तर कोरियाच्या पहिल्या-वहिल्या अण्वस्त्र सज्ज विनाशकाचे (Nuclear Destroyer) निरीक्षण केले आणि हे युद्धजहाज आता शत्रूच्या कोणत्याही आव्हानाचा नायनाट करण्यासाठी ‘रेड अलर्ट’वर असल्याचे जाहीर केले आहे.

पाच हजार टनी ‘मृत्यूचा सांगाडा’ सज्ज!

उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘केसीएनए’ (KCNA) नुसार, किम जोंग-उन यांनी नाम्पो शिपयार्डमध्ये या ५,००० टनी युद्धनौकेच्या चाचण्यांचे बारकाईने निरीक्षण केले. ही युद्धनौका केवळ पाण्यावर तरंगणारा लोखंडी सांगाडा नाही, तर ती अण्वस्त्रे वाहून नेणारी बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी सज्ज अशी एक फिरती लष्करी छावणी आहे. किम यांनी सैन्याला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, शत्रूने हल्ला करण्यापूर्वीच आपण ‘प्री-एम्प्टिव्ह स्ट्राईक’ (हल्ला होण्यापूर्वीच प्रतिहल्ला) करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. या युद्धनौकेच्या एन्ट्रीमुळे दक्षिण कोरिया आणि जपानच्या सागरी सीमा आता धोक्यात आल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

रशियाचा हात आणि किम यांचे अवाढव्य ‘मिशन’

या लष्करी प्रगतीमागे रशियाचा मोठा हात असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युक्रेन युद्धात उत्तर कोरियाने रशियाला केलेल्या मदतीच्या बदल्यात, पुतिन यांनी किम जोंग-उन यांना अत्याधुनिक नौदल तंत्रज्ञान पुरवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किम यांनी आपल्या शास्त्रज्ञांना पुढील पाच वर्षांसाठी एक अजब उद्दिष्ट दिले आहे – दरवर्षी अशा दोन अणुयुद्धनौका बांधणे! जरी काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी या युद्धनौकेच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली असली, तरी किम यांचा आत्मविश्वास पाहून अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची झोप उडाली आहे.

No, this is not true. North Korea’s Foreign Ministry issued a statement on March 1 condemning US/Israeli strikes on Iran as “illegal aggression,” but there’s no announcement from Kim Jong Un—or any official source—about North Korea “joining the war” against America. The… — Grok (@grok) March 3, 2026

credit – social media and Twitter

ट्रम्प प्रशासनाला अटींसह संवादाची ऑफर

धक्कादायक लष्करी हालचालींनंतरही किम जोंग-उन यांनी राजनैतिक मार्ग पूर्णपणे बंद केलेला नाही. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यामागे एक मोठी अट आहे. “वॉशिंग्टनने जर उत्तर कोरियाच्या संपूर्ण अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाचा आपला जुना आणि अट्टहासी आग्रह सोडला, तरच आम्ही चर्चेच्या टेबलावर येऊ,” असे किम यांनी ठणकावून सांगितले आहे. हा एक प्रकारे अमेरिकेला दिलेला अल्टिमेटम मानला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी

जगावर घोंघावतेय युद्धाचे सावट

इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जग आधीच तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना, उत्तर कोरियाच्या या नव्या आघाडीमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले होत आहेत आणि दुसरीकडे किम जोंग-उन समुद्रात अणुबॉम्ब तैनात करत आहेत. या तणावपूर्ण वातावरणात जागतिक महासत्तांनी संयम बाळगला नाही, तर मानवी सभ्यता एका न भरून येणाऱ्या विनाशाच्या खाईत लोटली जाण्याची दाट शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उत्तर कोरियाच्या नवीन युद्धनौकेचे वजन आणि क्षमता काय आहे?

    Ans: ही युद्धनौका साधारणपणे ५,००० टन वजनाची असून ती अण्वस्त्र सज्ज बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.

  • Que: किम जोंग-उन यांनी ही युद्धनौका बांधण्यासाठी कोणाची मदत घेतली?

    Ans: दक्षिण कोरियाच्या तज्ज्ञांनुसार, उत्तर कोरियाने वाढत्या लष्करी संबंधांमुळे रशियाकडून तांत्रिक मदत मिळवून ही युद्धनौका बांधली आहे.

  • Que: किम जोंग-उन यांनी अमेरिकेला कोणती अट घातली आहे?

    Ans: जर वॉशिंग्टनने अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाचा (Denuclearization) आपला जुना आग्रह सोडून दिला, तरच ट्रम्प प्रशासनाशी संवाद साधू, अशी अट किम यांनी घातली आहे.

Web Title: North korea kim jong un unveils nuclear capable warship amidst us iran tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Kim Jong Un
  • North Korea
  • World War 3

संबंधित बातम्या

World Politics: मैत्रीमुळे की रशियाचा मुद्दा? सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्याने बदलणार जागतिक समीकरणे
1

World Politics: मैत्रीमुळे की रशियाचा मुद्दा? सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्याने बदलणार जागतिक समीकरणे

Russia Ukraine War: पुतिन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळताच युक्रेनचा थरकाप उडवणारा प्रहार; अझोव समुद्रात रशियाची 5 जहाजे उडवली
2

Russia Ukraine War: पुतिन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळताच युक्रेनचा थरकाप उडवणारा प्रहार; अझोव समुद्रात रशियाची 5 जहाजे उडवली

Joseph Aoun : ‘हा तुमचा देश नाही, आमचा आहे,’ क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर लेबनॉनचा संयम सुटला; इराणवर गंभीर आरोप
3

Joseph Aoun : ‘हा तुमचा देश नाही, आमचा आहे,’ क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर लेबनॉनचा संयम सुटला; इराणवर गंभीर आरोप

War Alert : आखातात संघर्ष ठळक! इराणने कुवेत आणि बहरीनवर डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तेहरानचेही प्रत्युत्तर
4

War Alert : आखातात संघर्ष ठळक! इराणने कुवेत आणि बहरीनवर डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तेहरानचेही प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.