इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगचा दक्षिण कोरियाला इशारा
सेउल: सध्या इराण-इस्त्रायल यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्धाची भिती वाढत आहे. दरम्यान उत्तर कोरियाच्या हुकूमशहा किम जोंग यांनी दक्षिण कोरियावर न्यूक्लिअर ॲटॅक करू असे म्हटले आहे. तसेच अमेरिकेलाही किम जोंग ने इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेचाही तणाव वाढला आहे. जगाला तिसऱ्या महायुद्धाची भिती असताना किम जोंगने इशारा दिला आहे. सध्या रशिया-युक्रेमपासून ते इस्त्रायल-हमास, इस्त्रायल-हिजहुल्ला, इस्त्राय-हुथी, आणि इस्त्रायल-इराणपर्यंत संपूर्ण मध्य आशियामध्ये युद्धाची धग वाढत आहे.
दरम्यान अमेरिका देखील इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यांचे समर्थन करत आहे. तर रशिया इराणला पाठिंबा देत आहे. याशिवाय चीननेही इराणला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार किम जोंग ने दक्षिण कोरियाने जर उकसवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही न्यूक्लिअर ॲटॅक करून संपूर्ण दक्षिण कोरियाला नष्ट करू असे म्हटले आहे. किम जोंगने त्यांची राजवट संपुष्टात येईल असा इशारा दक्षिण कोरियाला दिला. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये या प्रकारचे वक्तृत्त्व पहिल्यांदाच नाही. अलीकडे उत्तर कोरियाने त्याच्या आण्विक केंद्राचा युलासा करून क्षेपणास्त्राच्या चाचण्या वाढलवल्या आहेत. अशातच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर किम जोंगने इशारा दिला आहे.
दक्षिण केरियाचे अस्तित्त्व मिटवण्यात येईल
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण केरियाने उत्तर कोरियाला धमकवण्याचा प्रयत्न केला होता, याचेच प्रत्युत्तर म्हणून किंम जोंगने त्यांचे अस्तित्त्व संपुष्टात आणू असे म्हटले आहे. तसेच उत्तर कोरियाच्या मीडिया रिपोर्यनुसार, किम यांनी बुधवारी विशेष ऑपरेशन फोर्स युनिट भेटीदरम्यान म्हटले आहे की, जर दक्षिण कोरियाने त्यांच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण केल्यास, सशस्त्र सैन्याचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही असे म्हटले आहे.
याशिवाय उत्तर कोरिया आणि इतर पारंपारिक शस्त्रे मारण्यास सक्षम असलेल्या दक्षिण कोरियाच्या सर्वात शक्तिशाली Hyeonmu-5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण करताना, यून म्हणाले की ज्या दिवशी त्याचा शेजारी देश अण्वस्त्रे वापरण्याचा प्रयत्न करेल, तो दिवस किम सरकारचा शेवट होईल कारण “किमला” खंबीरपणे सामोरे जावे लागेल, अमेरिका-दक्षिण कोरिया युतीकडून किम जोंगला इशारा देण्यात आला आहे.