Nostradamus Prediction This prediction of Nostradamus is related to the health of Pope Francis
रोम : जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता मिशेल डी नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाण्या आजही चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या अनेक भाकीतांनी इतिहासात खळबळ उडवली असून, त्यातील बरीचशी सत्यात उतरली आहेत. आता पुन्हा एकदा नॉस्ट्राडेमसच्या एका भविष्यवाणीची चर्चा जोरात सुरू आहे. या भविष्यवाणीचा संबंध ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याशी पोप फ्रान्सिस यांच्याशी जोडला जात आहे.
नॉस्ट्राडेमसचे भाकीत आणि पोप फ्रान्सिस यांची प्रकृती
16 व्या शतकात लिहिलेल्या लेस प्रोफेटीज या पुस्तकात नॉस्ट्राडेमस यांनी अनेक ऐतिहासिक घटनांचे भाकीत केले होते. लंडनमधील भीषण आग, हिटलरचा उदय, 9/11 चा दहशतवादी हल्ला, कोविड-19 महामारी आणि जपानमधील भूकंप यांसारख्या महत्त्वपूर्ण घटनांचा त्यांनी उल्लेख केला होता. आता त्यांच्याच एका भविष्यवाणीची चर्चा सुरू असून ती ख्रिश्चन धर्मगुरूंच्या मृत्यूबाबत असल्याचे मानले जात आहे.
हे देखील वाचा : Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त वाचा हिमाचलमधील रहस्यमयी ‘बिजली महादेव मंदिरा’ची एक अद्भुत आख्यायिका
नॉस्ट्राडेमस यांनी लिहिले होते, “खूप वृद्ध पोपच्या मृत्यूनंतर तरुण रोमन निवडला जाईल. त्याच्याबद्दल असे म्हटले जाईल की तो चर्चला कमकुवत करत आहे, परंतु तो बराच काळ सेवा करेल आणि सक्रिय राहील.” या ओळींमधून अनेक तज्ज्ञ असे सुचवत आहेत की या संदर्भात सध्याचे पोप फ्रान्सिस यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने ही भविष्यवाणी खरी ठरू शकते.
पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीबाबत चिंता
व्हॅटिकनच्या अधिकृत सूत्रांनुसार, १४ फेब्रुवारीपासून पोप फ्रान्सिस यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या अत्यंत कमी झाली आहे आणि डॉक्टरांना सेप्सिसची शक्यता वाटत आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे. न्यूयॉर्कचे कार्डिनल टिमोथी डोलन यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमच्या पवित्र पोप फ्रान्सिस यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे आणि कदाचित ते मृत्यूच्या जवळ आहेत.”
व्हॅटिकनमधील हालचाली आणि उत्तराधिकारी निवडीची शक्यता
व्हॅटिकनने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, पोप फ्रान्सिस यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल का, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे नवीन पोप निवडीच्या चर्चेलाही वेग आला आहे. नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार, “पवित्र रोमन चर्चमध्ये ‘पीटर द रोमन’ राज्य करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चर्च एका मोठ्या संकटातून जाईल. सात टेकड्यांचे शहर (रोम) नष्ट होईल आणि न्यायाचा देव त्याच्या लोकांचा न्याय करेल.” ही भविष्यवाणी नक्की कधी आणि कशी खरी ठरेल, हे सांगता येणार नाही. मात्र, पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर या भाकितांची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आशिया खंडाला धडकणार ऑस्ट्रेलिया; वेगाने सरकत आहे उत्तरेकडे, जाणून घ्या काय होणार परिणाम
ख्रिश्चन समाजात शोककळा आणि अटकळींना वेग
पोप फ्रान्सिस हे ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पूजनीय आणि आदरणीय नेते आहेत. त्यांच्या आजारपणामुळे जगभरातील ख्रिश्चन समाजात चिंता पसरली आहे. अनेक अनुयायी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. परंतु, त्यांची प्रकृती सुधारते की नॉस्ट्राडेमसचे भाकीत खरे ठरते, हे येणारा काळच ठरवेल.