Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adani Power: PM Modi यांचा एक इशारा आणि बांग्लादेशात होईल अंधारमय; भारताविरुद्ध विष ओकले तर भोगावे लागतील ‘असे’ परिणाम

Bangladesh Crisis: बांगलादेश विजेसाठी भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अदानी पॉवर शेजारच्या देशाला दररोज 1,500 मेगावॅट वीज पुरवते. बांगलादेशच्या वीज पुरवठ्यात भारताचा वाटा 17% आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 25, 2025 | 01:07 PM
One warning from PM Modi could plunge Bangladesh into darkness as India controls 17% of their power supply

One warning from PM Modi could plunge Bangladesh into darkness as India controls 17% of their power supply

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशच्या एकूण वीज पुरवठ्यात भारताचा वाटा १७% असून पुरवठ्यात थोडाही व्यत्यय आल्यास अर्धा बांगलादेश अंधारात बुडू शकतो.
  •  एकट्या गौतम अदानी यांची ‘अदानी पॉवर’ झारखंडमधील प्रकल्पातून दररोज १,५०० मेगावॅट विजेचा पुरवठा बांगलादेशला करते.
  •  भारताविरुद्ध सातत्याने होत असलेली वक्तव्ये आणि राजकीय तणाव पाहता, भारताने वीज पुरवठा रोखल्यास बांगलादेशची अर्थव्यवस्था कोलमडू शकते.

India electricity export to Bangladesh 2025 : शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) राजकीय अस्थिरता आणि भारतविरोधी वक्तव्ये सध्या शिगेला पोहोचली आहेत. मात्र, राजकारणाच्या या गदारोळात बांगलादेश एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरत चालला आहे, ती म्हणजे त्यांची ‘लाईफलाईन’. बांगलादेश सध्या आपल्या विजेच्या गरजेसाठी भारतावर पूर्णपणे अवलंबून आहे. परिस्थिती अशी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक जरी कडक इशारा दिला, तरी बांगलादेशच्या मोठ्या भागातील वीज गुल होऊन तिथे अंधाराचे साम्राज्य पसरू शकते.

भारताची वीज: बांगलादेशची जीवनवाहिनी

बांगलादेश सध्या तीव्र गॅस टंचाई आणि कोळसा टंचाईचा सामना करत आहे. त्यांच्या देशातील अनेक वीज प्रकल्प तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत. अशा कठीण काळात भारताने बांगलादेशला मदतीचा हात दिला आहे. गेल्या एका वर्षात बांगलादेशची भारताकडून वीज आयात तब्बल ७० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी भारताचा वाटा ९.५% होता, जो आता १७% वर पोहोचला आहे. म्हणजेच, बांगलादेशात वापरल्या जाणाऱ्या दर १०० युनिट्स पैकी १७ युनिट्स ही भारतातून आलेली असतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tarique Rahman: 17 वर्षांनंतर ‘डार्क प्रिन्स’चे मायदेशी पुनरागमन; बांगलादेशात बदलाचे वारे, भारतासाठी आशा की धोक्याची घंटा?

अदानी पॉवर आणि झारखंड कनेक्शन

बांगलादेशला वीज पुरवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावत आहे ती म्हणजे गौतम अदानी यांची ‘अदानी पॉवर’. झारखंडमधील गोड्डा येथील कोळसा प्रकल्पातून दररोज १,५०० मेगावॅट वीज थेट बांगलादेशला पाठवली जाते. याशिवाय एनटीपीसी (NTPC), पीटीसी इंडिया आणि सेम्बकॉर्प एनर्जी यांसारख्या कंपन्या मिळून सुमारे २,३०० ते ३,००० मेगावॅट वीज पुरवण्याची क्षमता ठेवतात. जर भारताने आपला हा पुरवठा थांबवला, तर बांगलादेशातील उद्योगधंदे, रुग्णालये आणि रेल्वे सेवा ठप्प होऊ शकतात.

THE MODUS OPERANDI 🚨‼️ Modi goes to Bangladesh, tells them that India can supply them electricity. Two months later, Adani signs an MOU with Bangladesh for supplying power, even without having a power plant in that country or anywhere nearby. Modi then gives a loan to… pic.twitter.com/kfbowMmjXU — India Awakened (@IndiaAwakened_) November 19, 2025

credit : social media and Twitter

बांगलादेश इतका हतबल का झाला?

एकेकाळी बांगलादेश आपली दोन तृतीयांश वीज नैसर्गिक वायूपासून (Natural Gas) तयार करत असे. परंतु आता वायूचा दाब कमी झाल्यामुळे आणि तांत्रिक समस्यांमुळे हे प्रकल्प निकामी झाले आहेत. बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या (BPDB) अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे की, त्यांच्याकडे इंधन तेल विकत घेण्यासाठी पैसे नाहीत किंवा गॅस उपलब्ध नाही. अशा स्थितीत भारताकडून मिळणारी वीज ही एकमेव स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय उरली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

राजकीय विष ओकणे पडणार महागात

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये काही घटक भारताविरुद्ध सातत्याने प्रक्षोभक विधाने करत आहेत. मात्र, भारताशी संबंध ताणणे बांगलादेशला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या परवडणारे नाही. भारताने केवळ वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला, तर बांगलादेशातील ढाका, चितगाव यांसारखी मोठी शहरे तासनतास अंधारात राहतील. भारतासोबतचा हा वीज करार केवळ व्यावसायिक नसून तो द्विपक्षीय संबंधांचा पाया आहे, याची जाणीव बांगलादेशला ठेवावी लागणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशला भारतातून किती टक्के वीज मिळते?

    Ans: बांगलादेशच्या एकूण वीज पुरवठ्यात भारताचा वाटा सुमारे १७% आहे.

  • Que: कोणती भारतीय कंपनी बांगलादेशला सर्वाधिक वीज पुरवते?

    Ans: अदानी पॉवर (Adani Power) ही कंपनी झारखंडमधील गोड्डा प्रकल्पातून दररोज १,५०० मेगावॅट वीज पुरवते.

  • Que: बांगलादेश भारतावर विजेसाठी का अवलंबून आहे?

    Ans: बांगलादेशात सध्या नैसर्गिक वायूची (Natural Gas) तीव्र टंचाई आहे आणि त्यांचे स्वतःचे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत.

Web Title: One warning from pm modi could plunge bangladesh into darkness as india controls 17 of their power supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Adani Group
  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • international news

संबंधित बातम्या

Tarique Rahman: 17 वर्षांनंतर ‘डार्क प्रिन्स’चे मायदेशी पुनरागमन; बांगलादेशात बदलाचे वारे, भारतासाठी आशा की धोक्याची घंटा?
1

Tarique Rahman: 17 वर्षांनंतर ‘डार्क प्रिन्स’चे मायदेशी पुनरागमन; बांगलादेशात बदलाचे वारे, भारतासाठी आशा की धोक्याची घंटा?

Atal Jayanti: 101व्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त लखनौ ‘अटलमय’; PM मोदींच्या हस्ते 230 कोटींच्या ‘राष्ट्र प्रेरणा स्थळा’चे  लोकार्पण
2

Atal Jayanti: 101व्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त लखनौ ‘अटलमय’; PM मोदींच्या हस्ते 230 कोटींच्या ‘राष्ट्र प्रेरणा स्थळा’चे लोकार्पण

India–Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधात तणाव; बांगलादेश भारतावर कशासाठी अवलंबून आहे?
3

India–Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधात तणाव; बांगलादेश भारतावर कशासाठी अवलंबून आहे?

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
4

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.