Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US Tension: ‘आम्ही अमेरिकेसोबत चर्चेला तयार, पण…!’ इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अणुकार्यक्रमाबद्दल स्पष्ट केली भूमिका

Iran US : इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेसोबत चर्चा पुन्हा सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे, परंतु क्षेपणास्त्र कार्यक्रमावर करार होण्याची शक्यता नाकारली आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 08, 2026 | 12:09 PM
iran us talks update abbas araghchi missile program non negotiable trump netanyahu meeting

iran us talks update abbas araghchi missile program non negotiable trump netanyahu meeting

Follow Us
Close
Follow Us:
  • चर्चेचे वारे
  • इराणचा कडक इशारा
  • नेतान्याहू-ट्रम्प भेट

Iran US talks Oman February 2026 : पश्चिम आशियातील राजकारण सध्या एका अत्यंत नाजूक वळणावर आहे. इराण आणि अमेरिका (Iran Vs America) यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच, इराणने आपल्या ‘रेड लाईन्स’ (मर्यादा) स्पष्ट केल्या आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ‘अल जझीरा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमेरिकेसोबतच्या चर्चेवर मोठे अपडेट दिले आहेत. इराण चर्चेसाठी तयार आहे, पण देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

क्षेपणास्त्र कार्यक्रम: इराणची ‘नो कॉम्प्रमाईज’ भूमिका

इराण आणि अमेरिका यांच्यात ओमानच्या मस्कतमध्ये शुक्रवारी अत्यंत गुप्तपणे चर्चा पार पडली. या चर्चेत अमेरिकेने इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर निर्बंधांची मागणी केली होती. मात्र, अराघची यांनी हे स्पष्ट केले की, इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा केवळ संरक्षणासाठी आहे आणि तो कधीही वाटाघाटींचा विषय असू शकत नाही. “आम्ही अणुकार्यक्रमावर बोलू शकतो, पण आमची शस्त्रे आमचा अधिकार आहेत,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Drone Warfare: रशियाची ड्रोनयुद्धात निर्णायक आघाडी; 87,000 सैनिकांच्या ताफ्याने युरोपची झोप उडवली, ब्रिटीश सैन्य येणार गुडघ्यावर

विमानवाहू जहाज आणि अमेरिकेचा लष्करी दबाव

एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेने लष्करी दबाव कायम ठेवला आहे. ट्रम्प यांचे निकटवर्तीय स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जेरेड कुशनर यांनी अरबी समुद्रात तैनात असलेल्या ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या महाकाय विमानवाहू जहाजाला भेट दिली. या भेटीकडे “शांतता शक्तीद्वारेच शक्य आहे” या ट्रम्प यांच्या संदेशाचा भाग म्हणून पाहिले जात आहे. इराणने या लष्करी हालचालींचा निषेध केला असून, “हल्ला झाला तर अमेरिकन तळांची राखरांगोळी करू,” अशी धमकी दिली आहे.

BREAKING: Iranian Foreign Minister Araghchi: Trump said no nuclear weapons, and we fully agree. We fully agree with that. That could be a very good deal. In return, we expect sanction lifting, so that deal is possible. Let’s not talk about impossible things. pic.twitter.com/mcqmaTHFeg — Clash Report (@clashreport) February 1, 2026

credit – social media and Twitter

नेतान्याहू यांचा ‘ट्रम्प’ कार्ड: इस्रायलचा नवा डाव?

पुढील आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू वॉशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत नेतान्याहू इराणच्या अणुकार्यक्रमापेक्षा त्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर आणि इराण पुरस्कृत गटांवर (उदा. हिजबुल्ला, हमास) अधिक लक्ष केंद्रित करण्याची विनंती करणार आहेत. इस्रायलच्या मते, इराण केवळ अणुबॉम्बनेच नाही, तर त्यांच्या क्षेपणास्त्रांनीही जगासाठी धोका बनला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

इराणमधील अंतर्गत परिस्थिती आणि निदर्शने

बाहेरील तणावाप्रमाणेच इराणला अंतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये इराण सरकारने ३,११७ लोकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, मानवाधिकार संघटनांचा दावा आहे की हा आकडा ७,००० च्या जवळ आहे. या परिस्थितीमुळे इराण सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा दबाव आहे, ज्यामुळे त्यांना अमेरिकेशी चर्चा करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चेचा मुख्य मुद्दा काय आहे?

    Ans: मुख्य चर्चा इराणच्या अणुकार्यक्रमावर (Nuclear Program) आहे. मात्र, अमेरिका आता त्यात इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुद्दाही जोडू पाहत आहे.

  • Que: इराणने अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याची धमकी का दिली?

    Ans: अमेरिकेने अरबी समुद्रात आपली लष्करी ताकद (विमानवाहू जहाजे) वाढवली असून, हल्ल्याची शक्यता गृहीत धरून इराणने हा इशारा दिला आहे.

  • Que: नेतान्याहू-ट्रम्प भेटीचा इराणवर काय परिणाम होईल?

    Ans: इस्रायल अमेरिकेला इराणवर अधिक कडक आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादण्यासाठी दबाव टाकू शकतो, ज्यामुळे चर्चेची प्रक्रिया विस्कळीत होऊ शकते.

Web Title: Iran us talks update abbas araghchi missile program non negotiable trump netanyahu meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • America
  • international news
  • iran

संबंधित बातम्या

Trump Assassination Attempt : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपीने नाकारला गुन्हा, आता पुढे काय?
1

Trump Assassination Attempt : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपीने नाकारला गुन्हा, आता पुढे काय?

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 
2

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!
3

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

Hormuz Strait: Iran-US संघर्ष विकोपाला! होर्मुझमध्ये ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’चा तैनात; जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका?
4

Hormuz Strait: Iran-US संघर्ष विकोपाला! होर्मुझमध्ये ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’चा तैनात; जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.