१७ वर्षांनंतर 'डार्क प्रिन्स'चे मायदेशी पुनरागमन; ढाक्यातील राजकारणात भूकंप, पाहा भारतासाठी आशा की धोक्याची घंटा? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Tarique Rahman return to Bangladesh 2025 news : बांगलादेशच्या (Bangladesh) राजकारणात आज एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. ‘डार्क प्रिन्स’ म्हणून ओळखले जाणारे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) कार्याध्यक्ष तारिक रहमान (Tarique Rahman) तब्बल १७ वर्षांनंतर मायदेशी परतले आहेत. २००८ पासून लंडनमध्ये निर्वासित जीवन जगणाऱ्या तारिक यांच्या आगमनाने ढाक्याच्या रस्त्यांवर जनसागराचा पूर लोटला होता. विमानतळ ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत निघालेल्या रोड शोमध्ये सुमारे ५० लाख समर्थक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला असून, या शक्तीप्रदर्शनाने विद्यमान मोहम्मद युनूस सरकार आणि कट्टरपंथी शक्तींचे धाबे दणाणले आहेत.
तारिक रहमान यांनी बांगलादेशात पाऊल ठेवताच अत्यंत सावध पण आक्रमक राजकीय पवित्रा घेतला आहे. त्यांनी ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी संघटनेसोबत निवडणूक युती करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणातून प्रेरणा घेत त्यांनी “बांगलादेश फर्स्ट” ही नवी घोषणा दिली आहे. “ना दिल्ली, ना रावळपिंडी; आमच्यासाठी बांगलादेश आधी,” असे म्हणत त्यांनी स्पष्ट केले की बीएनपी आता कोणाच्याही दबावाखाली काम करणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे युनूस सरकारमधील कट्टरपंथी घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात तारिक रहमान यांच्या पुनरागमनाकडे अत्यंत बारकाईने पाहिले जात आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी असल्याने आणि भारतविरोधी ‘जमात’ची ताकद वाढत असल्याने, भारतासाठी बीएनपी हा आता एकमेव मोठा लोकशाही पर्याय उरला आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती, ज्याला बीएनपीने सकारात्मक प्रतिसाद दिला. ऐतिहासिक दृष्ट्या बीएनपीचे भारताशी संबंध ताणलेले असले, तरी जमातसारख्या ‘पाकिस्तान धार्जिण्या’ शक्तींना रोखण्यासाठी भारत आता तारिक रहमान यांच्याकडे आशेने पाहत आहे.
BREAKING 🇧🇩 BNP Acting Chairman Tarique Rahman is returning to Bangladesh today, ending 17 years in exile. He is en route to Dhaka and major political moment ahead.#Yunus #SheikhHasina #Elections pic.twitter.com/pXYbaQa9Ye — The Alternate Media (@AlternateMediaX) December 25, 2025
credit : social media and Twitter
माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र असलेले तारिक रहमान हे २००१ ते २००६ या काळात बांगलादेशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते. त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आणि त्यांना ‘डार्क प्रिन्स’ म्हटले गेले. २००४ च्या ढाका ग्रेनेड हल्ल्यातही त्यांचे नाव आले होते. मात्र, गेल्या वर्षी बांगलादेशच्या न्यायालयाने त्यांना अनेक प्रमुख प्रकरणांमधून निर्दोष मुक्त केले, ज्यामुळे त्यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Christmas 2025: केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस
तारिक रहमान हे त्यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजे बोगुरा ६ (सदर) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर त्यांच्या मातोश्री बेगम खालिदा झिया बोगुरा ७ मधून नशीब आजमावतील. ढाका विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये जमातच्या विद्यार्थी संघटनेने मिळवलेल्या अनपेक्षित विजयानंतर, तारिक रहमान यांचे पुनरागमन बीएनपीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारे ठरेल. मात्र, वाढत्या कट्टरतावादामुळे येणाऱ्या काळात बीएनपी आणि जमात यांच्यात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत, ज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
Ans: तारिक रहमान सुमारे १७ वर्षांच्या दीर्घ काळानंतर लंडनहून बांगलादेशात परतले आहेत.
Ans: त्यांनी "बांगलादेश फर्स्ट" (Bangladesh First) धोरणाची घोषणा केली असून, जमात-ए-इस्लामीसोबत युती करण्यास नकार दिला आहे.
Ans: वाढत्या कट्टरतावादाला आणि 'जमात'च्या प्रभावाला रोखण्यासाठी भारत बीएनपीला एक उदारमतवादी पर्याय म्हणून पाहत असल्याने हे पुनरागमन महत्त्वाचे आहे.






