Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canada Immigration : ‘आता परत कसं जाणार?’ 10 लाख भारतीयांसमोर अस्तित्वाचं संकट; कॅनडाच्या नियमांनी मोडलं कंबरडं

Canada Immigration: २०२६ मध्ये कॅनडामध्ये पहिल्यांदाच मोठ्या संख्येने लोकांना त्यांचा कायदेशीर दर्जा गमावण्याचा धोका आहे. यामुळे कॅनडामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 03, 2026 | 11:59 AM
Over 1 million Indians in Canada are at risk of losing their legal status as illegal immigrants

Over 1 million Indians in Canada are at risk of losing their legal status as illegal immigrants

Follow Us
Close
Follow Us:
  •  २०२६ च्या अखेरीपर्यंत कॅनडात सुमारे २० लाख लोक आपला कायदेशीर दर्जा गमावतील, ज्यामध्ये अर्ध्याहून अधिक (१० लाख) भारतीय असण्याची भीती आहे.
  •  ट्रूडो सरकारने इमिग्रेशन नियम कडक केल्यामुळे वर्क परमिट संपलेल्या भारतीयांना ‘पीआर’ (PR) मिळवणे कठीण झाले असून, त्यांच्यासमोर मायदेशी परतणे किंवा बेकायदेशीर राहणे असे दोनच पर्याय उरले आहेत.
  •  ब्रॅम्प्टन आणि टोरंटोच्या जंगली भागात बेकायदेशीर स्थलांतरितांनी तंबू ठोकले असून, पोट भरण्यासाठी ते मिळेल त्या कामासाठी धडपडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Canada work permit expiry 2026 Indians :  ‘मिनी पंजाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनडामध्ये (Canada )सध्या भारतीय समुदायावर ऐतिहासिक संकट ओढवले आहे. एकेकाळी स्थलांतरितांचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या या देशात आता १० लाखांहून अधिक भारतीयांना आपला कायदेशीर दर्जा (Legal Status) गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांत तब्बल २० लाख वर्क परमिट्सची मुदत संपणार असून, त्यापैकी अर्धी लोकसंख्या ही भारतीयांची आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कॅनडाच्या रस्त्यांवर आणि जंगलांमध्ये बेकायदेशीर भारतीयांचे तांडे दिसू लागले आहेत.

२० लाख वर्क परमिट्सचा कालावधी संपणार

इमिग्रेशन तज्ज्ञ कंवर सेराह यांनी ‘इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप’ (IRCC) च्या आकडेवारीचा हवाला देत खळबळजनक माहिती दिली आहे. त्यांच्या मते, २०२५ च्या अखेरीस १०.५ लाख आणि २०२६ मध्ये आणखी ९.२ लाख वर्क परमिट्स कालबाह्य होतील. कॅनडा सरकारने तात्पुरत्या कामगारांसाठी आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नियम अत्यंत कडक केल्यामुळे या लाखो लोकांना नवीन परवाना मिळणे किंवा कायमस्वरूपी रहिवासी (PR) होणे जवळपास अशक्य झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी

जंगलात तंबू ठोकून राहणारे ‘बेकायदेशीर’ भारतीय

या व्हिसा संकटाचा सर्वात भयानक परिणाम कॅनडातील जंगलांमध्ये पाहायला मिळत आहे. ब्रॅम्प्टन, कॅलेडॉन आणि टोरंटोच्या बाहेरील जंगली भागात बेकायदेशीर स्थलांतरितांनी तंबू ठोकले आहेत. स्थानिक पत्रकार नितीन चोप्रा यांनी दस्तऐवजीकरण केलेल्या अहवालानुसार, ज्यांचे व्हिसा संपले आहेत असे अनेक भारतीय तरुण पोलिसांच्या भीतीने जंगलात लपून राहत आहेत. हे तरुण केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी गुपचूप ‘कॅश’ (रोख रक्कम) वर काम करत आहेत. अनेक ठिकाणी दलाल तात्पुरते विवाह लावून देऊन व्हिसा वाढवण्याचे फसव्या आमिष दाखवत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.

🚨 Temporary residents in Canada —this moment matters.
Deportations are at decade highs, & Bill C-12 may accelerate enforcement in 2026.
PR pathways still exist, but strategy is critical @SPSImmigration https://t.co/tbnApf3jIo — Pradyuman Jhala (@PradyumanJhala) January 2, 2026

credit : social media and Twitter

विद्यार्थी आणि कामगारांची मोठी कोंडी

२०२६ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) अंदाजे ३.१५ लाख लोकांचा कायदेशीर दर्जा संपणार आहे. यात केवळ कामगारच नाहीत, तर हजारो भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे ज्यांचे स्टडी परमिट संपत आले आहे. हॅमिल्टन आणि ओंटारियो सारख्या प्रांतांमध्ये भारतीयांच्या मोठ्या वसाहती आहेत, तिथे आता चिंतेचे वातावरण आहे. अनेक भारतीयांनी आपली शेती आणि मालमत्ता विकून कॅनडा गाठले होते, आता व्हिसा संपल्यामुळे रिकाम्या हाताने भारतात परतणे त्यांच्यासाठी सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

कॅनडा सरकारच्या धोरणात मोठा बदल

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारने वाढत्या महागाईमुळे आणि घरांच्या टंचाईमुळे इमिग्रेशनवर मर्यादा आणल्या आहेत. “आम्ही आता पूर्वीसारखे सर्वांचे स्वागत करू शकत नाही,” असे संकेत सरकारने दिले आहेत. यामुळे ज्यांचे वर्क परमिट संपले आहे, त्यांना सक्तीने देश सोडावा लागणार आहे. जर त्यांनी देश सोडला नाही, तर त्यांना ‘डिपोर्ट’ (हद्दपार) केले जाईल. ही परिस्थिती इतकी भीषण आहे की, कॅनडाच्या इमिग्रेशन सिस्टिमवर याचा कधीही न झालेला ताण पडणार आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२६ मध्ये कॅनडात किती भारतीयांचा कायदेशीर दर्जा धोक्यात आहे?

    Ans: अंदाजे १० लाख भारतीयांचा कायदेशीर दर्जा धोक्यात आहे, कारण त्यांच्या वर्क परमिटची मुदत संपत आहे.

  • Que: भारतीयांना कॅनडात राहण्यासाठी जंगलात का जावे लागत आहे?

    Ans: व्हिसा संपल्यामुळे ते बेकायदेशीर ठरले आहेत, पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आणि घरांचे भाडे न परवडल्यामुळे अनेकजण जंगलात तंबू ठोकून राहत आहेत.

  • Que: कॅनडा सरकारने व्हिसा नियम का कडक केले आहेत?

    Ans: कॅनडातील वाढती घरांची टंचाई आणि महागाई यामुळे ट्रूडो सरकारने इमिग्रेशन धोरणात बदल करून नवीन व्हिसा देण्यावर मर्यादा आणल्या आहेत.

Web Title: Over 1 million indians in canada are at risk of losing their legal status as illegal immigrants camp in the jungle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 11:59 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.