Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus water treaty : शेपूट वाकडं ते वाकडंच! ‘जर तुम्ही आमचे पाणी थांबवले तर आम्ही…’, पाकिस्तानकडून पुन्हा भारताला धमकी

Pakistani military Ahmed Sharif Chaudhry: ऑपरेशन सिंधूरनंतरही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही. शेपूट वाकडं ते वाकडंच असं हा व्हिडीओ ऐकून तुम्हाला वाटेल.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 23, 2025 | 11:48 AM
पाकिस्तानकडून पुन्हा भारताला धमकी (फोटो सौजन्य-X)

पाकिस्तानकडून पुन्हा भारताला धमकी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Hafiz Saeed in threat to India in Marathi: ऑपरेशन सिंधूर नंतरही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही. शेपूट वाकडं ते वाकडंच असं एका व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लष्करी अधिकारी थेट भारताला धमकी देत ​​आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिकानेरमध्ये संपूर्ण जगाला संदेश दिल्यानंतर पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा अधिकारी दहशतवादी हाफिज सईदची भाषा बोलत असल्याचे दिसत आहे.

जग सध्या अशांततेच्या गर्तेत…’ परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा अमेरिकेवर, पाकिस्तानवर आणि जागतिक अस्थिरतेवर तीव्र हल्लाबोल

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेश सिंदूर लॉन्च केलं. २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलं. पहलगाम हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागली. भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केले आहे, मात्र दहशतवादाला आपल्या देशातून घालवण्याचं नाव अद्यापही ते काढत नसून चीनची मागच्या दराने मदत घेण्याचे काम सुरू झाले आहे. पाकिस्तान सेनेचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला थेट धमकी दिली.

🔴#BREAKING Pakistani military spokesperson @OfficialDGISPR is at a university in Pakistan delivering hate and violence-encouraging speeches against India echoing what terrorist Hafiz Saeed said some years ago !

Shameful! pic.twitter.com/W7ckNPePOH

— Taha Siddiqui (@TahaSSiddiqui) May 22, 2025

याचदरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी अलीकडेच भारताविरुद्ध द्वेषपूर्ण विधाने केली आहेत, जी कुठेतरी दहशतवादी हाफिज सईदच्या जुन्या वक्तृत्वाची आठवण करून देतात. हाफिज सईद हा २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे. हाफिज सईदचा भारत आणि अमेरिकेविरुद्ध भडकाऊ भाषणे देण्याचा इतिहास आहे.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद चौधरी पाकिस्तानातील एका विद्यापीठात भाषण देत होते. यावेळी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “जर तुम्ही आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेल्या सिंधू जल करारात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू नदी आणि तिच्या पाच उपनद्या, सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब यांच्या पाण्याच्या वाटप आणि व्यवस्थापनासाठी अटी निश्चित केल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे.

भारतानेही स्पष्ट केले- “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही”

दरम्यान, भारताने अनेक वेळा स्पष्टपणे म्हटले आहे की “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही”. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २३ एप्रिल रोजी पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत भारताने तो पुढे ढकलला आहे.

यासोबतच, अटारी सीमेवरील एकात्मिक तपासणी नाका (ICP) देखील तात्काळ बंद करण्यात आला. हे पाऊल भारताच्या दृढ आणि स्पष्ट धोरणाचे प्रतिबिंब आहे की दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत.

Earthquake: तिबेटमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे, 4.2 रिश्टर तीव्रतेचा झटका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Web Title: Pak army official parrots hafiz saeed in threat to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • india
  • Indus Water Treaty:
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
2

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
3

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.