Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Update : ईदच्या तोंडावर पाकिस्तानचा ‘नीच’पणा! अफगाण भूमीवर बॉम्बफेक आणि हवाई हल्ले; तालिबानने केली भीषण प्रतिज्ञा

Pakistan Airstrikes Kandahar:पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. अफगाणिस्तानचा दावा आहे की पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाण सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 13, 2026 | 10:45 AM
pakistan airstrikes kandahar afghanistan taliban retaliation 55 soldiers killed marathi

pakistan airstrikes kandahar afghanistan taliban retaliation 55 soldiers killed marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचा हवाई हल्ला
  • नागरिकांचा बळी
  • तालिबानचा पलटवार

Pakistan Afghanistan Conflict 2026 : संपूर्ण जगाचे लक्ष इराण आणि अमेरिकेच्या युद्धावर खिळलेले असताना, दुसरीकडे शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भीषण (Afghanistan-Pakistan Conflict) युद्धाला सुरुवात झाली आहे. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत आणि ईदच्या तोंडावर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत थेट हवाई हल्ले (Airstrikes) केले आहेत. या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातील कंधार, काबूल आणि पक्तिका यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून दोन्ही देशांमधील संबंध आता टोकाच्या वळणावर पोहोचले आहेत.

निवासी भागांवर बॉम्बवर्षाव: महिला आणि मुलांचा मृत्यू

अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी लष्करी तळांच्या नावाखाली थेट निवासी वस्त्यांवर बॉम्ब टाकले आहेत. यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांची घरे जमीनदोस्त झाली असून महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालिबान सरकारने या घटनेचा “क्रूर आक्रमकता” म्हणून निषेध केला आहे. रमजानसारख्या पवित्र काळात असा हल्ला करणे हे पाकिस्तानच्या अमानवीय मानसिकतेचे दर्शन घडवते, अशी टीका तालिबानने केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Program: इराणचे शास्त्रज्ञ संपवले, आता Mojtaba Khameneiची पाळी? युद्धादरम्यान नेतान्याहू यांची पहिलीच प्रतिक्रिया

कंधार विमानतळावर भीषण हल्ला: इंधन डेपो उद्ध्वस्त

या हवाई हल्ल्यातील सर्वात मोठे नुकसान कंधार विमानतळावर झाले आहे. पाकिस्तानी विमानांनी ‘काम एअर’ या खाजगी विमान कंपनीच्या इंधन डेपोला लक्ष्य केले. हा डेपो केवळ नागरी विमानांसाठीच नाही, तर संयुक्त राष्ट्रांच्या (UN) विमानांनाही इंधन पुरवठा करण्यासाठी वापरला जातो. जागतिक तेल संकट आधीच गडद असताना अशा प्रकारे इंधन साठ्यावर हल्ला केल्याने अफगाणिस्तानातील हवाई वाहतूक आणि मदत कार्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

#JUSTIN: The Islamic Emirate of Afghanistan has accused Pakistan of carrying out fresh airstrikes in Kabul, Kandahar, and Paktika Province, claiming civilian homes were hit and women and children were killed. Taliban spokesperson Zabiullah Mujahid condemned the alleged strikes,… pic.twitter.com/x4ZjbbJ5oK — India Today Global (@ITGGlobal) March 13, 2026

credit – social media and Twitter

तालिबानचा जशास तसे उत्तर: ५५ पाकिस्तानी सैनिक ठार?

पाकिस्तानच्या या आगळीकीला अफगाण सैन्याने (तालिबान) अत्यंत कडक शब्दांत आणि कृतीने उत्तर दिले आहे. तालिबानने जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यांनी सीमेवर पाकिस्तानच्या १९ लष्करी चौक्या आपल्या ताब्यात घेतल्या असून या कारवाईत ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. “पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीचा हिशोब घेतला जाईल आणि हा हल्ला शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा अफगाण प्रवक्त्याने दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Politics : ‘हे आधीही घडलं होतं…’ इराण युद्धावरून अमेरिकेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली; बोल्टन यांचा ‘घरचा आहेर’

युद्धाचे जागतिक पडसाद

मध्यपूर्वेत आधीच तणाव असताना आता दक्षिण आशियातही युद्ध पेटल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की त्यांनी केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे, मात्र जमिनीवरील परिस्थिती काही वेगळीच दिसत आहे. दोन्ही देशांमधील हा लष्करी संघर्ष आता दीर्घकालीन युद्धाचे रूप धारण करण्याची चिन्हे आहेत, ज्याचा फटका संपूर्ण आशिया खंडाला बसू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कोणत्या भागांवर हल्ले केले?

    Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील कंधार, काबूल, पक्तिया आणि पक्तिका या प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले आहेत.

  • Que: तालिबानने पाकिस्तानवर काय कारवाई केली?

    Ans: प्रत्युत्तरादाखल तालिबानने पाकिस्तानच्या १९ लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या असून ५५ पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे.

  • Que: या हल्ल्यात सर्वसामान्यांचे काय नुकसान झाले?

    Ans: निवासी भागावर झालेल्या हल्ल्यात अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून महिला आणि मुलांचा मृत्यू झाला आहे, तसेच कंधारमधील महत्त्वाचा इंधन डेपो जळून खाक झाला आहे.

Web Title: Pakistan airstrikes kandahar afghanistan taliban retaliation 55 soldiers killed marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Afghanistan taliban
  • Afghanistan-Pakistan Conflict
  • World War 3

संबंधित बातम्या

Hormuz Strait: ट्रम्प आणि नेतान्याहू यांना येईल हार्ट अटॅक; इराणचा गंभीर इशारा, आता वापरणार ‘हे’ महाविनाशक शस्त्र
1

Hormuz Strait: ट्रम्प आणि नेतान्याहू यांना येईल हार्ट अटॅक; इराणचा गंभीर इशारा, आता वापरणार ‘हे’ महाविनाशक शस्त्र

Durand Line: पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून अल-कायदा तालिबानच्या बाजूने; आसिम मुनीर यांच्याविरोधात लष्करालाच ‘असे’ भडकवले
2

Durand Line: पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून अल-कायदा तालिबानच्या बाजूने; आसिम मुनीर यांच्याविरोधात लष्करालाच ‘असे’ भडकवले

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले
3

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले

Terror Alert: बांगलादेश हवाई दलात ‘TTP’ची एन्ट्री? ढाका हवाई तळावर मध्यरात्री मोठे छापे; 10 जवान ताब्यात, 4 जण परदेशात फरार
4

Terror Alert: बांगलादेश हवाई दलात ‘TTP’ची एन्ट्री? ढाका हवाई तळावर मध्यरात्री मोठे छापे; 10 जवान ताब्यात, 4 जण परदेशात फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.