'इराणमधील अनेक प्रमुख अणुशास्त्रज्ञ संपले', इस्रायली हल्ले थांबणार नाहीत असे सांगून नेतान्याहू पहिल्यांदाच आले जगासमोर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran Nuclear Scientists Killed Netanyahu Iran War Statement : मध्यपूर्वेतील युद्धाला (US-Israel Iran War) आता भयानक वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण संघर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) पहिल्यांदाच जगासमोर आले आणि त्यांनी इराणच्या नाड्या आवळल्याचा खळबळजनक दावा केला. एका सविस्तर पत्रकार परिषदेत बोलताना नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, इराण आता “पूर्वीसारखा राहिलेला नाही”. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईने इराणची कणा असलेली ‘आयआरजीसी’ (IRGC) आणि बासीज दलाचे कंबरडे मोडले आहे.
नेतान्याहू यांनी सर्वात मोठा दावा इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल केला आहे. त्यांच्या मते, इस्रायली गुप्तचर यंत्रणा आणि हवाई दलाने अशा अचूक ठिकाणी हल्ले केले आहेत, ज्यात इराणचे अनेक दिग्गज अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. हे तेच शास्त्रज्ञ होते जे इराणला अण्वस्त्र सज्ज करण्यासाठी अहोरात्र काम करत होते. इराण आपला अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम जगापासून लपवत होता, परंतु इस्रायलने तो कार्यक्रम आता कित्येक वर्षे मागे ढकलला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : KC-135 Tanker Crash: अमेरिकेचं महाकाय विमान कोसळलं! इराण युद्धादरम्यान मोठी दुर्घटना; 6 सैनिकांचा थरारक बचाव
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्याबद्दल विचारले असता, नेतान्याहू यांनी अत्यंत खोचक टिप्पणी केली. त्यांनी मोज्तबा यांना “क्रांतिकारी रक्षकांचे (IRGC) कठपुतळी” असे संबोधले. इतकेच नाही तर, मोज्तबा खामेनी आता भीतीपोटी आपला चेहराही जगाला दाखवू शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. “आम्ही कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या नेत्याला ‘जीवन विमा’ देत नाही,” असे म्हणत त्यांनी मोज्तबा खामेनी आणि हिजबुल्लाह प्रमुख नैम कासेम यांना थेट मृत्यूचा इशारा दिला आहे.
NEW – Netanyahu declares that the Iran War is not only turning Israel into a “regional superpower,” but into a “global superpower.” pic.twitter.com/WjxrJ12waI — Disclose.tv (@disclosetv) March 12, 2026
credit – social media and Twitter
या युद्धात अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नेतान्याहू यांनी पुष्टी केली की, त्यांचे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध आता अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही नेते युद्धाच्या प्रत्येक हालचालीवर नियमितपणे चर्चा करत आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे इस्रायल आता अधिक आक्रमक झाला असून, इराणच्या आण्विक सुविधा पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय इस्रायल थांबणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Politics : ‘हे आधीही घडलं होतं…’ इराण युद्धावरून अमेरिकेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली; बोल्टन यांचा ‘घरचा आहेर’
केवळ इराणच नाही, तर लेबनॉनमधील हिजबुल्लाहवरही इस्रायलचे हल्ले सुरूच राहणार आहेत. २ मार्चपासून हिजबुल्लाहने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून नेतान्याहू यांनी “जास्त किंमत” वसूल करण्याचे आश्वासन दिले आहे. लेबनीज सरकारला इशारा देताना ते म्हणाले की, जर त्यांना आपला देश वाचवायचा असेल, तर त्यांनी हिजबुल्लाहला रोखण्यासाठी पहिले पाऊल उचलावे, अन्यथा इस्रायल कोणाचीही गय करणार नाही.
Ans: नेतान्याहू यांनी सांगितले की इस्रायली हल्ल्यात इराणचे अनेक शीर्ष अणुशास्त्रज्ञ मारले गेले असून त्यांचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे.
Ans: नेतान्याहू यांनी मोज्तबा खामेनींना 'कठपुतळी' म्हटले असून त्यांना आणि हिजबुल्लाह प्रमुखांना जीवे मारण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे.
Ans: होय, पंतप्रधान नेतान्याहू आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या रणनीतीवर नियमितपणे आणि मोकळेपणाने संवाद साधत आहेत.






