
Pakistan Army declares Imran Khan insane Major army attack immediately after Asim Munir's appointment
Adiala Jail Meetings Ban : पाकिस्तानचे (Pakistan) राजकारण सध्या अभूतपूर्व गोंधळ आणि अस्थिरतेच्या खाईत आहे. जनरल असीम मुनीर (Asim munir) यांची संरक्षण दलांचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही वेळातच, पाकिस्तानी लष्कराने एक अतिशय कठोर आणि थेट भूमिका घेतली आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन जारी करून माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ‘मानसिकदृष्ट्या अयोग्य’ (Mentally Unfit) आणि ‘मानसिकदृष्ट्या आजारी’ घोषित केले आहे. या घोषणेमुळे पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे.
लष्कराने थेट इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान तुरुंगातून नागरिकांना लष्कराविरुद्ध भडकवण्याचा आणि चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि ‘देशद्रोह्यांची भाषा’ बोलत आहेत, जे आता सहन केले जाणार नाही, असे लष्कराने स्पष्ट केले आहे. सरकार आणि लष्कराच्या या थेट कृतीमुळे आता एकच प्रश्न उभा राहिला आहे: पाकिस्तानच्या राजकारणात इम्रान खानविरुद्ध पुढे काय होणार आहे? आणि याचा त्यांच्या समर्थक, पीटीआय (PTI) पक्षावर काय परिणाम होईल?
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Russia : भारताचा ऊर्जा नकाशा बदलणार! पुतिन यांच्यासोबत ‘पोर्टेबल अणुऊर्जा’ करार; SMR तंत्रज्ञान देशासाठी फायदेशीर
इम्रान खान यांना वेडा घोषित केल्यानंतर सरकारची पहिली रणनीती आदियाला तुरुंग (Adiala Jail) केंद्रावर केंद्रित आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणालाही इम्रान खानला भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ त्यांचे वकील, कुटुंब आणि पक्ष नेते यांनाही आता तुरुंगात प्रवेश मिळणार नाही.
या निर्णयाचा थेट परिणाम असा होईल की, तुरुंगातील इम्रान खान यांच्या परिस्थितीबद्दल कोणतीही माहिती बाहेर येणे जवळपास अशक्य होईल. त्यांच्या वकिलांना त्यांच्याशी चर्चा करता येणार नाही, ज्यामुळे त्यांची कायदेशीर लढाई कमकुवत होईल. इम्रानच्या राजकीय कारवायांना उर्वरित देशापासून पूर्णपणे वेगळे करण्याचा आणि त्यांना राजकीय एकांतात (Political Isolation) ढकलण्याचा हा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
इम्रान खान यांना वेगळे पाडल्यानंतर सरकार आणि लष्कराची दुसरी मोठी चाल म्हणजे देशभरात पीटीआय समर्थकांनी आयोजित केलेली कोणतीही मोठी निदर्शने (Protests) किंवा रॅली रोखणे. पीटीआय समर्थकांना दडपण्यासाठी आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
९ मे रोजी झालेल्या हिंसक निदर्शनांसारखी कोणतीही घटना पुन्हा होऊ नये, हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : KAAN : बायकर ड्रोन आता पाकिस्तानमध्ये? तुर्कीयेची संरक्षण निर्यात 30 टक्क्यांनी वाढली; नवा बाजार पाकिस्तान
सरकार आणि लष्कर आता इम्रान खान यांच्याशी संबंधित संघटनांवर पूर्ण बंदी घालण्याच्या तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. यामध्ये पीटीआयच्या मुख्य राजकीय युनिट्स, डिजिटल टीम, मीडिया सेल आणि निधीशी संबंधित संस्थांचा समावेश असू शकतो. जर पीटीआय संघटनांवर ही बंदी लागू झाली, तर पीटीआयचे राजकीय अस्तित्व जवळपास संपुष्टात येऊ शकते. इम्रान खान यांना केवळ तुरुंगात एकटे पाडणे नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण राजकीय पक्षालाच कायदेशीररित्या जमिनीवर निष्प्रभ (Neutralize) करण्याची ही रणनीती आहे. यामुळे, इम्रान खान यांचे राजकीय भवितव्य अत्यंत अंधकारमय दिसत आहे.
Ans: ते मानसिकदृष्ट्या आजारी झाले असून तुरुंगातून लष्कराविरुद्ध 'देशद्रोही' भाषा बोलत आहेत.
Ans: त्यांना राजकीय कारवायांपासून वेगळे (Isolate) करण्यासाठी वकील आणि कुटुंबियांना भेटण्याची परवानगी नाकारली जाईल.
Ans: पीटीआय संघटनांवर पूर्ण बंदी घालून त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणे.