Pakistan extends ban on Indian flights in its airspace; know what is happening and the consequences
इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान पाकिस्तानने भारताविरोधी एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या एअरपोर्ट अथॉरिटी (PAA) ने एक भारतीय विमानांसाठी हवाई हद्दीवरील बंदी वाढवली आहे. ही बंदी २४ ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. २४ ऑगस्ट २०२५ पर्यंत सकाळी ५. १९ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने शुक्रवारी ( १८ जुलै) रोजू नाटिस टू एअर मॅन (NOTAM) अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत भारताच्या मालकीच्या, भारताद्वारे चालवल्या जाणाऱ्या किंवा लीजवर घेतलेल्या सर्व नागरी, लष्करी विमानांवर ही बंदी लागू करण्यात आली आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी भारताच्या जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ निरापराध नागरिकांचा बळी गेला होता. यानंतर बारताने ३० एप्रिल पासून पाकिस्तानच्या विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केले होते. २४ मे पर्यंत ही बंदी लागू करण्यात आली होती, त्यानंतर ही २४ जूनपर्यंत वाढवण्यात आली आणि आता पुन्हा २४ जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे.
याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने देखील भारतासाठी हवाई क्षेत्रावर बंदी घातली होती. ही बंदी आता २४ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव कायम आहे. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवली. या मोहीमेअंतर्गत भारताने ६ ते ७ मेच्या दरम्यान पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली.
तसेच भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने अनेक वेळा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला भारतावर केला. परंतु भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व हल्ले यशस्वीपण हाणून पाडली. सध्या दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमतीने युद्धविराम लागू आहे. परंतु दोन्ही देशांमधील संबंध अद्यापही सुधारलेले नाहीत.
पाकिस्तान हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांवर मोठा परिणाम होत आहे. मध्य पूर्व, युरोप आणि उत्तर अमेरिकेत जाणारी अनेक उड्डाणे पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जातात. परंतु पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताला मार्ग बदलावा लागला आहे. यामुळे भारताचा वेळ आणि इंधन दोन्हीचा खर्च वाढला आहे. भारतीय विमान कंपन्यांना सुमारे ७०० कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच पाकिस्तानला देखील ५ हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.