
Pakistan Navy recovers Ghazi ship sunk by India in 1971 war after 54 years
New PNS Ghazi submarine launch 2025 : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात (India-Pakistan War) ज्या एका घटनेने पाकिस्तानच्या नौदलाचे कंबरडे मोडले होते, ती घटना म्हणजे ‘पीएनएस गाझी’ (PNS Ghazi) या पाणबुडीचा नाश. विशाखापट्टणम बंदराजवळ भारतीय नौदलाने या बलाढ्य पाणबुडीला जलसमाधी दिली होती. तब्बल ५४ वर्षांनंतर, पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या एका नवीन पाणबुडीला ‘गाझी’ हे नाव देऊन इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. ही नवीन पाणबुडी चीनच्या मदतीने तयार करण्यात आली असून, ती आजच्या काळातील सर्वात प्रगत पाणबुड्यांपैकी एक मानली जात आहे.
पाकिस्तानने चीनसोबत केलेल्या ८ ‘हंगोर-क्लास’ पाणबुड्यांच्या करारांतर्गत ही चौथी पाणबुडी आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान याला ‘मेड इन पाकिस्तान’ म्हणून प्रमोट करत असले तरी, याचे डिझाइन आणि तंत्रज्ञान पूर्णपणे चिनी (Type 039B Yuan Class) आहे. २,८०० टन वजनाची आणि ७७ मीटर लांब असलेली ही पाणबुडी ‘एअर-इंडिपेंडंट प्रोपल्शन’ (AIP) तंत्रज्ञानाने सज्ज आहे. याचा अर्थ असा की, ती जास्त काळ समुद्राच्या खाली राहू शकते आणि रडारलाही ती शोधणे कठीण होते. ही पाणबुडी ‘बाबर-३’ सारखी अण्वस्त्रवाहू क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी
जुन्या ‘PNS Ghazi’चा इतिहास भारताच्या शौर्याशी जोडलेला आहे. अमेरिकेकडून भाड्याने घेतलेली ती पाकिस्तानची एकमेव लांब पल्ल्याची पाणबुडी होती. भारताचे विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ नष्ट करण्याचे मिशन तिला देण्यात आले होते. मात्र, भारतीय नौदलाने एक ‘फेक सिग्नल’ सोडून पाकिस्तानला विशाखापट्टणममध्ये अडकवले. ‘आयएनएस राजपूत’ने टाकलेल्या डेप्थ चार्जेसमुळे गाझीचा स्फोट झाला आणि त्यातील ९३ कर्मचारी समुद्रात गाडले गेले. पाकिस्तानने आजही अधिकृतपणे हे मान्य केलेले नाही की ती भारताने बुडवली, पण विशाखापट्टणमच्या समुद्रातील तिचे अवशेष आजही भारतीय विजयाची साक्ष देतात.
#BalidanDiwas #BravestOfBrave
This day in 1971 War, Capt Mahendra Nath Mulla MVC(P) showed the world what true heroism is…. His ship INS Khukhri was torpedoed by Pakistani submarine Hangor. Many have written about INS Khukri being slow…. its Sonar detection capability… pic.twitter.com/4JM91c10FL — Meghna Girish 🇮🇳 (@megirish2001) December 9, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : HIMARS : चीनच्या नाकावर टिच्चून! अमेरिकेने तैवानला बनवले ‘पॉवरहाऊस’; अखेर रणनीतिक महाकराराला अधिकृत मान्यता
पाकिस्तानने जुन्या नावाने नवी पाणबुडी आणून केवळ भावनिक राजकारण केले नसून, अरबी समुद्रात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. चीनकडून मिळणाऱ्या या ८ प्रगत पाणबुड्यांमुळे भारतीय नौदलासमोर ‘अंडरवॉटर’ सुरक्षेचे नवीन आव्हान उभे राहिले आहे. मात्र, भारतीय नौदलाचे ‘पी-८ आय’ विमाने आणि नवीन ‘कलवरी क्लास’ पाणबुड्या पाकिस्तानच्या कोणत्याही हालचालींना चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. नावात काय आहे, असं आपण म्हणतो; पण पाकिस्तानसाठी ‘गाझी’ हे नाव त्यांच्या पराभवाच्या आठवणी पुसून काढण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र, आधुनिक युद्धात तंत्रज्ञान आणि रणनीती महत्त्वाची असते, ज्यामध्ये भारतीय नौदल आजही वरचढ आहे.
Ans: १९७१ च्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या आयएनएस राजपूत ने विशाखापट्टणम बंदराजवळ पीएनएस गाझीला बुडवले होते.
Ans: नवीन पीएनएस गाझी ही चीनच्या वुचेंग शिपबिल्डिंग ग्रुपने तयार केली असून ती 'हंगोर-क्लास' (Type 039B) ची पाणबुडी आहे.
Ans: ही पाणबुडी AIP तंत्रज्ञानाने सज्ज असून ती रडारवर न येता क्रूझ क्षेपणास्त्रे डागू शकते आणि समुद्राखाली ३ आठवड्यांपर्यंत राहू शकते.