Pakistan on alert over feared Balakot 2.0 India deploys AEW&C Pakistan denies role
इस्लामाबाद : भारतात नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे, आणि त्याचे पडसाद शेजारील पाकिस्तानमध्ये स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. 2019 च्या बालाकोट हवाई कारवाईनंतर जेव्हा भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ला केला होता, तेव्हापासून पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा सतत तणावाखाली आहे.
यंदाच्या पहलगाम हल्ल्यात 28 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. यामुळे भारत पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलेल, अशी भीती पाकिस्तानला वाटत असून भारतीय सीमेवर लष्करी हालचालींमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानी हवाई दलाने AEW&C (Airborne Early Warning and Control) विमानं ज्यांना ‘स्काय आय’ असंही म्हटलं जातं सीमेवर तैनात केली आहेत, ही गोष्ट फारच बोलकी ठरत आहे.
AEW&C विमानं म्हणजे हवाईमध्ये फिरणारी रडार यंत्रणा, जी शत्रूच्या हालचाली आधीच टिपू शकते. या विमानांची खासियत म्हणजे –
1. 360 अंश निरीक्षण क्षमता
2. शत्रूचे फायटर जेट्स, ड्रोन, मिसाइल्स ओळखण्याची क्षमता
3. हजारो किलोमीटर अंतरावरून रडार कव्हरेज
4. इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स (ELINT) साठी सक्षम तंत्रज्ञान
पाकिस्तानकडे सध्या साब एरिये AEW&C विमानं आहेत, जी स्वीडनच्या SAAB कंपनीने बनवलेली असून ‘Erieye’ रडार प्रणालीने सुसज्ज आहेत. भारताच्या सीमेवर या विमानांची तैनाती हे दर्शवतं की पाकिस्तानला भारताकडून एखाद्या सर्जिकल स्ट्राईक किंवा हवाई हल्ल्याची तीव्र भीती वाटत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रावलकोटमध्ये रचला गेला होता पहलगाम हल्ल्याचा कट? ‘लष्कर-ए-तोयबाची’ उघड धमकी आणि भारताविरोधातील कटाचे नवे पुरावे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला, तर गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ काश्मीरमध्ये हजेरी लावली. हे सर्व घडत असताना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड हालचाल दिसून येते. भारतीय हवाई दलाच्या हालचाली, सैनिकी संप्रेषणं आणि सीमावर्ती तैनातीवर पाकिस्तानकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काही अहवालांनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने ELINT प्लॅटफॉर्मचाही वापर सुरू केला आहे, जेणेकरून भारताच्या गुप्त हालचालींची माहिती आधीच मिळवता येईल.
BREAKING: Pakistan Airforce launched AWACS near indian border from rajasthan to jammu sector. in anticipation of retaliation after deadly terrorist attack in #Pahalgam #Kashmir #PAF #IAF #PahalgamTerrorAttack pic.twitter.com/hq8Zwq18a3
— Neelesh Purohit (VT-NLS) 🇮🇳 (@aapkaneelesh) April 22, 2025
credit : social media
२०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकपासून ते २०१९ च्या बालाकोट हल्ल्यापर्यंत भारताने दहशतवाद्यांवर थेट हल्ला करून जगाला आपली धोरणात्मक क्षमताही दाखवून दिली आहे. त्यामुळे, यावेळीही भारत कठोर उत्तर देईल, याची खात्री पाकिस्तानला वाटते आहे. सीमेवर AEW&C विमानांची तैनाती आणि हाय अलर्ट याचा अर्थ स्पष्ट आहे, पाकिस्तान संभाव्य भारतीय कारवाईसाठी सज्ज होतो आहे, पण त्यामागे लपलेली घबराटही स्पष्ट दिसून येते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया; संरक्षण मंत्री म्हणतात, ‘आमचा काहीही संबंध नाही’
भारतातील पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. AEW&C विमानांची तैनाती ही केवळ सामरिक हालचाल नसून, भारतीय हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान घाबरून गेला असल्याचं प्रतीत होतं. भारताकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी, देशभरात संताप आणि कठोर कारवाईची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची हालचाल ही बचावात्मक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, आणि यामागे ‘बालाकोट २.०’ सारख्या कारवाईची शंका पाकिस्तानच्या मनात खोलवर बसली आहे.