Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Journalist Murdered: इस्रायलला पाठिंबा देणं बेतलं जीवावर! दिवसाढवळ्या गोळ्या घालून पत्रकाराची केली निर्घृण हत्या

Pakistan journalist Murdered: पाकिस्तानातील कराची येथील एका टेलिव्हिजन चॅनेलचे पत्रकार आणि अँकर इम्तियाज मीर यांची हत्या करण्यात आली. पत्रकार इम्तियाज मीर यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 28, 2025 | 04:50 PM
Pakistani TV journalist Imtiaz Mir murdered in Karachi for supporting Israel international news

Pakistani TV journalist Imtiaz Mir murdered in Karachi for supporting Israel international news

Follow Us
Close
Follow Us:

Pro-Israel Pakistan Journalist Murdered: पाकिस्तानमध्ये पत्रकार देखील सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील कराची येथील एका टेलिव्हिजन चॅनेलचे पत्रकार आणि अँकर इम्तियाज मीर यांची हत्या करण्यात आली. पत्रकार इम्तियाज मीर यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. सिंध प्रांताचे गृहमंत्री झियाउल हसन लांझर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. लांझर म्हणाले की, इस्रायलच्या समर्थनार्थ केलेल्या टिप्पण्यांमुळे मीरची हत्या करण्यात आली आहे.

मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हत्येप्रकरणी चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ज्यांनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. गृहमंत्र्यांनी सांगितले की, २१ सप्टेंबर रोजी कराचीच्या मालीर परिसरातील चॅनेलच्या ऑफिसमधून बाहेर पडताना इम्तियाज मीर यांच्यावर भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की मीरला इस्रायलचा कथित समर्थक मानल्यामुळे त्याला लक्ष्य करण्यात आले. मात्र या हत्येमुळे पाकिस्तानमधील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चार खून संशयितांना अटक

सिंध पोलिस महानिरीक्षक गुलाम नबी मेमन आणि कराची पोलिस प्रमुख जावेद आलम ओधो यांनी सांगितले की या हत्येमागे एक संघटित अतिरेकी नेटवर्क आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले तरी, हत्येचा सूत्रधार शेजारच्या देशात असल्याचे त्यांनी सांगितले. अटक केलेल्या चार संशयितांची ओळख अजलाल झैदी, शहाब असगर, अहसान अब्बास आणि फराज अहमद अशी झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्व जण लष्कर सरुल्लाह नावाच्या संघटनेशी संबंधित आहेत, जी बंदी घातलेल्या जैनबियून ब्रिगेडचा भाग असल्याचे मानले जाते. ही संघटना पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या अतिरेकी गटांपैकी एक आहे आणि विविध परदेशी नेटवर्कशी देखील तिचे संबंध आहेत. कराची पोलिसांसह दोन केंद्रीय गुप्तचर संस्थांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला: लांझर

गृहमंत्री लांझर म्हणाले की पत्रकार मीर यांची हत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे आणि सरकार अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करेल. त्यांनी आश्वासन दिले की गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल. दरम्यान, अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या नेटवर्क आणि परदेशी हँडलर्सपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमध्ये पत्रकारावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. एका अहवालानुसार, २०२४ पासून एकूण सहा पत्रकारांची हत्या झाली आहे.

 

Web Title: Pakistani tv journalist imtiaz mir murdered in karachi for supporting israel international news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • daily news
  • international news
  • Pakistan News

संबंधित बातम्या

US-Russia Agreement: पुतिन यांचा अमेरिकेला मोठा धक्का; ‘तो’ करार रद्द, दोन्ही देशांमधील तणाव शिगेला
1

US-Russia Agreement: पुतिन यांचा अमेरिकेला मोठा धक्का; ‘तो’ करार रद्द, दोन्ही देशांमधील तणाव शिगेला

India Russia oil imports: रुसवर लादलेल्या तेलबंदीने हाती येणार का? युद्धविराम होणार का शक्य?
2

India Russia oil imports: रुसवर लादलेल्या तेलबंदीने हाती येणार का? युद्धविराम होणार का शक्य?

Af-Pak Talks:अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील चर्चा फोल! ‘या’ मुद्द्यांवर तयार नाही तालिबान; चीनचा वाढला ताण
3

Af-Pak Talks:अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील चर्चा फोल! ‘या’ मुद्द्यांवर तयार नाही तालिबान; चीनचा वाढला ताण

ब्रिटनने पाकिस्तान एअरलाइन्सवरील बंदी हटवली; इस्लामाबादहून मॅंचेस्टरला पाच वर्षानंतर पहिले उड्डाण
4

ब्रिटनने पाकिस्तान एअरलाइन्सवरील बंदी हटवली; इस्लामाबादहून मॅंचेस्टरला पाच वर्षानंतर पहिले उड्डाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.