खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचा सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्यावर 50 कोटींचा मानहानीचा दावा केला (फोटो - सोशल मीडिया)
Satara Doctor Death Case: पुणे: फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक दावे समोर आले आहेत. संपदा मुंडे यांनी हातावर सुसाईड नोट लिहित जीवन संपवलं. त्यांच्यावर व्यवस्थेचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचा आरोप केला जात आहे. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक दावा केला आहे. यावरुन रणजीत नाईक निंबाळकर यांचा सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्यावर 50 कोटींचा मानहानीचा दावाकेला आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टीका करणाऱ्या सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्याविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. ‘सुषमा अंधारे यांनी 48 तासांमध्ये माफी मागावी’, अशी नोटीस निंबाळकरांनी त्यांना पाठवली आहे. फलटण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उप नेत्या सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केला. दरम्यान याच आरोपांवरून आता रणजितसिंह नाईक निंबाळकर सुषमा अंधारेंवर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं वकिलांमार्फत सांगण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वकील धीरज घाडगे यांनी याबाबत नोटीस बजावली आहे. वकीलांनी म्हटले आहे की, “आम्ही आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवली आहे. 50 कोटी आणि माफी मागावी. तसेच सुषमा अंधारे यांनी 48 तासात माफी मागावी. रणजित दादांनी एक देखील ऊस मुकादमा विरोधात नाही. फिट अनफिट संबंधित एकही प्रकरण झालेलं नाहीये. आज अखेर एकही तक्रार रणजित निंबाळकर यांनी मारहाण केलीय म्हणून तक्रार नाहीये. 277 एकही गुन्हा रणजित निंबाळकर यांनी केलेला नाही,” अशा शब्दांत वकीलांनी खासदारांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे सांगितले.
ती व्यक्ती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी संबंधित नाही
पुढे ते म्हणाले की, “खासदारांवर आरोप करणाऱ्या जयश्री अगावणे मोक्कामधील आरोपी आहेत. त्यांच्यावर 353चा गुन्हा आहे. सुषमा अंधारे या वैयक्तिक पॉलिटिकल अजेन्डा राबवत आहेत. ननावरे नावाच्या व्यक्तीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे आत्महत्या केलीये असं सुषमा अंधारे म्हणाल्या मात्र ती व्यक्ती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी संबंधित नाही असं त्यांच्या भावाने प्रतिज्ञा पत्र दिलेय. फलटणमध्ये 21 रणजित निंबाळकर आहेत,” असा देखील खुलासा वकीलांनी दिला आहे.
Satara Doctor death प्रकरणाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक कर
पुढे वकील धीरज घाडगे म्हणाले की, “रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलं नाही. दिगंबर आगवणे विरोधात रणजित निंबाळकर यांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही. 2019 पासून कारखानाचा आणि रणजित निंबाळकर यांचा काहीही संबंध नाहीये, असे देखील वकीलांनी म्हटले आहे. त्याचबरोबर फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर देखील खासदारांच्या वकीलांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पोलिसांनी 3 तक्रारी डॉक्टरच्या विरोधात केल्या आहेत. जर त्रास होत होता तर 3 वेळा बदलीची संधी असून फलटण का मागितलं? सुषमा अंधारे यांनी मयत मुलीच्या घरी जाऊन सहानभूती दाखवायला हवी. रणजित निंबाळकर यांची बदनामी करण्यासाठी सकाळी सुषमा अंधारे आणि जयश्री अगवाने पत्रकार परिषद घेतलीये,” असा आरोप रणजीत नाईक निंबाळकर यांचे वकील धीरज घाडगे यांनी केला.






