
Pakistan's begging industry worth $42 billion Beggar Network has a global reach
Pakistan News : पाकिस्तानमध्ये (Pakistan) परिस्थिती अशी झाली आहे की भिक्षा मागणे हा आता केवळ गरज किंवा उपजीविकेचा मार्ग राहिलेला नाही, तर तो एक आर्थिक इंडस्ट्री म्हणून आकार घेत आहे. अंदाजानुसार, पाकिस्तानमधील हा “भिक्षा उद्योग”( तब्बल 42 अब्ज डॉलर्सचा (₹3,50,000 कोटींचा) झाला आहे. हे आकडे केवळ पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभारत नाहीत, तर देशातील सामाजिक रचना कशी कोलमडली आहे याचेही गंभीर चित्र समोर आणतात.
अहवालांनुसार पाकिस्तानमध्ये भिक्षा मागणे आता अत्यंत सुस्थापित, संघटित आणि नियोजनबद्ध व्यवसाय म्हणून कार्यरत आहे. रस्ते, धार्मिक स्थळे, ट्रॅफिक सिग्नल आणि बाजारपेठा सर्वत्र भिकाऱ्यांचे वर्चस्व दिसते. अनेक ठिकाणी या मागे गँग, एजंट आणि नेटवर्क असल्याचेही संकेत आहेत. या नेटवर्कचे प्रमुख व्यक्ती विविध शहरांत भिकाऱ्यांचे ठिकाण, वेळ आणि लक्ष्य ठरवतात, आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेतील मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज
पाकिस्तानची एकूण लोकसंख्या अंदाजे 23 कोटी असून त्यातील जवळपास 3 कोटी 80 लाख लोक भीक मागतात. हा प्रमाण आश्चर्यचकित करणारा आहे, कारण याचा अर्थ देशातील प्रत्येक 6वा ते 7वा नागरिक भिक्षाटन करतो.
हे आकडे पाकिस्तानातील वाढणारी गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक असमानता स्पष्ट करतात.
फक्त पाकिस्तानपुरतेच नव्हे, तर सौदी अरेबिया, UAE, कतार आणि ओमान सारख्या देशांमध्येही पाकिस्तानी भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. अहवाल असे सुचवतात की मक्का, मदीना, दुबई आणि शारजाह येथे 90% पेक्षा जास्त भिकारी पाकिस्तानचे असल्याचे दिसून आले आहे.
काही भिकारी विशेष व्हिसा मिळवून धार्मिक ठिकाणी भीक मागण्याच्या उद्देशाने प्रवास करतात. जरी नियम कडक असले आणि अनेकांना deport केले जात असले, तरीही ही संख्या कमी होत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश
या उद्योगातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भिकाऱ्यांची कमाई. शहरानुसार ही रक्कम बदलते:
| शहर | सरासरी दैनंदिन कमाई |
|---|---|
| कराची | ₹2000 |
| लाहोर | ₹1400 |
| इस्लामाबाद | ₹950 |
| संपूर्ण पाकिस्तानचा सरासरी | ₹850 |
या आकड्यांमधून स्पष्ट होते की सामान्य मजुरांच्या तुलनेत काही भिकारी जास्त उत्पन्न कमावतात. त्यामुळे अनेक कुटुंबे हे काम संपूर्ण कुटुंबासाठी व्यवसाय म्हणून करतात.
Ans: सुमारे 42 अब्ज डॉलर्स.
Ans: अंदाजे 3 कोटी 80 लाख.
Ans: सौदी अरेबिया आणि UAE.