Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका! बलुच हल्ल्यानंतर लष्करप्रमुखांनी शाहबाज सरकारविरुद्ध पुकारले युद्ध

बलुचिस्तानमध्ये झालेल्या भीषण ट्रेन हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय आणि लष्करी भूकंप निर्माण झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने ट्रेनचे अपहरण करून तब्बल 100 हून अधिक पाकिस्तानी जवानांना ठार केल्याचा दावा केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 19, 2025 | 02:46 PM
Pakistan's existence at risk Army Chief Munir blasts Shahbaz govt after Baloch attack

Pakistan's existence at risk Army Chief Munir blasts Shahbaz govt after Baloch attack

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये झालेल्या भीषण ट्रेन हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय आणि लष्करी भूकंप निर्माण झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने ट्रेनचे अपहरण करून तब्बल 100 हून अधिक पाकिस्तानी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी संताप व्यक्त करत देशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर कडाडून टीका करत पाकिस्तानला अधिक ‘कठोर’ देश बनवण्याची गरज असल्याचे सांगितले.

बलुच बंडखोरांनी पाकिस्तानला पुन्हा नामोहरम केले

बलुचिस्तानच्या बोलान भागात घडलेल्या या घटनेने संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. BLA च्या मजीद ब्रिगेडने हा हल्ला केला असून, त्यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांना ओलीस धरल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक संसदीय समितीची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती, ज्यात लष्करप्रमुख मुनीर यांनी पाकिस्तान सरकारच्या असमर्थतेवर बोट ठेवले.

मुनीर म्हणाले, “पाकिस्तानला कठोर देश बनवण्याची वेळ आली आहे. जर शासन व्यवस्थित चालले नाही, तर लष्कर आणि सैनिकांचे रक्त किती दिवस ही पोकळी भरत राहणार?” त्यांनी पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाला आव्हान दिले की, जर आताच कठोर पावले उचलली नाहीत, तर देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tesla Data Leak: Elon Muskच्या कंपनीवर सायबर अटॅक करून हॅकर्सनी ठेवली विचित्र अट

पाकिस्तानची कमकुवत सुरक्षा आणि राजकीय अस्थिरता

पाकिस्तानातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत BLA सारखे बंडखोर संघटना अधिक हिंसक होत आहेत. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये लष्करावर वारंवार हल्ले होत आहेत, आणि पाकिस्तानी सरकार त्याला प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरत आहे. या घटनेने पाकिस्तानी लष्कराच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भारतावर आरोप, पण विश्वासार्ह पुरावे नाहीत

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारत आणि अफगाणिस्तानवर आरोप करत दावा केला की, BLA ला त्यांचा गुप्त पाठिंबा मिळत आहे. मात्र, पाकिस्तानकडे यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. भारताने या आरोपांना साफ नाकारले असून, पाकिस्तानमधील अंतर्गत अस्थिरतेसाठी ते स्वतःच जबाबदार असल्याचे सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट आधी वापरून मग चोरट्यांनी केले लंपास; वाचा ‘हा’ मजेदार किस्सा

बैठकीवर इम्रान खान यांच्या पक्षाचा बहिष्कार

सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलवण्यात आलेल्या संसदीय बैठकीवर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने बहिष्कार

Web Title: Pakistans existence at risk army chief munir blasts shahbaz govt after baloch attack nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • pakistan
  • Train Incident
  • World news

संबंधित बातम्या

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
1

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा
2

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण
3

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा
4

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.