
Peter Navarro On India AI-ChatGPT
‘Tarrif King’, ट्रम्पच्या सल्लागारांची भारतावर तीव्र टीका; रशियन तेल खरेदीवरुन केले गंभीर आरोप
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत, पीटर नवारो यांच्या मते, AI आणि ChatGPT ही अमेरिकेत विकसित झालेली सेवा आहे. अमेरिकेच्या गुंतवणूक दारांनी यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. यावर अमेरिकन पायाभूत सुविधा, उर्जा संसाधने आणि तांत्रिक गुंतवणूक ही अमेरिकेवर अवलंबून आहे. परंतु याचा सर्वाधिक वापर हा भारत आणि चीनमध्ये केला जातो. पीटर नावारो यांनी भारताच्या चॅटजीपीटीच्या वापरामुळे अमेरिकेवर आर्थिक भार वाढत असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी भारतात चॅटजीपीटी बंद करण्याची मागणी केली आहे.
पीटर नवारो यांनी दावा केला आहे की, ChatGPT आणि AI हे अमेरिकेच्या गुंतवणूकवीर कार्यरत आहेत. अमेरिकेत याचे मोठे युजर्स असल्याचे आणि यातूनच पैसा तयार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते भारत आणि चीन सारखे देश यामध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक करतात आणि याचा जास्त लाभ घेतात. त्यांनी अमेरिकेने याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या गुंतवणूकदारांच्या पैशावर चालणाऱ्या तांत्रिक सेवांचा फायदा परदेशी लोकांना होऊ देऊ नये असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या भारतात ChatGPT आणि AI बंद होणार अशा प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु पीटर नवारो यांच्या विधानामुळे भारत आणि चीन सारख्या देशातील लाखो ChatGPT आणि AI युजर्स चिंतेत आले आहेत. नवारो यांच्या मते भारतातील लोकांच्या ChatGPT च्या वापरामुळे अमेरिकेवर दबाव वाढत आहे.
पीटर नवारो यांची भारतविरोधी वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी अनेक वेळा भारतावर निशाणा साधला आहे. त्यांनी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधावरही टीका केली आहे. तसेत भारताच्या व्यापारी धोरणांबाबतही विष ओकले आहे. त्यांनी भारतावर आरोप केला आहे की, भारत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात सेवा निर्यात करतो परंतु अमेरिकन उद्योगांसाठी आणि कामगारांसाठी आपल्या बाजारपेठा खुल्या करत नाही. यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होते.
Ans: पीटर नवारो यांच्या मते, ChatGPT आणि AI हे अमेरिकेत विकसित झालेल्या सेवा आहेत. परंतु भारतसारखे देश त्याचा फायदा घेतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करत नाही. यामुळे सर्वभार हा अमेरिकेच्या गुंतवणूकदारांवर येते.
Ans: पीटर नवारो यांनी भारतात ChatGPT बंद करण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप भारतात याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.