Trump Tariff Team: पीटर, स्कॉट, हॉवर्ड... ट्रम्पच्या टॅरिफ टीमचे 'त्रिमूर्ती', ज्यांच्या एका सल्ल्याने उडवली भल्या भल्याची झोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाने जगाला हादरवून टाकले आहे. सध्या ट्रम्प यांनी 70 हून अधिक देशांवर परस्पर कर लागू केलेल्या देशांना करातून 90 दिवसांची सवलत दिली आहे. मात्र या सवलतीमधून चीनला वगळले आहे. चीन आणि अमेरिकेत टॅरिफ वॉर सुरुच असून ट्रम्प यांनी चीनवर तब्बल 125% शुल्क लादले आहे. चीनने देखील अमेरिकन उत्पादनांवर 84% अतिरिक्त कर लागू केला आहे. यामुळे दोन्ही देशांत प्रचंड तांडव सुरु आहे.
पण तुम्हाला माहिती आहे, ट्रम्प यांच्या एवढा मोठा निर्णय घेण्यामागे कोणचा हात आहे? त्यांच्या टॅरिफ बॉम्बच्या धोरणामागे तीन असे चेहरे आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. यामध्ये पीटर नैवारौ, स्कॉट बेसेंट आणि हार्वर्ड लुटनिक यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. डोनाल्ड ट्रम्प टॅरिफचे समर्थक असून या त्रिमूर्तीसोबत मिळून सर्वांना धक्का दिला आहे.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील देशांनी अनेक दशकांपासून अमेरिकेला लुटले आहे, आता यापूढे असे होऊ दिले जाणार नाही.
पीटर नैवारो हे सर्वात मोठे आणि ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार आहेत. सध्या जगभरात यांची चर्चा सुरु आहे.एलॉन मस्कसोबतचा टॅरिफवाद सध्या चांगलाच रंगला आहे. ते ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे मुख्य सुत्रधार मानले जातता. ते कट्टर चीनविरोधी असून त्यांनी Death by China आणि China Wars या पुस्तकांमधून विरोधी भूमिका मांडली आहे. तसेच ते America First धोरणाचे कट्टर समर्थक आहेत.
त्यांचा ठाम विश्वास आहे की, उच्च टॅरिफमुळे परकीय उत्पादन महागेल. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला, रोजगार वाढीला चालना मिळेल. नैवारो यांनीच प्रथम परस्पर शुल्काचा सल्ला ट्रम्प यांना दिला होता. त्यांच्या या निर्णयामागे असा हेतू होता की, यामुळे अमेरिकेची व्यापर तूट संतुलित राहिल आणि यामुळे परदेशी देशांना त्यांच्या धोरणांत बदल करावा लागेल.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी पूर्वी हेज फंड मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी नैवारो यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाला पाठिंबा दिला आहे. 2015 मध्ये त्यांनी स्वत:ची KEY Square Group नावाची गुंतवणूक कंपनी सुरु केली होती. त्यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला नेहमीच समर्थन दिले आहे.
त्यांचा विश्वास आहे की टॅरिफमुळे केवळ व्यापरच संतुलित होणार नााही, तर यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, पण टॅरिफचे धोरण दीर्घ काळ फायदेशीर ठरेल असले त्यांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांच्या ‘Make The America Great Again’ धोराणाचे समर्थक आहेत. ट्रम्प यांचे खास मित्र आणि अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून लुटनिक कार्यरत आहेत. त्यांच्या टॅरिफ धोरणाचे ‘de facto Face’मानले जाते. त्यांच्या मते, टॅरिफमुळे इतर देशांवार दबाव आणून त्यांना धोरण बदलण्यास भाग पाडता येते. चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांवर अधिक शुल्क लागू करण्याध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
ही त्रिमूर्ती म्हणजे ट्रम्प यांच्या संरक्षणवादी धोरणामागील बौद्धिक आणि धोरणात्मक आधारस्तंभ आहे. यांनी जागतिक व्यापारात मोठा वादळ निर्माण केले आहे.