PM Benjamin Netanyahu appoints retired general Eyal Zamir as Israel's new army chief
जेरुसेलम: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी शनिवारी (1 फ्रेब्रुवारी) ला निवृत्त मेजर जनरल इयाल झमीर यांची इस्त्रायलच्या लष्करप्रमुखपदी नियुक्त केली आहे. माजी लष्करप्रमुख हर्जी हालेवी यांनी 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासने इस्त्रायलवर केलेला हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर घोषणा केल्यानंतर या हा निर्णय घेण्यात आला होता. इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी करत ही माहिती दिली.
कार्यालयाने दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इजरायल काट्ज़ यांनी मेजर जनरल (नि.) इयाल जमीर यांना पुढील आर्मी चीफ म्हणून नियुक्त करण्यावर सहमती दर्शवली आहे.
28 वर्षांचा सैन्य अनुभव
मिळालेल्या माहितीनुसार, इयाल जमीर यांनी 28 वर्षांहून अधिक काळ इस्त्रायलच्या लष्करी सैन्यात सेवा बजावली आहे. त्यांनी इस्त्रायलच्या डिप्टी चीफ ऑफ स्टाफ (2018-2021) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच, जमीर दक्षिणी सैन्य कमानचे प्रमुख राहिले असून गाझा सीमेवरील सैन्य मोहीम आणि सुरक्षेच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. याशिवाय, ते काही काळ पंतप्रधान नेतन्याहू यांचे सैन्य सचिवही राहिले आहेत, यामुळे त्यांचा नेतन्याहूंशी थेट संपर्क आणि चांगले संबंध आहेत.
इयाल जमीर यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. इस्त्रायल गेल्या 15 महिन्यांपासून हमासविरुद्ध युद्ध लढत आहे, तसेच त्याला लेबनॉनमधूनही धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, इराण, इराक आणि यमनकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे आव्हान देखील त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्यासमोर असणार आहे. नुकताच इस्त्रायलने पश्चिम किनाऱ्यावर मोठा सैन्य अभियान राबवला होता, तसेच डिसेंबर महिन्यात सीरियाच्या काही भागांवर कब्जा मिळवला आहे. अशा परिस्थितीत, इयाल जमीर यांना संघटित आणि प्रभावी लष्करी रणनीती आखाण्याची जबाबदारी आहे.
हर्जी हलेवी यांचा राजीनामा
सध्याचे आर्मी चीफ हर्जी हलेवी यांचा कार्यकाळ 6 मार्च 2025 पर्यंत असून नंतर इयाल जमीर त्यांची जागा घेतील. हलेवी यांनी 7 ऑक्टोबरच्या हमास हल्ल्याला रोखण्यात अपयश आले, हे मान्य करत गेल्या महिन्यात राजीनाम्याची घोषणा केली होती. हलेवी यांनी म्हटले की, “इयाल जमीर यांची आर्मी चीफ म्हणून निवड योग्य आहे. त्यांना मोठा सैन्य अनुभव आहे आणि त्यांनी अनेक कठीण परिस्थितीत नेतृत्व केले आहे.”
इस्त्रायल आणि त्याचे शेजारील देश यांच्यातील वाढता संघर्ष पाहता, इयाल जमीर यांची नियुक्ती निर्णायक ठरणार आहे. नेतन्याहू सरकारला आता अधिक मजबूत आणि चपळ लष्करी धोरणांची गरज असेल.