
Attack on Vladimir Putins' House
सर्गेई लाव्हरोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ डिसेंबर दरम्यान हा हल्ला झाला आहे. युक्रेनने पुतिन यांच्या निवासस्थानावर लांब पल्ल्याचे ५० हून अधिक ड्रोन डागले आहेत. सध्या याबाबत कोणतेही इतर अपडेट समोर आलेले नाहीत. लाव्हरोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी शांतता चर्चा सुरु असताना हा हल्ला झाला.
दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी सर्गेई लाव्हरोव्ह यांचे सर्व आरोप फेटाळले आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, असे आरोप लावून रशिया त्यांच्या सरकारी इमारतींवर हल्ला करण्याची तयारी करत आहे. यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेकडे शांतता चर्चा सुरु राहावी यासाठी रशियाच्या धमक्यांविरोधात पावले उचलण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी रशिया युक्रेनची राजधानी कीववर देखील हल्ला करु शकतो याची भीती व्यक्त केली आहे.
दरम्यान सर्गेई लाव्हरोव्ह यांनी दिलेल्या माहितीत हल्ल्याची नेमकी वेळ स्पष्ट झालेली नाही. तसेच पुतिन त्यांच्या निवासस्तानी होते का हे देखील स्पष्ट नाही. लाव्हरोव्ह यांनी रशिया या हल्ल्याचे लवकरच उत्तर देईल असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, रशियाने यापूर्वी देखील युक्रेनच्या प्रत्येक हल्ल्याविरोधा जबाबी कारवाई केली आहे.
याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यांनी पुतिन यांच्या घरावर हल्ल्याची माहिती मिळताच तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अशा घटना घडू नयेत असे मला वाटते असे म्हटले आहे. त्यांनी याबद्दल तीव्र राग व्यक्त केला आहे. परंतु त्यांनी हा एक केवळ दावा असू शकतो हेही मान्य केले आहे.
सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्यासाठी शांतता चर्चा सुरु आहे. अशातच पुतिन यांच्या घरावरील हल्ला हा युद्ध संपण्यासाठीच्या प्रयत्नांना मोठा धक्का पोहोचवू शकतो. सध्या याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसली तरी यामुळे युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या हल्ल्याच्या दोन दिवस आधीच रविवारी (२८ डिसेंबर) ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात फ्लोरिडा येथे बैठक झाली होती. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी युद्ध संपण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला होता.
रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा