Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi: सेशेल्सने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मानाने गौरवले; पाहा काय आहे ‘Guardian Of The Blue Horizon’ पुरस्कार?

Guardian Of The Blue Horizon Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. सेशेल्सने पंतप्रधान मोदींना देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवले आहे. याबाबत वाचा सविस्तर.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 28, 2026 | 05:25 PM
pm modi conferred seychelles highest civilian honour guardian of the blue horizon visit agreements

pm modi conferred seychelles highest civilian honour guardian of the blue horizon visit agreements

Follow Us
Follow Us:
  • सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान
  • पर्यावरणीय आणि जागतिक नेतृत्व
  • ऐतिहासिक द्विपक्षीय करार आणि उपलब्धी

PM Modi Seychelles visit June 2026 updates : जागतिक स्तरावर भारताची पत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव किती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, याचे आणखी एक ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूर्व आफ्रिकेतील महत्त्वाचा द्वीपसमूह असलेल्या सेशेल्स देशाच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत. या ऐतिहासिक दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी २८ जून २०२६ रोजी, सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांनी स्टेट हाऊस येथे आयोजित एका विशेष आणि भव्य सोहळ्यात पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च विशेष सन्मान ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ (Guardian of the Blue Horizon) प्रदान केला. विशेष म्हणजे, सेशेल्सच्या इतिहासात हा विशेष बहुमान मिळवणारे नरेंद्र मोदी हे जगातील पहिलेच नेते ठरले आहेत.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अत्यंत विनम्रतेने हा सन्मान भारतातील १४० कोटी जनतेला आणि जगभरात हवामान बदलाच्या (Climate Change) आव्हानांशी लढा देणाऱ्या सर्व देशांना समर्पित केला. भारत आणि सेशेल्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण होत असतानाच हा पुरस्कार दिला जाणे, हे दोन्ही देशांमधील घट्ट मैत्रीचे आणि विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. पंतप्रधान मोदींचे हे जागतिक पातळीवरील ३४ वे आंतरराष्ट्रीय पदक आहे, ज्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारताची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CITIC टॉवरवर विमान कोसळले अन् पुरावेच नष्ट केले! Chinaच्या ‘सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळजनक कारनामा

काय आहे ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ पुरस्कार?

‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ या पुरस्काराचा शब्दशः अर्थ ‘निळ्या क्षितिजाचा रक्षक’ असा होतो. हा सन्मान अशा नेत्याला दिला जातो ज्याने जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण, हरित वाढ (Green Growth) आणि सागरी संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी (Blue Economy) अतुलनीय काम केले आहे. सेशेल्स सरकारने स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींनी भारताच्या देशांतर्गत धोरणांमध्ये पर्यावरणाला दिलेले प्राधान्य, ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’ (ISA), ‘मिशन LiFE’ (Lifestyle for Environment), ‘एक पेड माँ के नाम’ मोहीम आणि ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ यांसारख्या जागतिक मोहिमा सुरू करून जगाला एक नवी दिशा दाखवली आहे, म्हणूनच त्यांना या सर्वोच्च किताबाने गौरवण्यात आले.

Grateful to the people and Government of Seychelles as well as President Herminie for conferring upon me the ‘Guardian of the Blue Horizon.’ I humbly accept this honour and dedicate it to all those countries that are fighting the challenge of climate change and consider… pic.twitter.com/iI4c7BjnFq — Narendra Modi (@narendramodi) June 28, 2026

credit – social media and Twitter

पंतप्रधान मोदींना हवामान बदल आणि शाश्वत विकासासाठी मिळालेला हा पहिलाच सन्मान नाही. यापूर्वी मे २०२६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) त्यांना ‘ॲग्रिकोला पदक’ देऊन गौरवले होते. याशिवाय २०१८ मध्ये त्यांना जागतिक शांतता आणि सर्वसमावेशक विकासासाठी ‘सोल शांतता पुरस्कार’ आणि संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ (Champions of the Earth) पुरस्कार देखील मिळाला आहे.

संरक्षण, डिजिटल क्रांती आणि ऐतिहासिक करार

पंतप्रधान मोदींच्या या तीन दिवसीय दौऱ्यात केवळ पुरस्कारच मिळाला नाही, तर दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक संबंधांना एक नवी उंची मिळाली आहे. राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चेनंतर अनेक महत्त्वाच्या करारांवर (MoUs) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आता सेशेल्समध्ये भारताची ‘युपीआय’ (UPI) ही डिजिटल पेमेंट यंत्रणा लागू केली जाणार आहे, ज्यामुळे तिथे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे होतील. यासोबतच, सेशेल्समधील नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार औषधे मिळावीत यासाठी भारताची ‘जनऔषधी योजना’ देखील तिथे सुरू केली जाणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनेही हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. हिंद महासागर हे आपले सामायिक घर असून त्याची सुरक्षा आणि समृद्धी ही भारत-सेशेल्सची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मोदींनी केले. भारताने सेशेल्सच्या सागरी सुरक्षेसाठी भारतात तयार करण्यात आलेली ‘लेसप्वार’ (Lespwar) ही वेगवान गस्ती नौका (Fast Patrol Vessel) सेशेल्सच्या स्वाधीन केली. तसेच, सेशेल्सच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी संचलनात भारतीय लष्कराच्या आसाम रेजिमेंटच्या तुकडीने आणि भारतीय नौदलाच्या बँडने सहभाग घेऊन या मैत्रीला एक नवा रंग दिला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DNA Study : 100 वर्षे जगण्याचे रहस्य सापडले! 316 वर्षे जगणाऱ्या ब्राझीलच्या तीन बहिणींच्या डीएनएवर शास्त्रज्ञांचे मोठे संशोधन

२० देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा अनोखा विक्रम

या दौऱ्याचे आणखी एक सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला (National Assembly) संबोधित केले. सेशेल्सच्या संसदेला संबोधित करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. या ऐतिहासिक प्रसंगामुळे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कार्यकाळात जगभरातील तब्बल २० देशांच्या संसदेला किंवा राष्ट्रीय सभांना संबोधित करण्याचा एक जागतिक आणि अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर केला आहे. सेशेल्समधून निघण्यापूर्वी मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “हा ऐतिहासिक प्रसंग आपल्या दोन्ही देशांना एकत्र बांधणाऱ्या मजबूत लोकशाही मूल्यांचे आणि संसदीय परंपरांचे प्रतीक आहे.” या संपूर्ण दौऱ्याने हे सिद्ध केले आहे की, भारत केवळ आशियातच नाही, तर जागतिक मंचावर एक खंबीर, विश्वासार्ह आणि पर्यावरणस्नेही महाशक्ती म्हणून उदयास येत आहे.

Web Title: Pm modi conferred seychelles highest civilian honour guardian of the blue horizon visit agreements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • african country
  • awarded
  • PM Narendra Modi
  • World news

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘हिंद महासागराला संधींचा महासागर बनवणार’, पीएम मोदींचा मोठा संदेश
1

पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘हिंद महासागराला संधींचा महासागर बनवणार’, पीएम मोदींचा मोठा संदेश

CITIC टॉवरवर विमान कोसळले अन् पुरावेच नष्ट केले! Chinaच्या ‘सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळजनक कारनामा
2

CITIC टॉवरवर विमान कोसळले अन् पुरावेच नष्ट केले! Chinaच्या ‘सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळजनक कारनामा

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही’ , हसीना यांचा विरोधकांना मोठा इशारा; बांगलादेशच्या Ex PM लवकरच मायदेशी परतणार?
3

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही’ , हसीना यांचा विरोधकांना मोठा इशारा; बांगलादेशच्या Ex PM लवकरच मायदेशी परतणार?

France Heatwave : फ्रान्समध्ये विक्रमी तापमानाचा कहर! हीटवेव्हमुळे हजारो नागरिकांचा बळी, जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका
4

France Heatwave : फ्रान्समध्ये विक्रमी तापमानाचा कहर! हीटवेव्हमुळे हजारो नागरिकांचा बळी, जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.