PM Modi's visit to London FTA likely to be announced between both countries
लंडन : भारत आणि ब्रिटनमध्ये लवकरच मुक्त व्यापार कराराची घोषणा होणार आहे. यामुळे भारत आणि ब्रिटनच्या व्यापाराला नवीन चालना मिळणार आहे. पंतप्रधान नेरेंद्र मोदी २३ ते २४ जुलै दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची २४ जुलै रोजी लंडनमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान बारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार कराराची घोषणा केली जाईल. हा करार ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांदरम्यान होत आहे. यामुळे संपूर्ण जागाचे लक्ष ब्रिटन आणि भारतातील या कराराकडे लागले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्क व्यापार करारवर चर्चा सुरु आहे. या तीन वर्षांच्या यशस्वी चर्चेनंतर अखेर ६ मे २०२५ रोजी दोन्ही देशांनी करार करण्यावर सहमती दर्शवली आहे. हा करार सुमारे २०० पानांचा आहे. दोन्ही देशांतील अंदाजे १२० अब्ज डॉलर्सपर्यंत व्यापार वाढण्याची शक्यता आहे.
या कराराममुळे दोन्ही देशांतील सामाजिक सुरक्षा लाभांवरही निर्णय घेम्यात आला आहे. दोन्ही देसांतील व्यापाऱ्यांनी तीन वर्षांची सूट दिली जाणार आहे. यामुळे भारत आणि ब्रिटनच्या कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दोन्ही कडून पीएप किंवा पेंशन कपात लागू होणार नाही. या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांतील आर्थिक परिस्थितीला बळकटी मिळेल.
याचा भारतीय बाजापेठेला मोठा फायदा होईल. सध्या हा करार पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरु आहे. या कारामुळे भारताच्या तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था होण्याच्या स्वप्नाला एक नवीन दिशा मिळेल.
FTA चा फुल फॉर्म Free Trade Agreement म्हणजेच मुक्त व्यापार करार आहे. हा करार दोन देशांत झाल्यावर जास्तीत जास्त उत्पादनांवरील टॅरिफ कमी केले जाते. यामुळे दोन देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूकीला चालना मिळते. यामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये हा करार आर्थिक धोरणांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.