Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narendra Modi: रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मोठे विधान; म्हणाले…

पोलंडमध्ये गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. भारतीय नागरिकांशी संवाद साधताना सभागृहामध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. पोलंड येथे भारतीय नागिरकांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात थेट मराठीमध्ये केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2024 | 06:40 PM
पोलंड दौऱ्यात रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मोठे विधान; म्हणाले...

पोलंड दौऱ्यात रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मोठे विधान; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. पोलंड दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत आहेत. रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. दरम्यान पोलंडमध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. त्याआधी त्यांनी डोबरी महाराजांचे स्मारक, कोल्हापूर स्मारक येथे भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मोदींनी संबोधन करताना पोलंड आणि भारतातील नात्यावर भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना, ”तब्बल ४५ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांनी पोलंड देशाचा दौरा केला आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरूवातीलाच मला हे सौभाग्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी पोलंड सरकार आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानतो. २०२२ मध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही जे सहकार्य केले आहे, ते कुणीही विसरू शकत नाही. आम्ही या चांगल्या क्षणी पोलंडमधील कंपन्यांना मेक इन इंडियासोबत येण्यासाठी निमंत्रित करतो. कोणत्याही समस्येचे समाधान हे युद्धभूमीवर असू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्दोष लोकांचे बळी हे मानवतेच्या विरोधात आहे.”

Addressing the press meet with PM @donaldtusk of Poland. https://t.co/Jqqn27ZeJq

— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2024

नरेंद्र मोदी पोलंड दौरा संपल्यानंतर युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. १९९२ नंतर भारतीय पंतप्रधान युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी विदेश मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनावर सांगितले होते की, ”पोलंड दौऱ्यानंतर मी झेलेन्स्की यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार युक्रेनला जाणार आहे. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला युक्रेन दौरा असणार आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत होण्यासाठी मी राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहे. ”

दरम्यान, पोलंडमध्ये गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. भारतीय नागरिकांशी संवाद साधताना सभागृहामध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. पोलंड येथे भारतीय नागिरकांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात थेट मराठीमध्ये केली. यावेळी सभागृहातील प्रेक्षकांचा आनंदोत्सव व जल्लोष ऐकू आला. याचा व्हिडिओ पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही आवर्जून उल्लेख केल्याचे देखील पाहायला मिळाले. तसेच पोलंड आणि कोल्हापूरचे खास कनेक्शनचा उल्लेख देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Web Title: Pm narendra modi said any problem cant solve on war at poland visit on russia ukraine crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 06:37 PM

Topics:  

  • narendra modi
  • Russia Ukraine War
  • Ukraine Russia War

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
3

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट
4

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.