युक्रेन भेटीनंतर पीएम मोदींनी रशियाच्या राष्ट्रीध्यक्षांशी संपर्क साधला
नवी दिल्रली: रशिया-युक्रेन संपण्याचे अजून कोणतेही चिन्ह दिसत नाही. या दोन देशांतील तणाव वाढत चालाल आहे. या देशांमधील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करत आहेत. तीन दिवसांपूर्वीच शनिवारी (24 ऑगस्ट) ला पंतप्रधान नरेंद्र मादी युक्रेनच्या दौऱ्यावरून परतले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी तेथील परिस्थीतीबाबत चर्चा केली आहे.
दरम्यान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संपर्क साधला आहे. ज्यात त्यांनी युक्रेन भेटीची माहिती दिली आणि युक्रेन-रशिया विवाद संपुष्टात आणण्यासाठी तसेच संपूर्ण प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून बांधिलकी व्यक्त केली. तसेच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी देखील संपर्क साधला. युक्रेनमध्ये शांततेचा संदेश दिल्याबद्दल आणि मानवतावादी आधारावर युक्रेनला मदत करण्यासाठी पावले उचलल्याबद्दल बायडेन यांनी मोदींचे कौतुक केले. सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची परिस्थिती अधिक भयावह बनली आहे. याआधी रशियाने युक्रेनच्या निम्म्याहून अधिक भागांवर २०० क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता.
पंतप्रधान मोदी सतत युक्रेन-रसियाशी संपर्क साधत आहेत
रशियाच्या हल्ल्यानेतर युक्रेनचे काही ऊर्जा प्रकल्प तसेच त्यातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. युक्रेनच्या बाजूनेही प्रत्युत्तराच्या कारवाईची तयारी सुरू आहे. परिस्थिती बिघडत असतानाही, अशा परिस्थितीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही बाजूंच्या संपर्कात आहेत आणि सतत संपर्कात आहेत आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढील शांतता चर्चा भारतात होणार- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन आपल्या मैत्रीपूर्ण आणि सहाय्यक देशांशी शांतता चर्चा करण्यासाठी बैठक घेमार असून या बैठकी भारतात होणार आहेत. परंतु त्याबद्दल अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करत असताना, रशियासोबत शांततेचा मार्ग शोधून काढावा लागेल असे सांगितले. तसेच नरेंद्र मोदींनी देखील वैयक्तिकरित्या सर्वतोपरी मदततीचे आश्वासन दिले. परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै 2024 मध्ये रशियाच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
Spoke with President Putin today. Discussed measures to further strengthen Special and Privileged Strategic Partnership. Exchanged perspectives on the Russia-Ukraine conflict and my insights from the recent visit to Ukraine. Reiterated India’s firm commitment to support an early,…
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2024
युद्ध संपण्याची काही आशा आहे का?
बारत आमि रशियामधील विशेष धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहेत. या चर्चेत प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारंची देवाणघेवाण करण्यात आली. तसेच युक्रेन रशिया वादावर देखील बोलण्यात आले. नरेंद्र मोदींनी युक्रेन भेटीची माहिती देत शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुसद्देगिरी महत्तावाची असल्याचे सांगितले. त्यांनी प्रायोगिक चर्चांवर भर देत युक्रेन व रशियातील संबंध लवकरच चांगले होती असे सांगितले मात्र याबाबत सध्या कोणताही दावा करता येणार नाही.